Fenugreek मेथी

पलेभाज्या कुटुंबातील सर्वात जुनी वनस्पती मेथी मानली जात आहे. मेथीचे उगमस्थान भारत आणि आफ्रिकेत मानले जाते भारतीय पालेभाज्या सर्वाधिक पसंती मेथिला देण्यात आली आहे. येथील प्रत्येक घरामध्ये आवडीने खाल्ली जाते.भारतीय बाजारात तिन्ही ऋतूत सहज उपलब्ध होत असल्याने मेथी मानवी आरोग्यासाठी अनेक फायदे सांगण्यात आले आहे.

मेथी खाण्याचे फायदे

 अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणून मेथी भिजवून व त्याचे चूर्ण करून वापरली जाते. जसे की मेथीच्या दाण्या मध्ये अनेक गुणकारी पोषक तत्व व्हिटॅमिन डी,व्हिटॅमिन सी, फायबर लोह,कॅल्शियम, सोडियम, या पासून शरीरास आवश्यक असणारे पोषक तत्वे मिळतात.
  1. मेथी दाण्याची पावडर करून संध्याकाळी गरम कोमट पाण्यात टाकून पिल्याने डोक्यातील कोंडा व केस गळण्याच्या समस्या दूर होतात 
  2. मेथीच्या बिया भिजवून खात राहिल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.
  3. मधुमेह असणाऱ्या व्यक्तीस अत्यंत लाभदायक ठरते.
  4. शरीरात ज्या व्यक्तींना रक्त कमी असेल त्या व्यक्तींना रक्त वाढवण्यासाठी मेथी फायदेशीर ठरते.
  5. शरीरातील कोलेस्ट्रॉल व डायबिटी कमी करण्यासाठी मेथीचा वापर केला जातो.

भिजलेली मेथी खाण्याचे फायदे

  •  बियामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असल्याने मानवी  बद्धकोष्ट्ट आजारापासून मुक्तता मिळू शकते.
  • मूळव्याध असणाऱ्या व्यक्तीस व संडास साफ होत नाही अस्या व्यक्तीस सकाळी कोमट पाण्यात मेथी पावडर टाकून पाणी पिण्याने त्रास कमी होऊ शकतो.
  • वजन नियंत्रित राहते.
  • मेथीच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील गॅस, इतर पदार्थ, विष्टा बाहेर काडण्यास मदत मिळते.
  • उकळलेल्या मेथी पाणी प्यायल्याने केस गळतीचे प्रमाण कमी होते.
  • मेथीचे दाणे चाऊन खाल्याने हडतील सांधेदुखी कमी होऊ शकते

हिरवी मेथी पालेभाजी खाण्याचे फायदे

  1.  हिरवी मेथी भारतीय पालेभाज्या मधील अग्रगणंनी प्रमुख पालेभाजी आहे.
  2. ९० दिवसा मधे येणारी मेथी भारतीयांच्या आहारातील मुख्य वनस्पती मानली जाते.
  3. या वनस्पतीच्या सेवनाने शरीरातील अनेक विकारांची समस्या दूर होते.
मागील काही दशकापासून आहारात झालेल्या बदलामुळे सर्व सामान्य माणसाच्या शरीरात संधिवात आजार बहुतेक जणांना सतावत आहे. मेथीचे सेवन नियमित करत राहिल्याने या आजारापासून बचाव होऊ शकतो.

मेथी पाणी पिण्याचे फायदे

मेथी पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत.
१) फायबरचे प्रमाण मेथी असल्याने याचे शरीराला मोठे फायदे मिळतात
२) वजन नियंत्रित ठेवण्यासाठी गरम पाण्यात मेथी पावडर टाकून प्यायल्याने वाढते वजन नियंत्रित राहू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *