दूध उत्पादन
राजस्थान भारतातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य म्हणून नावारूपास आले आहे. ३३.५ दशलक्ष मेट्रिक टन येवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारे पहिले राज्य बनले.
राजस्थान म्हटले की डोळ्या समोर चित्र उभ राहत फक्त वाळवंट आणि अश्या या वाळवंटाच्या प्रदेशामध्ये दूध उत्पादन करणे हे दूध क्रांती पेक्षा कमी नाही.
भारतातील सर्वाधिक दूध उत्पादक राज्य
भारत हा जगातील दोन नंबरचा सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश ठरला आहे. जागतिक आकडेवारी नुसार दुध उत्पादन करणाऱ्या देशाच्या तुलनेत भारतातील दूध उत्पादनचां वाटा हा २४ टक्के पर्यंत आहे.
देशातील सर्वाधिक दुधाचे उत्पादन करणारे राज्य
१)राजस्थान
२)उत्तर प्रदेश
३) पंजाब
४) महाराष्ट्र
५) आंध्र प्रदेश
६) कर्नाटक
जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश.
भारत हा जगातील सर्वाधिक जास्त दुध उत्पादन करणारा देश जरी असला तरी देशातील लोकसंख्येला उत्पादन केले जाणारे दूध पुरेसे नसल्याने इतर देशाकडून जसे की न्युझीलँड ,ब्राझील ऑस्ट्रेलिया या देशाकडून आयात करावे लागते.
- भारत
- युरोपीय युनियन देश
- अमेरिका
- ब्राझील
- पाकिस्तान
- चीन
भारतातील सर्वाधिक दूध देणाऱ्या गायी व म्हैस जाती.
भारतात उत्तरेकडील राज्यात अनेक दूध देणाऱ्या गाई म्हशी पशू ची संख्या मोठ्या प्रमाणात आढळतात. सध्या भारत देशात गावो गावी दूध डेअरी Milk Busness मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतं आहे. ज्यामध्ये शेतकरी गिर गाय व मुऱ्हा मैस यांचे संगोपन करत आहे. व त्यांचे दूध देणाऱ्या जाती मध्ये गणना केली जाते.
गाय :-
- गिर गाय
- लाल शिंधी गाय
- सहीवाय गाय
- गवळी
- देवणी
- रेड कंधरी
- खिल्लार
म्हैस :-
- मुर्रा
- पंढरपुरी
- झाफ्राबादी
- मेहसाणा
- नागपुरी
या गायीं व मशीच्या जाती भारतीय हवामानामध्ये सहज रित्या मिसळल्या जातात. या गाय व मैसं जातीचे संगोपन केल्यास दुधाचे उत्पादन घटत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो.
महाराष्ट्राची दूध उत्पादन क्षमतेत वाढ
मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी दूध उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. खास करून मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यामद्ये राज्यातील दूध उत्पादन क्षमता ही १४ हजार ४०० टन च्या वर पोहचली आहे. २०२२ ते २०२३ च्या आकडेवारी नुसार.
दूध वाढवण्यासाठी चारा नियोजन उपाय
कोणत्याही दूध देणाऱ्या पशु साठी चारा अती महत्वाचा घटक आहे.
१) नेपियर गवत :-
नेपियर गवत जनावरांसाठी अत्यंत पोष्टीक आहार मानला जातो.हे गवत ऊसा सारखे दिसणारे असते.या गवताचे कडबा कुटीच्या साह्याने बारीक तुकडे करून पशू खाद्य म्हणून दिले असता दुधाचे प्रमाण दिवसेदिवस वाढ होत राहील.
२) झिरका गवत :-
हे गवत कमी दिवसात भरपूर मोठ्या प्रमाणात उत्पादन होणारे असल्याने पशू साठी सम प्रमाणात दिल्याने प्रति दिवसाला दुधाचे प्रमाण वाढल्याचे दिसेल.
३) दुभत्या जनावरांसाठी चवळी गवत पोष्टीक आहार :-
चवळी हे गवत महाराष्ट्रात सर्वत्र येणारे पीक आहे.
या पिकास मराठवाड्यात (वरणा) गवत असेही म्हटले जाते. अंतर पीक व वेली सारखे पसरट असल्याने याची लागवड दुभत्या जनावरांना चारा उपलब्ध व्हावा म्हणून करण्यात येते.
- दुभत्या जनावरांसाठी ५० टक्के हिरवा चारा २५ टक्के सुखा तर २५ टक्के मक्याचा भुसा व सरकीचे पेंड द्यावे.
- दुभत्या जनावरांचे वेळेवर लसीकरण करणे.
- दुभत्या पशू साठी स्वच्छ पाणी वेळेवर पाजने.
- वेळेवर औषध उपचार व तपासनी करणे.
- जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवणे ज्यामुळे गुरांचे रक्त पिणाऱ्या किडे व माश्या उत्पत्ती होणार नाही.