Hydroponic Farm System हायड्रोपोनिक शेती आधुनिक प्रणाली.

शेती म्हटल की शेतकरी, काबाड कष्ट, काळ्या मातीचे मेहनत, पाऊस पडतो,शेती मालक उत्साहात पिकाची लागवड करतो, बळीराजा खुश होऊन गोड गुण गान सांगत राहतो काळी धरणी माय साऱ्या जगाला अन्न पुरवते असे सांगत राहत असतो असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही.

पण २१ व्या शतकात तंत्रज्ञान आणि विज्ञान यांच्या सहाह्याने शेती मद्ये अमुलाग्र बदल झाला असल्याने जसा काळ बदलत जातो आहे. तशी काळा नुसार शेती करण्याची नव-नविन पद्धत ही बदलत जात आहे.हायड्रोपोनिक शेती करण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी व जमिनीची आवश्यकता नसते. आधुनिक प्रणाली द्वारे जमिनीच्या वरच्या बाजूला शेती केली जाते. जमिनीच्या वर शेती करत असल्याने मातीचा वापर होत नाही त्यामध्ये फक्त वाळलेल्या नारळाच्या सालीपासून लघु अकाराच्या कणा पासून शेती केली जाते.

(What is The Hydroponic System )हायड्रोपोनिक शेती काय आहे व कशी काम करते.

  • ऐका विशिष्ट हवामानात वीणा माती शिवाय वनस्पती उत्पादन वाढवणाऱ्या तंत्राला हायड्रोपोनिक शेती म्हणतात
  • या सिस्टम मद्ये शेती फक्त नारळाच्या सालीचे छोटे कण, नदिमधील सूक्ष्म वाळू खडीचे मिश्रण करून त्यात पाण्याचा अल्प प्रमाणत वापर करून शेती केली जाते.
  • हायड्रोपोनिक पोषक वनस्पती उत्पादन करण्यासाठी निर्मात्याच्या मार्गदर्शक प्राप्त करून कोथिंबीर,पालक,लसुन, मिरची,मेथी अश्या बऱ्याच वनस्पतीचे उत्पादन घेऊ शकता.
  • साधारण जमिनीत ज्या पद्धतीने खर्च केला जातो त्याच्या फक्त १०टक्के खर्च हायड्रोपोनिक शेतीत येतो व उत्पादन तीन पट अधिक मिळू शकते.

हायड्रोपोनिक फार्म लागवड, प्रकाशमान व्यवस्थापन.

बंदिस्त शेती करत असताना घ्यावयाची काळजी.

१) लागवड.

बियांपासून सुरुवात करत असल्यास तुम्ही निवडलेल्या वाढीच्या मध्यमात पेरा व अंकुर येईपर्यंत ओलसर ठेवावे लागेल एल.

२)हायड्रोपोनिक प्रकाशमान 

आधुनिक प्रणाली साठी प्रमाणात प्रकाश धावा लागतो. इंडोर हायड्रोपोनिक सिस्टम साठी लइडी लाईटचा वापर करावा लागतो.

३) हायड्रोपोनिक व्यवस्थापन.

शेड या कंटेनर मध्ये पिकांचे उत्पादन घेत असताना मुळाना पोषक द्रावण सतत वितरण होत असल्याची खात्री करून घ्यावी. Ph आणि EC तपासून घ्यावे.

४) छाटणी व देखभाल.

हायड्रोपोनिक शेती मध्ये  कोणत्याही मृत किंवा पिवळसर पांनांची छाटणी करून टाकावी ज्यामुळे झाडाची वाढ होईल.

वाढ होऊन पिकाची गुणवत्ता आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढ होईल

५) स्वच्छता.

जो प्लांट हायड्रोपोनिक सिस्टम ने विकसित करायचा आहे.हायड्रोपोनिक सिस्टम स्वच्छ आणि निर्जंतूक असला पाहिजे ज्यामुळे विविध किटाणू तयार होणार नाहीत.

वातावरणाची नियमित देखभाल केल्याने आपण लागवन केलेल्या वनस्पतीचे संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहे.

अन्न पुरवठा व शेतीचे भांडवली करण.

देशातील लोकसंख्या वाढीचे प्रमाण अत्यंत वेगाने होत असल्याने येणाऱ्या पिढीस अन्न साठा कसा मुबलक प्रमाणात उत्पादन करता येईल विविध योजना द्वारे सरकार प्रयत्न करत आहे याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकार हायड्रोपोनिक शेतीस चालना देण्यासाठी सबसिडी मार्फत ही योजना राबवली जाणा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *