रोग निदान प्रयोग शाळा (लातूर)

१)रोग निदान प्रयोग शाळा उदिष्ट (School of Diagnostics Experiments)

नमस्कार शेतकरी बांधवानो रोग निदान प्रयोग शाळेचे महाराष्ट्रातील प्रामुख्याने सात प्रयोग शाळा आहेत. व  आता ८ वी प्रयोग शाळा लातूर मध्ये स्थापन होणार आहे. मागील वर्षी मराठवाडा तसेच विदर्भ या दोन विभागांमध्ये लंपी वायरसने धुमाकूळ घातला असल्याने या विभागातील पशुवैधकीय दवाखान्यामध्ये वेळेवर उपचार न झाल्याने तसेच या वायरस वर कोणतेही उपचार नसल्याने लातूर विभागात मोठ्या प्रमाणात गुरांना या विशानूची लागण झाली होती याचे खबरदारीचे उपाय म्हणून माननीय कृषि मंत्री यांनी लातूर विभागात तातडीने रोग निदान प्रयोग शाळा उभारण्याचे ठरविले असल्याने येथील शेतकऱ्यांच्या गुरांना येणाऱ्या प्रत्येक आजारावर लवकरात लवकर लस मिळू शकेल व शेतकऱ्याला जनावरांचे योग्य पालन पोषण करता येईल.

२)लातूर पशुपालनात अग्रेसर (Latur is a Leader in Animal Husbandry)

महाराष्ट्रात जरी पावसाचे प्रमाण हे मराठवाड्यात कमी असले तरी या ठिकाणचा भूभाग हा सपाट समतल तसेच काळ्या व मुरमाड मातीचा असल्याने येथील जमिनी मध्ये  त औषधी गुणधर्माचे झाडपाला वनस्पतीचे प्रमाण हे जास्त असल्याने याचा परिणाम येथील गावामधील जनतेवर दिसून येतो कारण मारठवाड्यातील लातूर,धाराशीव,नांदेड,बीड या जिल्ह्यामध्ये गुरांचे पालन पोषण करणे तसेच शेळी पालन मेंढी पालन करणाऱ्यांची संख्या ही जास्त दिसून येते या चार ही  जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण हे अल्प असल्याने येथील अल्पभूधारक शेतकरी शेती बरोबर पशूपालन करून आपला उदरनिर्वाह तसेच आपल्या कुटुंबाचे पालन पोषण मुलांचे शिक्षन पशू पालन व्यवसायाच्या मिळणाऱ्या पैशातून गरजा पूर्ण करत आहे.

३)दूध उत्पादनाला चालना मिळेल  (Boost Milk Production)

लातूर मध्ये जरी पावसाचे प्रमाण कमी असले तरी मागील काही वर्षा पासून राज्य शासनाने घेतलेले निर्णय हे येथील शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ लागला आहे. सरकारने राबवलेल्या विविध योजना त्या योजनांची होणारी अंमलबजावणी येथील पशू पालणावर चांगला प्रभाव दिसून येतो आहे .गावामधील सहकारी तत्वावर चालणाऱ्या दूध ढेरी चे प्रमाण हे वाढले आहे म्हणून गावो गावी अमूल मिल्क तसेच मदर डेअरीचे प्रोडक्ट बनवून ते शहरामध्ये विकण्यात येत आहेत याला अर्थसाह्य ही या दूध विकत घेणाऱ्या कंपन्या देतआहेत असल्याचे समजत आहे. व याचा फायदा येथील शेतीवर अवलंबून असणाऱ्यांना दुग्ध व्यवसायास मदत होऊ शकतो.