भुईमूग लागवड
भारतात पिकवल्या जाणाऱ्या तेलबिया पैकी भुईमूग हे शेतकऱ्यांचे सर्वात महत्वाचे पीक आहे. पण मागील काही वर्षापासून भुईमूगाला पर्याय उपलब्ध म्हणून पामतेल, सूर्यफूल, करडई, सोयाबीन, कमी कालावधी व मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळत असल्याने भुईमूग लागवड करण्यास बरेच शेतकरी उत्सुक दिसत नाहीत.लागवडी नंतर पिकाचा खर्च जास्त व मिळणाऱ्या कमी उत्पादनामुळे देशातील भुईमूगाचे क्षेत्र वर्षाकाठी कमी होत चालले आहे.
लागवड तंत्रज्ञान.
जमिन
पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी. मध्यम ते काळी , किंवा लालसर तपकिरी भुसभूसित जमीन असावी उन्हाळयात खोल नांगरट करून कुळवाच्या सहाय्याने दोन ते तीन पाळी घालावे.
पूर्व मशागत.
हे तेल बियाचे गळीत धान्य असल्याने जमीन भुसभुशीत असावी लागते. मूळ जेवढी खोल जाईल व वेलाचा आकार जेवढा पसरत जाईल तेवढे उत्पादन वाढू शकते.
पेरणी.
खरिपातील पेरणी जून जलै मध्ये तर उन्हाळी हंगामात नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात करण्यात यावी.
बियाणे
बियांची पेरणी करण्यासाठी प्रति हेक्टरी १०० ते १२० किलो भुईमूग पेरणी करावी.
१) पसरणारी भुईमूग = या बियांनाच्या पेरणी साठी प्रती हेक्टरी ८० ते ९० कीलो बियानाची पेरणी करावी.
२) टपोरी दाने भुईमूग = या बियांनाच्या पेरणी साठी प्रती हेक्टरी ९५ ते १०० किलो बियाण्याची पेरणी करावी
बीजप्रक्रिया
भुईमूग पेरणी करण्या पूर्वी ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा व ४ ग्रॅम थायरम प्रती १० किलो बियाण्यास चोळावे.तसेच २०० ग्रॅम रयझोबियम प्रती १० किलो बियाण्यास चोळावे.
सुधारित वान हंगाम हे.उत्पादन क्विं
- टी. पी. जी. खरीप व उन्हाळी. १४ ते २०
- जे.एल.२४. खरीप. २० ते २२
- फुले उन्नती. उन्हाळी २२ते २४
- एस. बी. १२. खरीप व उन्हाळी. १७ते २०
- टी.जी.२६. उन्हाळी १४ ते २८
- फुले आर.एच. उन्हाळी १९ ते २२
- जे.एल.५०१. खरीप व उन्हाळी. २३ ते २५
- टी.ए.जी.२४. उन्हाळी. २० ते २२
- कोयना बी ६५. खरीप २२ ते २८
खत व्यवस्थापन.
खरीप हंगामात भुईमूग लागवड करण्यासाठी उन्हाळयात नांगरणी करून शेणखत किंवा कंपोस्ट खत मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल तर हेक्टरी १२ ते १५ टन शेन खत द्यावे. नंतर दोन ते तीन पाळ्या घालून घेतल्याने जमीनीचा P H मात्रा सुधारना होईल.
जमिनीच्या प्रकारानुसार रासायनिक खताची मात्रा द्यावी जसे की २० किलो नत्र ५० किलो स्पुरद द्यावे.
पाणी व्यवस्थापन.
खरीप हंगाम साठी भुईमुगास पाणी व्यवस्थापन करण्याची गरज भासत नाही. पण उन्हाळी हंगामातील भुईमुगास पाणी व्यवस्थापन महत्वाचे ठरते.
पहिले पाणी २१ दिवसांनी (२) दुसरे पानी ४० दिवसांनी तसेच तिसरे पाणी फुल लागल्याच्या नंतर देण्यात यावे.
अंतर पिके
खरीप हंगामात भुईमूग पिका मध्ये अंतर पिकाची पेरणी सर्वत्र केली जाते केली.
१) ४ ओळी भुईमुगाच्या तर २ ओळी सोयाबीन पिकाच्या घेतल्या जातात.
२) ६ ओळी भुईमुगाच्या तर २ ओळी सूर्यफुल पिकाच्या घेतल्या जातात.
३) १ ओळ छोट कारोळ तर ६ ओळी भुईमुगाच्या पेरनी केली जाते.
४) २ ओळी तीळ ६ ओळी भुईमुगाच्या पेरल्या जातात.
वाफा पद्धत
भुईमूग लागवड प्रमुख्याने सपाट जमीनीवर केली जाते.परंतु उत्पादन कमी होत असल्याने बरेच शेतकरी वाफा पद्धतीने लागवड केल्याने उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
भुईमूग सर्वाधिक लागवड करणारे राज्य.
देशात भुईमुगाची लागवड करणारे प्रमुख राज्य १) गुजरात २) कर्नाटक ३) महाराष्ट्र ४) तामिळनाडू ५) मध्यप्रदेश हे भारतातील सर्वाधिक भुईमुगाचे लागवड करणारे राज्य आहेत.
भुईमूग सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य.
भारतात गुजरात हे राज्य सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य आहे. येथील खरीप व रब्बी हंगामात भुईमूग लागवड केली जात असल्याने उत्पादनात वाढ झाली आहे.१) गुजरात २)आंध्र प्रदेश ३)तामिनाडू ४) कर्नाटक ५ महाराष्ट्र