Gram crop हरभरा पीक
महाराष्ट्रात रब्बी हंगामातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक आर्थिक लाभ कमवून देणाऱ्या पिका पैकी एक पीक म्हणजे हरभरा आहे.मराठवाडा व विदर्भात हरभरा पिकाची लागवड दर वर्षी वाढ होत आहे.२०२१-२२ च्या सरकारी आकडेवारी नुसार १९.२० लाख हेक्टर क्षेत्रावर पिकाची लागवड करण्यात आली होती. पण मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी ३.२ टक्के वाढ होईल असे सांगण्यात येत आहे.
जमीनीची प्रत
हरभरा पिकाची लागवड करण्यासाठी जमिन मध्यम ते भारी योग्य पाण्याचा निचरा होणाऱ्या असावी.
हवामान
पिकाच्या पेरणी साठी तापमान १६ ते ३० अंश असेल पाहिजे ज्यामुळे उगविण क्षमतेत वाढ होण्यास मदत मिळते. फुलाचे प्रमाण वाढल्याने उत्पादनात भर पडते.
हरभरा पेरणी पूर्व मशागत
- हरभरा लागवड करण्या पूर्वी शेत जमीन नांगराच्या व ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरून घ्यावे.
- दोन ते तीन कुळवाच्या पाळी घालून जमीन सपाट करून घ्यावी
- शेतात निर्माण झालेला काडी कचरा गोळा करून जमीन स्वच्छ ठेवावे.
- ज्यामुळे बी खोल जमिनीत जाऊन उगवण क्षमतेत वाढ होईल.
- पेरणी करण्याच्या अगोदर प्रति हेक्टरी २ ते २.५ टन कुजलेल कंपोस्ट खत तसेच शेन खताचा वापर करून पेरणीस सुरुवात करावी.
पेरणीचा हंगाम व लागवड पद्धत.
१) हरभरा पेरणीची वेळ ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात केली पाहिजे.
२) दोन रोपांतील अंतर कमीत कमी ५ इंच असले पाहिजे. तर दोन ओळीतील अंतर ३० इंच असले पाहिजे
हरभरा सुधारित जाती
१) जेजी १३० :JG १३० – या वाणाची पक्वता ११५ दिवस ते १२० दिवस आहे.याचे प्रति हेक्टरी उत्पादन १९ ते २० क्विंटल मिळते.
२) विजय : या वाणाची पक्वता कालावधी ९५ ते ११० दिवस असून प्रति हेक्टरी उत्पादन १६ ते १९ क्विंटल मिळते.
३) खेता : वाणाची पक्वता ८५ ते ९० दिवस असून हेक्टरी उत्पादन १२ ते १४ क्विंटल आहे.
४) दिग्विजय : मराठवाड्यात या वाणाची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली जाते कालावधी १०५ ते १०८ दिवस हेक्टरी उत्पादन १५ ते १७ क्विंटल पर्यंत मिळते.
५) विराट : वान परिपक्व होण्यास १०५ ते ११० दिवस लागतात. हेक्टरी उत्पादन १० ते १३ क्विंटल पर्यंत मिळते.
६) विशाल : वाण परिपक्व होण्यास ११० ते ११५ दिवस लागतात. हेक्टरी उत्पादन १४ ते १६ क्विंटल पर्यंत मिळते.
७) साकी ९५१६ : या वाणाची परिपक्वता होण्यास १०६ ते ११० दिवस व हेक्टरी उत्पादन १४ ते १८ क्विंटल पर्यंत मिळते.
८) जाका ९२१८ : वान परिपक्व होण्यास १०३ ते १०५ दिवस हेक्टरी उत्पादन १४ ते १६ क्विंटल पर्यंत मिळते.
९) पी के व्ही ४ : या वाणाची परिपक्वता कालावधी १०२ ते १०८ दिवस आहे.हेक्टरी उत्पादन १२ ते १४ क्विंटल पर्यंत मिळते.
१०) कृपा : हे वान परिपक्व होण्याचा कालावधी १०६ ते ११० दिवस असून हेक्टरी उत्पादन १५ ते १७ क्विंटल पर्यंत मिळते.
पेरणी वेळ
हरभरा रब्बी हंगामातील शेतकऱ्यांचे मुख्य पिक असल्याने या वाणास सप्टेंबर अखेर व ऑक्टोंबर च्या सुरुवातीस हवामान कोरडे व थंड हवा पिकास पोषक लाभदायक मानली जाते म्हणून पेरणीस सुरुवात केली पाहिजे.
बीज प्रक्रिया
पेरणी पूर्वी प्रती किलो बियाण्यास २ ग्रॅम बावेस्टिन व २ ग्रॅम थायरम तसेच २५ ग्रॅम रायझोबीयम आणि ४ ग्रॅम ट्रायकोडम्रा लावून सेंद्रिय गूळ थंड द्रवणा मध्ये मिश्रण करून घ्यावे.
खत व्यवस्थापन
रब्बी हंगामातील हरभरा या वाणाची पेरणी करते वेळी ७ किलो नत्र १३ किलो स्पुरद १० किलो पालाश प्रति एकरी जमिनीच्या प्रति नुसार देण्यात यावे.
बियाणे प्रमाण
१) मध्यम आकाराचे हरभरा बी असेल तर ६० ते ६५ किलो प्रति हेक्टरी पेरण्यात यावे.
२) मोठे दाणेदार बी असेल ९० ते १०० किलो प्रति हेक्टरी पेरण्यात यावे.
१) म पाहिले पाणी – २५ दिवसांनी
२) दुसरे पाणी – ४५ दिवसांनी
३) तिसरे पाणी – ६५ दिवसांनी
तुषार सिंचनाने पाणी दिल्याने पियाची मोठ्या प्रमाणात वाढ होऊन उत्पन्नात भरघोस वाढ होते. जर तुषार सिंचन न वापर करता पाणी दिले असता पीक उंबळून मरून जाऊ शकते.
ऊस पिकाच्या लागवडी मध्ये उन्हाळी हरभरा पिकाची लागवड करण्यात येत आहे.
प्रमुख वाण – विशाल, विराट, दिग्विजय हे वान लागवड करण्यात येत आहेत.