Guava पेरू 

राज्यातील मराठवाडा,विदर्भ असो की पश्चिम महाराष्ट्र अनेक जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने शेतीचा कल कमी होउ लागला आहे. नेहमी कमी पावसामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना कोणत्या पिकाची पेरणी करावी चिंता सतावत असते. पारंपरिक शेती कमी होऊन व्यवसायिक शेतीचा कल वाढत जात आहे. राज्य सरकारच्या विविध योजनेद्वारे फळबाग लागवड व्यवस्थापनातून सक्रिय उत्पादन मिळत असल्याने शेतकरी आशावादी दिसत आहेत.

जमीन

पेरू लागवडीसाठी मध्यम ते हलक्या प्रतीच्या जमिनीत लागवड करावी. जमीनीची पोत ६ ते ७ असणे आवश्यक आहे.पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी.

लागवड

पेरूची लागवड करण्याअगोदर आखणी करणे आवश्यक आहे. ज्यामुळे झाडाची वाढ व्यवस्थित वाढेल आणि फांद्या पसरट होण्यास मदत मिळल

  1. ऐका विशिष्ट अंतरावर १० x १०फुटावर २ x २खोलीचे खडे खोदून घ्यावे
  2. खड्यात शेणखत व कुजलेला पालापाचोळा मिसळून रोपांची लागवड करण्यात यावी

 पेरू प्रमुख जाती

  •  तैवान पेरू

देशातील फळ बाजार पेठेत तैवान जातीच्या पेरू सर्वाधिक पसंती ग्राहक व व्यापारी वर्गाकडून मिळत आहे.या पेरूची वैशिष्टे म्हणजे चवीला गोड खाण्यास मऊ मुलायम असल्याने या पेरूची मागणीत वाढ होत आहे.

  •  बनारसी पेरू

चविष्ट अत्यंत गोड उत्तर भारतात सर्वाधिक लागवड व उत्पादन बनारसी पेरू पासून मिळते. हे झाड कमी वर्षात उत्पादन देण्यास तयार होते व या झाडाची उंची १० ते १२ फूट पर्यंत वाढ होते

पेरू खाण्याचे फायदे

पेरू हे फळ देशातील सर्वच ठिकाणी अगदी सहज उपलब्ध असते. या फळा पासून शरीराला अनेक फायदे मिळत असतात.या फळाचा आस्वाद चाखायला सर्वांना आवडतो.

  1. पेरू मद्ये अँटी ऑक्सीडेंटचे गुणधर्म  जे शरीरासाठी खूप फायदेशीर निरोगी हृदय ठेवण्यास मदत होते.
  2. सॉल्यूबल फायबल मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे रक्तातील कोलस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
  3. पोटावरील व शरीरातील चरबी कमी करण्यास मदत मिळते.
  4. नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  5. पेरू मध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे बीपी शुगर त्रास कमी होतो.

लाल पेरू खाण्याचे फायदे

  • लाल पेरूच सेवन केल्याने शरीरातील सोडियम पातळी नियंत्रणात राहते.
  • बीपी चां त्रास असणाऱ्यांसाठी पेरूची पाने रोज सकाळी दोन पाने खात राहिल्याने त्रास कमी होतो.
  • लाल पेरू मधुमेह आजार असणाऱ्या व्यक्तीस अत्यंत लाभदायक ठरत आहे.
  • लाल पेरुमद्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळते.
  • लाल पेरू मद्ये लोह भरपूर प्रमाणात असल्याने याचे सेवन करत राहिले तर शरीराला लोह कमी पडत नाही.

पांढरा व लाल पेरू बाजारामध्ये अगदी वाजवी किंमत मद्ये मिळतो याचे सेवन करत राहिले तर शरीराला आवश्यक असणारे जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *