ज्या वेळी देशात अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ होते अशाच वेळी अन्नधान्य चलनवाढ रोखणे या बाबी येतात. तेंव्हा सरकार स्वतःला मागेपुढे पाहत नसते. परिणामी अन्नधान्याच्या बाबतीत सरकार धोरणात्मक बदल करते.

शेतकऱ्यांच्या कृषी निर्यात मालावर बंदी –किंवा निर्यात शुल्कात वाढ.

देशातील पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्यांनी केलेल्या कडधान्याच्या उत्पादनावर सरकारने धोरणात्मक घातलेली बंदी निर्यात शुल्कात केलेली वाढ देशातील शेतकऱ्यांना मिळणार हमीभाव या पिकाचा परतावा कमी होऊ शकतो.

सरकारने कमोडिटी ट्रेडिंग वर काही कालावधीसाठी केलेल नीलंबन ज्यामुळे घाऊक बाजारपेठेच्या भावात अस्थिरता येऊन हमी भावात नरमाई येऊ शकते.

खरीप व रबी हंगमातील उत्पादनात घट.

  1. या वर्षी सरकारच्या धोरणानुसार देशातील शेतकऱ्यांच्या कडधण्यास हमी भाव मागील वर्षी सारखेच जैसेथे तैसेच राहणार. सरकारचे धोरणात्मक हस्तक्षेप उत्पादन डेटावर अवलंबून असतात परंतु सरकारने खरीप व रब्बी हंगामातील लागवडीचा डेटा संशयास्पद जाणवतो.

देशातील बाजाराची लागवडीची गतिशीलता तसेच जमिनीवरच्या लागवडीची वास्तविकता यामध्ये साम्य कधीच दिसत नाही.२०२१ ते २०२३ मधील खरीप आणि रब्बी कापणी व मिळणारे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात मागील वर्षी पेक्षा जास्त सांगितले जाते परंतु वास्तविक परिस्थिती हे खरोखरच बेताचीच आहे. आहे पेरणी उशिराने झाल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने या वर्षी खरीप उत्पादनात घट होणार पण हीच बाब सरकारी आकडेवारी मोठ्या प्रमाणत उत्पादन सांगत आहे.

मान्सून दडी व एल निनो मुळे राज्यात रब्बीचे उत्पादनात घट.

देशातील मान्सून ची प्रगती कमी प्रमाणत वाढ झाल्याने तांदूळ,गहू, अन्य कडधान्याचे उत्पादन कमी होणार असल्याने वाणिज्य मंत्र्यांनी दुसऱ्या देशांना पाठिवण्यात येनाऱ्या मालावर बंदी घातल्याने याचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या भारतात येणाऱ्या भविष्यात अन्नधान्य पुरवठा कमी पडू नये म्हणून निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे

२०२३ तांदूळ गहू निर्यातीवर बंदी.

तांदूळ गहू व अंन्य कडधान्य शासनाने बंदी घातली असल्याने सरकारच्या उत्पादनाची आकडेवारी खरोखरच वास्तववादी आहे का? उत्पादनाची आकडेवारी खरच वास्तववादी असती तर देशाला या विविध पिकाची गरज का भासत आहे. खाजगी अंदाजानुसार गव्हाचे  उत्पादन हे ९० ते १०० दश लक्ष टन आहे पण २०२३ पासून याच सरकारे गव्हावर बंदी घालण्यात आल्याने शेतकरी नाराज दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *