Latur-Latur Maharashtra Next Oxford Marathwada

लातूर जिल्हा व इतिहास (History of Latur Distric)

नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला लातूर विषयी थोडक्यात माहिती देणार आहे.१९६०च्या दशकात उस्मानाबाद या जिल्हयापासून विभग्त होऊन लातूर या नावारूपाने उदयास आलेला हा जिल्हा  भौगोलिदृष्ट्या  महाराष्ट्रातील सुपीक जमिनीचा भूभाग असलेला जिल्हा आहे. हैदराबादच्या राजवटीतच लातूर हा प्रामुख्याने मराठवाड्यातील व्यापारी केंद्र बनले होते. कृषि आधारित अर्थव्यवस्था व ओद्योगीक केंद्रसुद्धा होते भारतात तूर डाळ निर्यात करणार जिल्हा असून येथील तूर डाळ ही देशाच्या विविद्ध भागामध्ये लातूर तूर या नावाने प्रसिद्ध आहे. तसेच कडधान्याच्या बाबतीत पण हा जिल्हा अग्रेसर असून,उडीद,मग हरबरा,सूर्यफूल,करडई व सोयाबीन व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

लातूर किल्लारी भूकंप व दुष्काळ परिस्थिति:  (Killari Earthquake and Drought Conditions)

स.१९९३  रोजी पहाटे ३  ते ४  च्या सुमारास ६.३ तीव्रतेचा भूकंप झाला होता या नैसर्गिक  आपत्तीमद्ये १० हजार लोकांचा बळी गेला होता. भूकंपामुळे किल्लारी या ठिकाणची पूर्ण हानी झालेली होती गावची गाव ओसाड पडली होती  भूकंपातून सावरण्यासाठी भूकंपग्रस्त गावांना त्या वेळी राज्य सरकारने घेतलेले निर्णय हे आजतागायत कोणी विसरू शकत नाही. महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी पावसाचे प्रमाण हे मराठवाडा विभागात असल्याचे दिसून येते मागील काही ३  दशका पासून मराठवाडा हा पावसा अभावी सतत धगधगत राहीला आहे. व त्यात लातूर बीड उस्मानाबाद या जिल्ह्याला कायमचाच दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याने जिल्ह्यातील या गरीब  कुटुंबातील शेतकऱ्याच्या मुलांना पोटाची खळगी भरन्यासाठी मागील काही वर्षा मध्ये पुणे मुंबई या ठिकाणी  जाऊन मजदूरी करून उदनिर्वाह  भागवावा  लागत आहे. असे परंतु हा ट्रेंड मोडीत कडून शेतकरी कुटुंबातील मुले आज शिक्षणाच्या जोरावर मोठमोठ्या पदावर काम करत आहेत. याच श्रेय हे लातूर पॅटर्न विकसीत करणाऱ्याला द्यावे लागेल

लातूर पॅटर्न ची देशात धमाल:  (Miracle off Latur Education Pattern)

लातूर हा महाराष्ट्रात कायमचाच दुष्काळ ग्रस्त म्हणून ओळखला जातो पान या दुष्काळी परिस्थितीत जशी लातूर पॅटर्न ची निर्मिती झाली आहे  तेंव्हा पासून शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्याच्या मुलाने शिक्षणात घेतलेली गगन भरारी ही त्या ढगातून येणाऱ्या थेंबा पेक्षा जास्त आहे स  १० वी १२  वी चा जाहीर लागलेल्या निकालातून दिसत आहे. संपूर्ण भारताचे लक्ष महाराष्ट्राच्या लातूर जिल्हयाकडे लागले होते. व सर्व शिक्षण मंडळाचे तसेच शिक्षण तज्ञाचे लक्ष लातूर पॅटर्नकडे लागले असताना आपण जर भारतात शिक्षण संस्थाची येणाऱ्या निकालाची आकडेवारी ही CBSC या बोर्डाची चर्चा महाराष्ट्रात होत असायची तसेच राजस्थान मधील कोटा,चुरू,झुंजणू या ठिकाणची नावे पहिले वर्तमान पत्रामध्ये पाहायला दिसत असे पण मागील काही सालापासून लातूर पॅटर्न ची ही चर्चा सर्वत्र होत असताना दिसून येत आहे.