भारतीयांच्या प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये फोडणी देण्यासाठी लहसुन कंद वनस्पती वापर केला जातो.तसेच घरगुती औषिधी गुणधर्मामुळे मानवी शरीरास भरपूर फायदेशीर असल्याने याचा वापर भारतीय मोठ्या प्रमाणात विविध पदार्थ बनविण्यासाठी वापर करता.
बऱ्याच ठिकाणी गावामधील जाणकार व्यक्ती लसूण वनस्पती औषधी आहे म्हणून असे सांगतात ज्यामध्ये खोकला लागला की लसनाला भाजून खाल्याने बरा होतो असेही काही लोकांचे मत आहे.
हे पीक कंद वर्गीय असल्याने भारतीय उपखंडात कंद वर्गीय पिकाचा वापर आहारामध्ये हजारो वर्षापूर्वी पासून करण्यात आला आहे.असे संग्रहालयातील पुस्तकांमध्ये वर्णन करून ठेवले आहे.
जमीन
लागवडीसाठी जमीन भुसभुशीत सपाट पूरक मानली जाते.या कंद मुळ पिकाची लागवड साधारणतः रब्बी हंगामाच्या मध्यास केली जाते ऑक्टोंबर ते नोव्हेंबर महिन्यात लसूण पिकास वातावरण पोषक व उत्पादन वाढीसाठी उपयुक्त मानले जाते.
कोणत्याही पिकाची लागवड करण्यासाठी जमीन उच प्रतीची असली पाहिजे ज्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळू शकते.
लसन लागवडीसाठी जमीन कसदार रासायनिक खताचा वापर केलेली नसावी.
लागवडी साठी जमीन पाणथळ किंवा लाल मातीच्या खडकाळ जमिनीत लागवड करू नये.
लसूण लागवड
ऑक्टोंबर ते नोव्हेंबर या महिन्यात तापमानाचा पारा नीचांकी पातळी वर पोहोचल्याने थंडीचे प्रमाणात वाढ होत असते हे हवामान लसूण लागवडीसाठी योग्य मानले जाते.
लसूण लागवडीच्या दोन पद्धती महाराष्ट्रात वापरल्या जातात
पहिली पद्धत सपाट जमिनीवर लसणाची लागवड केली जाते.
दुसरी पद्धत अशी आहे वाफा पद्धत जमीन सपाट पाणी देण्यास उपयुक्त असेल तर वाफा पद्धत अतिशय उपयुक्त मानली जाते
लसूण लागवड झाल्या नंतर चुली मधील राख किंवा शेणखत बारीक बुगा करून पहिले पाणी देण्याच्या अगोदर शिंपडून द्यावे.
लसणाच्या सुधारित जाती .
फुले बसवंत.
फुले नीलिमा.
यमुना सफेद.
राजेली.
गोदावरी.
यमुना.
भीमा ओमकार
खत व्वस्थापन
लसणाचे उत्पादन वाढवण्यासाठी अधिकाधिक नैसर्गिक पद्धतीने तयार केलेला खत व शेणखत लसूण लागवडीच्या अगोदर टाकून घ्यावे.
हेक्टरी खताचे प्रमाण २५ ते ३० टन जमीनीची मशागत करण्याचा अगोदर जमिनीत मिसळून दिले पाहिजे ज्यामुळे जमिनीची कस वाढू शकते.
उच्च प्रतीच्या जमिनीत लसूण लागवड करण्यासाठी ७५ किलो नत्र ४० किलो स्पुरद ४० किलो पालाश प्रति हेक्टरी जमिनीच्या प्रकारानुसार लागवडीच्या ३० दिवसा नंतर देण्यात यावे.
लसूण खाण्याचे औषधी फायदे
लसणाचे अनेक औषधी फायदे जाणून घेणार अहोत
लसणाचा आहारात समावेश केल्याने शरीरातील गॅस पोटाचे समस्या दूर होतात.
ज्या पुरुषांना व स्त्रियांना कफ खोकल्याचा त्रास आहे अस्यांना लसूण भाजून घ्यावे ज्यामुळे कफ वाढण्याचे प्रमाण कमी होईल.
संधिवात गुडघेदुखी असणाऱ्या व्यक्तीस लसूण खाण्यास दिल्याने हे आजार कमी होण्यास मदत मिळते.
पित्त, कफ, वात असणाऱ्या व्यक्तीने रोज सकाळी लसूण सेवन केल्याने शरीरातील पित्त, कफ, वात संतुलित राहतात.