Lampi आजारात वाढ होत आहे.
राज्यात पुनः लम्पी आजारात वाढ होत असल्याने राज्यातील शेतकऱ्या मध्ये पशु पालना विषयी भीती निर्माण झाली आहे.
राज्यातील पशू संवर्धन विभागाने लंपी आजार विषयी नवीन गाईड लाईन जारी केली आहे. ज्या मुळे शेतकऱ्यांना या अजारा पासून बचाव केला जाऊ शकतो.
कोल्हापूर, सातारा, सांगली, शिंधदुर्ग लंपी आजार वाढला
राज्यातील या ४ ही जिल्ह्यामध्ये लंपी आजार चा वयरास प्रसार होण्याची भिती वाढली आहे. राज्याच्या दूध उत्पादनात चारही जिल्ह्याचा मोठा वाटा असल्याने पशू पालनास या व्हायरस मूळे दूध उत्पादनात खिंडार पडू शकते. मागील काही दिवसापासून प्रतिबंधात्मक उपाय व नियंत्रण शेतकरी करत आहेत पण अजून हि साथ आटोक्यात आली नसल्याने आजाराने बाधित जनावरे चारा कमी खाणे व पाणी कमी पित असल्याने खास करून जरसी गाई दगावण्याची भीती वाटत आहे.
Lampi आजाराची लक्षणे.
- या व्हायरस चां प्रकोप कसा ओळखावा जनावर हे चारा खाणे कमी करतात व पाणी कमी पित असल्याने दुधाचे प्रमाण कमी होते.
- पशू च्या शरीरावर लहान लहान गाठी येऊन डोळ्यातून अश्रू येतात व नाकातून शेंबूड येण्यास सुरुवात होते.
- पशुच्या शरीरातील ताप १०४ ते १०८ अंश दरम्यान असतो तापाचे प्रमाण वाढल्याने चारा पाणी कमी प्रमाणात सेवन केल्याने वजनात घट होऊन पचनसंस्था, श्वसन संस्था, अवयवात दिसत असल्याने त्यामधे पू सारखे द्रव साठते व त्यातून वणाची निर्मित होऊन तोंडावाटे लाळ जास्त प्रमाणात येतो.
- या रोगाची लागण झालेल्या गुरांना कासात व स्तना जवळ गाठी येतात व लंगडायला सुरवात करतात.
आजारावर नियंत्रण कसे करावे.
राज्यात अनेक ठिकाणी या व्हायरस ने थैमान घातले आहे. अजून रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार योग्य ती काळजी घेत आहे पण शेतकऱ्यांना सबुरीचा सल्ला घ्यावा लागेल
१)शेळीची लस देण्यास सुरवात केली आहे.
२) लागण झालेल्या आजारी पशूंना इतर निरोगी पशू पासून दूर बांधणी करावी.
३) गोठ्याजवळ सांड पाणी तसेच पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी जेणे करून डासाची निर्मिती होणारं नाही.
४) या विषाणूची लागण झालेल्या गोठ्यात डेल्टा, सायपर मेथरीन, गोठ्यात फवारणी करून घावी.