देशातील साखरेचे दर वाढू नये म्हणून इथेनॉल निर्मिती बंद
ऊस राज्यातील व देशातील शेतकऱ्यांचा कणा असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही शेतकऱ्यांना सर्वाधिक आर्थिक लाभ याच पिकापासून मोठ्या प्रमाणत मिळतो. ज्यामुळे शेतकरी ऊस लागवड करण्यासाठी सर्वात जास्त प्राधान्य दिले जाते.
देशातील साखरेचे भाव नियंत्रणाखाली ठेवण्यास व देशांतर्गत साखरेचा पुरवठा अभादित राहिला पाहिजे म्हणून केंद्र सरकारच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. साखर नियंत्रणात रहावे यासाठी १९६६ रोजी कायदा निर्मिती केली होती. त्याच कायद्या अंतर्गत केंद्र सरकारने इथेनॉल नर्मितीसाठी बंदी घातली आहे.
इथेनॉल कसे तयार केले जाते
उसाच्या रसाला येका विशिष्ट तापमानात तापवले जाते ज्या पासून गूळ व साखर तयार होण्याच्या अगोदर मळी व अन्य ज्वलनशील पदार्थ तयार होतात. त्यावर प्रक्रिया करून इथेनॉल निर्मिती केली जाते.
हे पदार्थ ज्वलनशील असल्यामुळे याचा वापर पेट्रोल आणि डिझेल मद्ये मिसळून इंधनात वापरले जाते.
शेतकऱ्यांना इथेनॉल निर्मितीचा फायदा
२०१४ ते २०२२ या वर्षात इथेनॉल निर्मिती साठी सुवर्णकाळ मानला जातो. कारण याच वर्षात पेट्रोल व डिझेल चा पर्याय म्हणून इथेनॉल कडे पाहिले जात होते.
- मागील दशकात भारतात सर्वाधिक इथेनॉल निर्मिती झाली आहे
- उसाचे प्रमाण वाढले ज्यामुळे इतर शेतकऱ्यांना हमीभाव मोठा मिळत गेला.
- इथेनॉल निर्मिती मुळे शेतकऱ्यांचे वेळेवर हफ्ते देण्या आले.
- २० टक्के इथेनॉल निर्मिती व मिश्रण करण्यास मंजुरी ज्यामुळे ऊस उत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीची भीती नाही
- २६ लाख मेट्रिक टन ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्यात यश मिळवले.
इथेनॉल बंदी मुळे शेतकऱ्यांचे नुकसान
- देशातील वाढत्या डिझेल पेट्रोलच्या किमती मुळे इथेनॉल निर्मिती करणे सरकारनेच योजना आखली होती.
- राज्यातील शेतकऱ्यांनी मागील काही वर्षांपासून सातत्याने ऊस उत्पादन वाढवले होते .
- इथेनॉल बंदीच्या निर्णयाने शेतकऱ्या समोर ऊस प्रश्न अनेक संकट उभे राहू शकतात.
- या वर्षी महाराष्ट्रात कमी पाऊस झाल्याने व इथेनॉल बंदी मुळे शेतकऱ्यांचा ऊस राना बाहेर पडले का याचीही भीती आहे.
- इथेनॉल निर्मिती साठी केंद्रीय मंत्री यांनी साखरेचे उत्पादन थांबवून इथेनॉल निर्मिती सुरू केले पाहिजे असे सांगण्यात आले होते.
- पण या निर्णयामुळे शेतकरी व इथेनॉल निर्मिती करणाऱ्या उद्योगांना चांगलाच फटका बसू शकतो.
- साखरेचा रस व सीरफ यावर ७ डिसेंबर महिन्यात बंदी घालण्यात आली आहे.
बंदीचा निर्णय शेतकऱ्यांना इतर पिकाची आस
या वर्षी देशात इथेनॉल बंदी करण्यात आल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे ऊस लागवडीचे क्षेत्र कमी होईल ज्यामुळे इतर पिकाची लागवड करणे जे कमी पाण्यावर अवलंबून आहेत अशा पिकांना शेतकऱ्यांनी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
- या वर्षी पाऊस कमी झाल्याने भविष्यात शेतीस पाणी टंचाई निर्माण होऊ शकते.
- एल निनो मुळे २०२३ मध्ये भारतावर गंभीर परिणाम दिसू शकतील असे सांगण्यात आले होते
- वातावरणात होणाऱ्या बदलामुळे मान्सून जर कमकुवत झाला तर याचा सर्वात मोठा तोटा कृषी पिकावर होईल.
- याचे परिणाम ऊस लागवड व इतर पिकावर ही दिसू लागतील