Kisan Credit Kard
भारत हा कृषी प्रधान देश असून सर्व भारतीयांना माहीतच आहे. देशातील सर्वच राज्याचा प्रमुख व्यवसाय हा शेती मानला जातो कारण ६० टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे.
देशातील बहुतांश राज्यातील शेतकरी हे अल्प भूधारक असल्याने ज्याचे उत्पन्न अल्प गटामध्ये असल्याने शेतीसाठी आवश्यक वस्तू, खत,बी बियाणे विकत घेण्यासाठी मुबलक प्रमाणात पैसे नसतात. त्यामुळे गावच्या सावकाराकडे व्याजी पैसे घ्यावे लागतात.
म्हणून भारत सरकारकडून शेतकऱ्यांच्या आर्थिक कल्याण विकासासाठी अनेक प्रकारच्या विविध योजना राबविल्या जात असून याचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ करने व उत्पादनात सातत्य राखणे.
ज्यामुळे अल्प भू धारक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड या योजनेतून कार्ड दिले जाणार आहे.याचा उपयोग शेतकरी शेतीस, लहान अवजारे, शेतीस आवश्यक वस्तू व शेतीस कर्ज घेण्यासाठी याचा वापर करू शकतो. या कार्ड चा दुसरा फायदा असा आहे की ATM मशीन मधून पैसे काढण्यासाठी उपयोगात आणले जाऊ शकते.
शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांचे आर्थिक संकट दूर करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. देशातील शेतकऱ्यांना या योजनेद्वारे किसान क्रेडिट कार्ड दिले जाईल त्याद्वारे शेतकरी या कार्डच्या माध्यमातून कोणत्याही अटी शिवाय ३००००० लाख रुपया पर्यंत कर्ज दिले जाईल.
किसान कार्ड योजना
योजनेचे नाव | किसान क्रेडिट कार्ड |
योजनेचे सुरुवात | १९९८ |
लाभार्थी | देशातील शेतकरी |
कर्जाची रक्कम | ३ लाख रुपया पर्यंत |
योजनेचे उद्दिष्ट | कमी व्याजदर |
अधिकृत संकेतस्थळ | https://pmkisan.gov.in |
बँक | सरकारी बँक |
किसान क्रेडिट कार्ड योजनेचे उद्दिष्ट
१) ज्या शेतकऱ्यांचे शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे अश्या गरजू शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून मुक्त करणे.
२) अल्प भू धारक शेतकऱ्यांना केवळ शेतीवरच अवलंबून न राहता इतर लघु व्यवसाय सुरुवात करण्यास या कार्डचा उपयोग होऊ शकतो.
३) ज्या शेतकऱ्यांचे शेती हा त्यांचा उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत असेल अशा शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय करण्यासाठी या कार्डचा उपयोग होऊ शकतो.
४) जिरायती शेतकऱ्यांना सिंचनाचा अभाव कायमच जाणवतो विहीर, तलाव, स्प्रिंकलर, इरिगेशन या कार्डचा वापर करून गरजा पूर्ण करता येऊ शकतात.
५) कोरडवाहू शेतकऱ्यांना पाण्याची गरज सारखीच गरज भासत असते. किसान कार्ड चा लाभ घेऊन सिंचन यंत्रणा सर्वत्र फुलवू शकता.
किसान क्रेडिट कार्ड फायदे
- किसान क्रेडिट कार्ड चा वापर करून ATM मधून पैसे काढता येईल.
- या कार्ड वापर करून सर्वात कमी व्याजदराचा लाभ मिळू शकतो.
- किसान क्रेडिट कार्ड लाभार्थ्याला ९% च्या व्याजदराने ३००००० रुपया पर्यंत कर्ज मिळू शकते.
- कार्ड च्या माध्यमातून घेतलेल्या कर्जावर २% सबसिडी मिळू शकते.
- योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारी बँक मद्ये अर्ज करावा लागेल.
- किसान क्रेडिट कार्ड ची वैधता ५ वर्ष पर्यंत आहे.
किसान क्रेडिट कार्ड पात्र असणारे शेतकरी
- अल्प भू धारक शेतकऱ्यांकडे लागवडी योग्य जमीन आहे त्यांनाच या योजनेसाठी पात्र ठरविले जाईल.
- किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी जमीन अर्जदाराच्या नावावर असणे आवश्यक आहे.
लागणारी आवश्यक कागदपत्र
1) जमीनीचा ७/१२
२) अर्जदाराचे आधार कार्ड
३) पॅन कार्ड
४) पासपोर्ट फोटो
५) मोबाईल नंबर