IMD Apdate पाऊस राज्यात बरसणार
मागील १ महिना होऊन ही पावसाने विश्रांती दिली होती पण भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पुढील ५ ते ६ दिवसात मेघ गर्जेनेसह पावसाचा अंदाज सांगण्यात येत आहे. IMD हवामान अंदाजानुसार राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची दाट शक्यता वृतवण्यात आली आहे.
मराठवाड्यातही पाऊस पडण्याचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सलग्न एक महिना होऊनही राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाने विश्रांती दिली होती. पण ३ ते ८ सप्टेंबर या कालावधीत राज्यातील सर्वच ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस शक्यता आहे.
Soyabin पिकास पावसामुळे तूर्तास लाभ होईल.
राज्यात सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढ होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक प्रगती वाढवण्याचे ठरत आहे. मागील एक महिन्यापासून पावसाने दिलेल्या विश्रांती मुळे सोयाबीन पिकाची होरपळून जाण्याची वेळ आली होती पण पण बंगालच्या उपसागरात चक्री वादळ निर्माण झाल्याने मराठवाड्यात पावसाची श्यक्यता वर्तवली जात आहे. येण्याचे याचा फायदा राज्यातील शेतकरयांच्या सोयाबीन पिकास होणार आहे.
बंगालच्या उपसागरात चक्री वादळ निर्माण झाले.
भारतीय हवामान अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील सर्वच ठिकाणी म्हणजे कोंकण, पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा,व विदर्भ काही ठिकाणी जोरदार विजेचा कडकडाटासह पाऊस बरसणार असल्याने शेतकऱ्यांना अलर्ट करण्यात आला आहे. असा अंदाज पुणे वेध शाळेने व्यक्त केला आहे.
राज्यात पुढील ४ ते ५ दिवस पाऊस मुसळधार कोसळणार.
बंगालच्या उपसागरात चक्री वादळ निर्माण झाले असून याचा फायदा राज्यातील पिकास होऊ शकतो. भारतीय हवामान खात्याने सांगण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील ४ ते ५ दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल तिथेच पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
श्रावण महिन्यात पाऊस १ महिना विलंब.
ऑगस्ट महिना हा पावसाअभावी निघून गेल्याने राज्यातील तमाम शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले होते. कारण सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात वाढ होऊन सोयाबीन होरपळून जात असल्यानं शेतकऱ्यांना दुष्काळ पडतो की काय असे वाटत होते पण वरून राज्याच्या कृपेने येणं श्रावण महिन्यात पाऊस पडला असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.