मत्स्य व्यवसाय
जागतिक हवामान बदलामुळे देशातील पारंपरिक शेतीवर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत येणाऱ्या काळात राज्यातील शेतीला हवामान बदलाचा तोटा मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना सहण करावा लागणार आहे.मत्स्य व्यवसाय राज्यातील अल्प भूधारक शेतकऱ्यांनी काळाची गरज पाहून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना उपलब्ध जलस्त्रोताचा वापर करून कमीत कमी जलाशयामध्ये जास्तीत जास्त मत्स्य उत्पादन करणे फायदेशीर ठरणार आहे.
अश्या व्यवसायास प्रत्येक राज्यातील सरकार मोठ्या प्रमाणात अनुदान जाहीर करत असते.
मत्स्य बीज स्थापना
देशातील सर्व राज्यात मत्स्य बीज केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.मासे पालन करणाऱ्या मत्स्य व्यवसासाठी फायद्याची ठरत आहे. आवश्यक असलेल्या मत्स्य बिजची दर्जेदार कॉमन कॉर्प जातीच्या माश्याचे बीज देशातील २८ केंद्रावर उगवनी केंद्र आहेत.
तलाव आखणी
मत्स्य पालन करण्यासाठी तलावाची निर्मिती सर्वात महत्वाची ठरते ज्यामध्ये तलाव क्षेत्र २० गुंठे असणे आवश्यक आहे.व तलावाची उंची २ मीटर असली पाहिजे.
तलाव शक्यतो नदी, ओड्या, जवळ नसला पाहिजे. तलाव शेजारी वीज , वाहतूक, मनुष्यबळ कायम उपलब्ध असेल पाहिजे. मत्स्य पालन करण्यासाठी तलावाचे व माश्याचे व्यवस्थापन अत्यंत बारकाईने करने आवश्यक त्यावरच तुमचा नफा अवलंबून असतो.
oxigen ऑक्सिजन
मासे वाढ होण्यासाठी ऑक्सिजन नियोजन महत्वपूर्ण भूमिका निभावत असते. जर पाण्यात पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध नसेल तर मासे वाढ वोण्यास वेळ लागू शकतो.
याचे परिणाम उत्पादनात व वजनात घट पडू शकते म्हणून पाणी हे उंचीवरून खाली सोडण्यात यावे. ज्यामुळे पाण्यात ऑक्सिजनचे बुडबुडे तयार होतील.
गोड्या पाण्यातील मत्स्य पालन
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा मार्फत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत लाभ घेता येणार आहे.
- गोड्या पाण्यातील अती वेगाने वाढ होणाऱ्या जाती तलावात सोडणे
- रोहू, मृगळ, कटला कोळंबी इत्यादी जाती वेगाने वाढणाऱ्या प्रजाती आहेत.
- मोठ्या प्रमाणावर पाणी साठा असेल तर अश्या शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पादन वाढवण्यासाठी गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.
- पाण्याचा साठा किमान ८ ते १० महिने पुरेल एवढा असेन आवश्यक आहे.
- मत्स्य व्यवसाय करण्यासाठी तलावाची दुरुस्ती व चौकोनी बांधलेली असावी ज्यामुळे मासेमारी करण्यास सोपे होईल.
- शेत तळ्यातील पाण्याचे तापमान मुख्यतः २२ ते ३७ डिग्री सेल्सिअस असणे आवश्यक आहे.
- पाण्यात नैसर्गिक खाद म्हणून शेणखताचा वापर करावा जसे की १ टन शेखत १५० किलो चुना टाकल्याने कोळंबी व मासे वाढ होण्यास फायदा होईल.
- मासे च्या प्रजातीनुसर ३० टक्के रोहू ३० टक्के मृगळ आणि ४० टक्के कटला शेत तळ्यात सोडून द्यावे
मासे खाद्य कोणते वापरावे
पशू, पक्षी,व जलचर प्राणी व्यवसाय करण्यासाठी सर्वात महत्वाचे खाद्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक असते. मासे,कोळंबी, किंवा खेकडे यांचे कमी दिवसात भर्गोच उत्पादन मिळविण्यासाठी योग्य प्रमाणात खाद्य आवश्यक आहे.
- तलावात मासे वाढ करण्यासाठी पोष्टिक खाद्य पुरवणे महत्वाचे घटक आहे.
- खाद्य पुरवणी करत असताना गायचे शेन महत्वाचा आहार ठरतो ज्यामुळे मासे वाढ लवकर होते.
- कोंबडी व बदकाचे विष्टा मत्स्य पालनासाठी उपयोगी ठरतो.
- शेळीच्या लेंड्या पाण्यात विरघळून सोडाव्या.
- तांदळाचा बारीक चुरा, गहू तुकडे, मका भरडा, शेंगदाणा ढेप
- सोयाबीन पीठ, मका पीठ हाही खाद्य पदार्थ मानून समावेश केला पाहिजे.
प्रमुख मासे बियाणे कोणते
Rohu Fish रोहू :-
रोहू ऐक गोड्या पाण्यातील जलचर प्रजातीचा मासा असून हा मासा १४ ते ३२ सेल्सिअस पाण्यात १० ते १२ महिन्याच्या काळात ३० ते ३३ सेमी पर्यंत वाढ होतो वजनात ७०० ग्रॅम ते ८०० ग्रॅम पर्यंत वाढ होण्याची शक्यता असते.
Katla Fish कटला :-
कटला हा मासा गोड्या पाण्यातील सर्वात वेगवान वाढणारा मासा आहे. प्रति वर्षी हा मासा १ किलो पेक्षा जास्त वजनात वाढू शकतो. गोड्या पाण्याच्या तलावात वरच्या थरला वावरणारा हा मासा गोड्या पाण्याच्या प्रवाहात संगोपन केला जाणारा मासा आहे.
ग्रामीण भागातील शेतीस चालना
1) www.dbt.mahapocra.gov.in नानाजी देशमुख कृषी संजीवनी समिती मार्फत गाव खेडेगाव कुटुंबातील व्यक्तीस मत्स्य पालन शेततळे लाभ घेण्यास वरील योजने मार्फत दिलेल्या संकेत स्तळावर नोंद करणे आवश्यक आहे.
२) मराठवाडा कमी पावसाचा भुबाग असल्याने शेती व्यवसाय परवडणारा नसल्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऑरगॅनिक पद्धतीने मासे पालन व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.