Hydroponic शेती कशी करतात 

२१ व्या शतकातील सर्वात मोठी वैज्ञानिकांनी केलेली शोध मोहीम आहे. जागतिक लोकसंख्या वाढीचे काही दुष्परिणाम शेतीवर पडत असल्याने येणाऱ्या कालखंडात Hydroponic शेती ही ग्रामीण तसेच शहरी भागातील लोकांचा प्रमुख उद्योग होऊ शकतो. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या भारतात असल्याने येणाऱ्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा साह्याने शेती हा प्रमुख व्यवसाय होईल.

हायड्रोपोनिक्स शेती फायद्याची आहे..का नाही?

हा शब्द ग्रीक असून पाणी व मातीचा न वापर करता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विशिष्ट वातावरणात वनस्पती तयार करण्याला हायड्रोपोनिक शेती म्हणतात. जर तुम्हाला आधुनिक पद्धतीनी शेती करायची आहे का? तुमच्याकडे शेती नसेल तरीही आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती करू शकता.

  • मुबलक प्रमाणात पाणी व जमिनीची आवश्यकता नसल्याने अगदी तुम्ही अंगणात व टेरेस वर सुधा हायड्रोपोनिक पद्धतीने शेती करून शकता.
  • इजराइल या देशाने या तंत्रज्ञानाचा वापर करून वाळवंटात शेती करण्यास सुरवात केली आहे.
  • देशातील वाढती लोकसंख्या ग्लोबल वॉर्मिंग च्या समस्येला उपाय म्हणून अल्पभूधाक शेतकरी अशाच नव नवीन योजनाचा वापर करत आहेत.
  • युरोप व अखती देशात शेती वरचा भार कमी करून हायड्रोपोनिक शेतीस भर मोठ्या प्रमाणात दिला जात आहे.
  • आधुनिक शेती करण्यास मनुषबळ व इतर खर्च कमी होऊन आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात वाढ होते.

हायड्रोपोनिक शेती  व्यवसायिक नियोजन

१) पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती केल्याने ९०% पाणी कमी प्रमाणात वापर होऊन पाण्याची बचत होते.

२) प्रगत तंत्रज्ञान अवलंब करून घेतल्यास पारंपरिक शेतीपेक्षा ३८% लवकर उत्पादन मिळण्यास सुरवात होते.

३) निसर्गाच्या चक्रावर अवलंबून नसल्याने या पद्धतीने बारा महिने पीक उत्पादन करता येणारी शेती.

४)हायड्रोपोनिक शेती केल्याने कोणत्याही फळ,भाजीपाला व  पिकास रासायनिक औषध व तणनाशक वापर करण्याची गरज पडत नाही.

५) तयार झालेला माल हा उच्च गुणवत्ता असल्याने मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात सहज विकला जाऊ शकतो.

६) यात पारंपरिक शेती पेक्षा ३ ते ४ पटीने अधिक उत्पादन घेता येऊ शकते.

७) राहत्या जागेत छतावर हा प्लांट बसवता येते

हायड्रोपोनिक प्लांट शेती.

विकसित शहरात जागेची अडचण असल्यामुळे हायड्रोपोनिक शेती आणि विज्ञान यांचा अनोखा प्रयोग साधून मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी स्वतःची शेती सांभाळून स्वव व्यवसाय करणाऱ्यांसाठी या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात यशस्वी उद्योजक होण्याचे ठरविले आहे.तर हा कमी पैशात सर्वाधिक नफा देणारा व्यवसाय ठरत आहे.

राज्य शासनाकडून अनुदान योजना.

राज्य सरकार देशातील शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान देण्यात येत आहे. यात हायड्रोपोनिक शेती साठीही अनुदान देण्यात येते आहे.हायड्रोपोनिक तंत्रण्यानाचा अवलंब ज्या शेतकऱ्यांना करायचा आहे. त्या शेतकऱ्यांसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येत.

त्याच प्रमाणे राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून प्रत्येक राज्यातील शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले आहे

हायड्रोपोनिक कॅश क्रॉप.

हायड्रोपोनिक पद्धतीचा वापर करून जमिनीच्या पृष्ठभागावर शेती केली जाते. यात मुख्य उत्पादन हे टोमॅटो,मिरची ,सिमला मिरची, कोबी, गुलाब, काकडी, पालक, धने, कोथिंबीर, कारले अश्या विविध वनस्पतीचे उत्पादन मिळण्यास मदत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *