सुखलेला मराठवाडा सर्वाधिक कमी पावसाने ग्रासलेला प्रदेश
जागतिक पर्यावरण बदलाचे परिणाम देशातील अनेक राज्यात दिसू लागले आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक सुपीक जमीनीचा भाग मराठवाडा अनौपचारिक रित्या पावसा अभावी ग्रामीण अर्थव्यवस्था व छोट मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
पर्यावरण बदलामुळे कृषी क्षेत्रावर गंभीर परिणाम दिसत आहेत. शेतकऱ्यांना नियमित हवामान बदलामुळे शेती व शेतीवर अवलंबून असणारे व्यवसाय करने कठीण जात आहे.
दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील स्थलांतर वाढणार
अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा,उदरनिर्वाह ग्रामीण भागात भागत नसल्याने शेत मजूर व लघु शेतकरी मुंबई पुणे शहरात उपजीविका भागवण्यासाठी वास्तव्यास जात आहे. मराठवाड्यातील शेती पूर्ण पने पावसावर अवलंबून असल्याने मागील काही वर्षांपासून स्थलांतर होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
स्थलांतर होण्याचे प्रमुख कारण
१) शेतीला अपुऱ्या सुख सुविधा.
२) अपुऱ्या सिंचन सुविधेचा अभाव.
३) पर्जन्यमान कमी होण्याने शेतीचे उत्पादन घटले.
४) रासायनिक खत,बियाणे, कीटकनाशके किमतीत वाढ.
५) शेती मालास मिळणारे कमी हमीभाव.
कमी प्रजण्यमान प्रदेशात ऑरगॅनिक शेती ची गरज
जागतिक पर्यावरण बदलामुळे कृषी क्षेत्रात भारतासारख्या घनी लोकसंख्या असलेल्या अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
- आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऑरगॅनिक शेती पिकवली तर उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते.
- रासायनिक खतांचा व कीटकनाशक औषधे खर्च कमी होणार
- हायड्रोपोनिक शेतीचा अवलंब ज्यामुळे पाण्याची ७५ ते ८० टक्के पाण्याची बचत होत.
- नैसर्गिकरीत्या शेती पुनर्जीवित करने ज्यामुळे पर्यावरणावर कोणतेही परिणाम होणार नाहीत.
एल निनो २०२३
एल निनो म्हणजे ही एक हवामान घटना आहे जी विशेषतः प्रशांत महासागर प्रदेशात आढळते. याचा अर्थ एक प्रकारचा थंड वाऱ्यांचा जास्तीत जास्त प्रवाहाला ‘चक्रीवादळ’ म्हणतात.
जे वातावरण बदलू शकते आणि वेगवेगळ्या भागातील हवामानात बदल घडवून आणू शकते. या वातावरणीय घटनेमुळे अनेक देशांमध्ये हवामानात बदल होतो. ज्याला एल निनो म्हणतात.
पावसाचे कमी प्रमाण व घटते उत्पादन ऐक चिंतेची बाब
मागील दोन ते तीन वर्षापासून खरीप असो या रब्बी हंगाम बहुतांश पिकाचे उत्पादन घटले आहे.
घटत्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. ज्यामुळे जमिनीतील पोषक तत्वे कमी होऊन जमीनीचा कसही कमी होऊ लागल्याने उत्पादनात घट झाली आहे.
शाश्वत सेंद्रिय पद्धतीने शेती केल्याने देशातील पूर्वेकडील राज्याचे उत्पादन भरपूर प्रमाणात वाढले आहे जसे की आसाम, मिझोराम, अल्प भूधारक शेतकऱ्यांनी हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीत उत्पादन वाढ करायचे असेल तर भारतीय नैसर्गिक, सेंद्रिय शेतीचा अवलंब केला पाहिजे.
ग्रामीण शेतीचे पर्यावरण रोजगार निर्मिती.
- भारतीय शेतीत सुमारे २५ करोड लोकसंख्येला रोजगार मिळवून देणारी आहे.
- ८० टक्यांहून अधिक शेतकऱ्यांना ४ एकर पेक्षा कमी जमीन आहे
- मजुरांच्या हाताला आणि रोजी रोटीला आधार देणारी जगातील सर्वात मोठा कृषी रोजगार योजना ग्रामीण भागात रुजलेली आहे.
- दिवसेंदिवस हवामान बदलामुळे शेती वर अवलंबून राहणे कठीण झाले आहे.
- वाढते कर्ज, स्थलांतर, आत्महत्या, इतर खर्च वाढल्याने शेती करणे कठीण झाले आहे.
- तापमान वाढीचा आर्थिक फटका देशातील भात व खरीप हंगाम शेतीला बसला आहे.
- जो पर्यंत शेतीच्या प्रथम समस्या समजत नाहीत तोपर्यंत त्यांना शाश्वत नैसर्गिक शेती समजणार नाही.
ज्यावेळी ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारेल किंवा शेतकऱ्यांच्या नैसर्गिक रीत्या उत्पादन केलेल्या मालास स्थानिक पातळीवर किंवा बाजार
पेठेत भरभराटी आली तर गाव सोडून जाणार अल्प भूधारक शेतकरी परत पारंपरिक ग्रामीण जीवनाकडे पाहण्याचा आनंद होईल.