भारत देश हा पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने शेती करून पिकाचे उत्पादन घेणारा जगतील सर्वात जुना देश म्हंटले तरी चालेल हो जंगल वन समृध्द पद्धतीने जपल्याने कुजलेला झाड पाला सरपान नियमित शेतीत वापर करून शेती जिवंत ठेवलेले शेतकरी आजही उपलब्ध आहेत.आजही बऱ्याच राज्यात वीणा कोणत्याही रासायनिक खतांचा उपयोग न करता बऱ्याच पिकांचे उत्पादन याच जंगलातील पाला पाचोळा खत स्वरूपात व जमीनीच्या मशागतीसाठी व शेतीसाठी मुख्य घटक म्हणून वापरात घेतले जात आहे.
भारतातील माती सर्वाधिक सुपीक
भारत उष्ण कटिबंधात असल्यामुळे तिन्ही ऋतुं मधील हवामान व ऋतुमधील अंतर हे शेती साठी पूरक मानले जाते.सर्वप्रथम भारताचे भूविज्ञान वैविध्यपूर्ण असल्याने येथील जमिनी मध्ये विविध प्रकारचे खडक, खनिज, मातीची रचना, हवामान, कृषी पद्धती या सर्व घटकांमुळे भारताची माती सुपीक मानण्यात आली आहे.
मातीचे प्रकार किती.
देशातील जमीन वैविध्यपूर्ण आहे ज्यामुळे विविध प्रकारचे खडक, खनिजे आणि मातीची रचना समाविष्ट आहे. या विविधतेचा परिणाम काळी माती, लाल माती, गाळाची माती, चून खडी अश्या विविध मातीच्या प्रकारांमध्ये होतो, प्रत्येकाची विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत.
पारंपारिक कृषी पद्धतींनी मातीची सुपीकता सुधारण्यासाठी शेणखत, कंपोस्ट आणि हिरवे खत यासारख्या सेंद्रिय पदार्थांच्या वापरावर दीर्घकाळ भर दिला जातो म्हणून मातीची गुणवत्ता अधिक प्रमाणात टिकून राहून भुसभुशीत होऊ शकते.
भारतीय शेतकऱ्यांना हे लक्षात घेण्यासारखे आहे की भारतातील सर्व राज्यातील माती एकसमान सुपीक नाही काही राज्यामधील मातीची धूप, पोषक तत्वांचा रास आणि अनिश्चित शेती पद्धती व जंगलतोड आणि इतर पर्यावरणीय घटकांमुळे मातीशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जसे की महाराष्ट्रातील मराठवाडा या ठिकाणी मातीचा दर्जा सर्वाधिक उपजाऊ आहे पण नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभाव व पर्यावरणाचा होणारा रास आणि कमी पर्जन्यमान याचे विपरीत परिणाम सुपीक प्रदेशावर ही होतो.
मातीची सुपीकता कमी का होत आहे.
बहुतांश पोषक आणि इतर फायदेशीर मातीपासून मिळणारे घटक, मातीला पोषक द्रव्ये झाडांपासून किंवा पाला पाचोळा स्वरूपात मिळत राहतो तर काही प्रमाणात विशेषतः झाडांच्या मुळांपासून मिळतो. अनेक देशांमध्ये जंगल तोडीचे परिणाम आपण पाहतो आहे. ज्यामुळे पुरेशी झाडे काढून टाकल्याने निसर्गावर होणारा मानवी अत्याचार आणि रोखण्यासाठी योग्य पाऊले उचलली पाहिजे.