Kharip perni: देशात या वर्षी एल निनो चे सावट असल्याने बऱ्याच राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सरासरी पेक्षा कमी नोंद झाली आहे. उशिराने सुरू झालेला कमी पावसावरच खरीप हंगामाची पेरणी झाली असल्याने राज्यात २ महिन्याचा काळ संपुन ही पावसाने पाठ फिरवली आहे. याचे परिणाम खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकावर सोयाबीन, तूर, कापूस, बाजरी, मूग, उडीद, दिसून येत आहे.
मराठवाड्यात सर्वात कमी पाऊस.
राज्यात अनेत ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र याला अपवाद मराठवाडा ठरत आहे. लातूर, बीड, धाराशिव, संभाजी नगर, जालना, परभणी, या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पावसामुळे दयनीय अवस्था होत आहे.
सोयाबीन, तूर, मूग, उडिद या पिकाचे पावसा अभावी नुकसान होणार.
या ६ जिल्यातील मुख्य पीक सोयाबीन असून येथिल बरीच जमीन पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने पावसाने विश्रांती दिल्यामुळे सोयाबीन पीक मान टाकत आहे. येणाऱ्या ५ते६ दिवसात पावसाने हजेरी लावली नाही तर शेतकऱ्यांचा तोंड चा घास पळविल्या सारखा होणार आहे.
पावसामुळे शेतकरी हतबल आर्थिक उत्पन्न घटले.
पावसाने विश्रांती दिल्यामुळे शेतकऱ्या समोर आर्थिक नुकसानीची भीती वाटत आहे. खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकावर खर्च करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा खिसा हा पुरता रिकामा झाला आहे येणं श्रावणात शेतकऱ्यांसमोर उत्सव साजरा करण्यास केवळ मनच उरले आहे. पावसाचा अनियमित पना शेतकऱ्यांच्या जीवावर बेतला आहे. महागडे बीज, लागवड खर्च, रासायनीक खत, फवारणी औषध या सर्वात लुटून जातोय फक्त शेतकरी
पेरणीचा खर्च वाढला
पेरणीचा खर्च वाढल्याने शेतकरी चिंतेत पडले आहे. शेतकऱ्यांच्या पिकास हमीभाव मिळायला हवा होता तो मिळत नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर रासायनिक खतांचा भाव प्रति क्विंटल कमी झाला असून पण केंद्र शासन अधिक टॅक्स लाऊन भाव मागच्या वर्षी सारखेच दिसत आहेत.
प्रत्येक पिकाचे हमीभाव पडलेले आहेत.
राज्यातील अल्प भूधारक शेतकरी चिंतेत पडले. मागील काही महिन्यापासून प्रत्येक कडधान्यांचा भाव शेतकऱ्यांना आव्हान देणारा ठरत आहे. यास अपवाद नाही कारण नसताना सरकार भावाचे दर पाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकार विषयी प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. तसेच शेतीस लागणारे कीटकनाशके व यंत्र सामग्री मधे सबसिडी कपात करून सरकार काय संदेश देत आहे.हे येणाऱ्या काळात समजेल