२०२३ या वर्षातील चक्रीवादळ
जागतिक हवामान बदलामुळे देशात चक्रीवादळ आणि टायफून असे अनेक उष्णकटिबधीय चक्रीवादळ व नवनवीन नावे समोर येत आहे. जागतिक हवामान संघटनांनी असे अनेक नावी दिली आहेत.
मागील दशकापासून जागतिक पर्यावरण बदलामुळे कृषी क्षेत्रावर गंभीर परिणाम दिसू लागले आहेत.चक्रीवादळे अनेक बिन मोसमी पावसाने शेतकऱ्यांना आर्थिक संकटात सोडले आहे. याचे परिणाम देशातील फळबाग लागवड बागायत दार शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. ज्यामध्ये द्राक्षे, केळी, अंबा, सीताफळ, पेरू,आणि डाळिंब अश्या अनेक फळबाग अवकाळी पावसात पुर्णतः नुकसान झाले आहे.
१)मोचा चक्रीवादळ Cyclone Mocha
हे चक्रीवादळ बंगालच्या खाडीमध्ये मे महिन्यात १० तारखेला या वादळाची सुरुवात झाली होती ते हळू हळू वादळाचे रूपांतर चक्री वादळात झाले होते.१४ ते १६ मे गुजरात,महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणी मोच्या वादळाचे बायावह रूप पहावयास मिळाले होते.
या वादळामुळे राज्यात मोसमी पाऊस विलंबाने सुरवात झाले ज्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी उशिरा करावी लागली होती.
२) बिपरजॉय चक्रीवादळ Cyclone Biparjoy
- ६ जून या महिन्यात हिंद महासागरात चक्रीवादळ निर्माण झाले
- वादळाला बिपरजॉय असे नाव देण्यात आले होते.
- वादळाचा वेग तशी १७० प्रती किलोमीटर पर्यंत वाढ झाली होती
- ज्यामुळे देशातील किनारपट्टी लगत असंख्य शहरांना आर्थिक नुकसान झाले होते.
- राज्यात नव्हे अनेक देशात बिपरजॉय वादळाने भारत, बांगलादेश म्यानमार, पाकिस्तान, भूतान, या किनारपट्टीला चक्रीवादळाने मोठे नुकसान फोहचवले होते.
- तसेच या चक्री वादळाचे परिणाम भारतीय मान्सून वर दिसून आला होता
- बिपरजॉय वादळामुळे राज्यात मान्सून उशिराने दाखल झाला होता.
३) मिचॉन्ग चक्रीवादळ
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने या वादळाचे रूपांतर आत्ता चक्रीवादळात निर्माण झाले आहे.व मोठ्या प्रमाणात अती वेगाने वारे वाहत आहे.
पश्चिम बंगाल,ओडिशा, आंध्र प्रदेश ,तमिळनाडू किनारपट्टी भागात भागात या पावसाने थैमान घातले असून सुमारे वारा १०० ते १२० प्रतीतास वेगाने वाहण्याचा अंदाज IMD कडून सांगण्यात आला आहे.
महाराष्ट्रात तूर हरभरा ज्वारी पिकाचे नुकसान होऊ शकते
हवामान बदलाचे संकेत मागील काही वर्षा पासून स्पष्ट दिसत आहेत.मिचॉन्ग चक्रीवादळ तर महाराष्ट्रातील अनेक बागायतदार शेतकऱ्यांना धसका भरवत आहे.
द्राक्ष, केळी, कांदा, तूर, मकई, हरभरा या पिकांना नवनवीन चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. याची भरपाई करने शेतकऱ्यांना कठीण जाणारे आहे.
पीक हुरड्यात आणि पावसाचा हाहाकार
तूर:- हे पीक राज्यातील शेतकऱ्यांचे लाल सोने आहे. पण मिचॉन्ग वादळाने शेतकऱ्यांना हतबल करून ठेवले आहे. अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने तूर हे पीक पिवळसर पडल जात आहे.
हरभरा:- बहुतांश जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील मुख्य पिक म्हणजे हरभरा आहे. बेसुमार पावसाने हजेरी लावली असल्याने हरभरा पिक या वर्षी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.