Drought Marathwada राज्यात दुष्काळाचे सावट.
पावसामुळे खरिपाच्या पेरणीला या वर्षी उशिराने सुरवात झाली असल्याने राज्यातील शेतकऱ्यांसमोर आर्थिक नुकसानीची भीती. वाढली आहे.
मागच्या 4 ते 5 वर्षा पासून पावसाची चांगल्या प्रमाणात वाढ झाली होती पण या वर्षी एल निनो मुळे राज्यात पाऊस उशिराने दाखल झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला मोठे नुकसान होण्याचे चिन्हं दिसत आहे.
दुष्काळग्रस्त मराठवाडा म्हणून नाव जाहीर.
होय राज्यातील सर्वात कमी पावसाचे प्रमाण व दुष्काळी भाग म्हणून मराठवाड्याचे पहिले नाव घेतले जाते. या वर्षी जसे नाव दिसत आहे तसाच पाऊस ही पडत आहे. जर येणाऱ्या 3ते 4 दिवसात पाऊस पडला नाही तर सोयाबीन, कापूस, तूर,उडिद तसेच मूग या पिकाचे नुकसान होणार असल्याने बळीराजा पावसाची आतुरतेने वाट बघत बसला आहे.
परतीच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत
परतीचा पाऊस जर राज्यात उशिराने दाखल झाला तर शेतकऱ्यानं समोर खरीपाच्या पेरणी सारखे रब्बी पिकांच्या ही पेरणीस उशीर होऊ शकतो. या वर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने मान्सूनच्या परतीचा आगमनाची अनिश्चितता शेतकऱ्यांना धस्तावत आहे. मराठवाडा कायमच पावसा अभावी धगधगत आहे.
परतीचा पाऊस म्हणजे नेमंक काय.
हवामान खात्याने देण्यात येणाऱ्या माहिती नुसार राजस्थान आणि पाकिस्तान या वाळवंट भागाच्या सीमावर अँटी सायकलोन तयार होऊन जसे की सायकलोन म्हणजे जास्त दाबाच क्षेत्र तयार होन. जास्त दाबाचे क्षेत्र तयार झाले की हवा समुद्राच्या दिशेने फेकली गेल्यामुळे संथ गतीने प्रक्रिया होते यालाच परतीचा पाऊस म्हणून घोषित करण्यात आले आहे.
राजस्थान ते महाराष्ट्र परतीचा पाऊस केंव्हा दाखल होतो.
राजस्थान पासून परतीचा पाऊस सुरूवात होऊन तो गुजरातच्या क्षेत्रात दाखल होऊन पुढे सरकत असतो. आणि त्यानंतर महाराष्ट्रात दाखल होतो. हा संपू्ण परतीचा आगमनाची तारीख ही राजस्थान मधून १ सप्टेंबर नंतर फिक्स होत असते. १५ ते २० दिवसात राज्यात दाखल होऊ शकतो. या वर्षी पावसाचे सातत्य नसल्याने मराठवाडा तसेच विदर्भातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
पावसा अभावी पिक होरपळून मरून जाण्याची भीती
सायाबिन, तूर,उडीद या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात केली जाते पण पाऊस रुसल्याने सर्व शेतकऱ्यांना चिंता वाढली आहे