सीताफळ लागवड योजना.Custerd apple
कोरडवाहू फळ झाडांमध्ये सीताफळ हे महत्वाचे पीक आहे. मराठवाडा विदर्भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने सीताफळ लागवड शेतकऱ्यांना शेती आर्थिक उलाढाल करणारे पीक आहे. सीताफळ हे पीक हलक्या पानी निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये लागवड केली जाते. मराठवाडा कायमच दुष्काळ ग्रस्त म्हणून ओळखला जातो येथील पर्जन्यमान कमी कोरडवाहू असल्याने सीताफळ पिकाचे नियोजन करणे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.सीताफळ हे सर्व सामान्य गरीब नागरिकांना परवडणारे असल्याने याचे दर कमी प्रमाणात वाढ होतात. सीताफळ हे ग्रामीण भागातील रानमेवा आहे.
सीताफळाची लागवड प्रामुख्याने भारतातील सर्वच राज्यात केली जात असून पण आंध्रप्रदेश,महाराष्ट्र,गुजरात,
२) सीताफळ औषधी उपयोग.
सीताफळ हे मधुर फळ असल्याने लहान लेकरा पासून वृद्ध वयातील व्यक्तीला सहज पचन होणार असल्याने नुसता किंवा दुधात मिसळून त्याचे सरबत किंवा ज्यूस करून पिले जाते.
३)सीताफळ लागवड
सीताफळ लागवड ही हलक्या डोंगर उताराच्या जमिनीवर तसेच माध्यम मुरबाड जमिनीवर ५मीटरx ५मीटर आकाराचे खड्डे खोदुन तळाशी ,पालापाचोळा,शेंद्रिय खत चांगल्या काळी मातीचा थर वरती टाकून खड्डा भरून घ्यावा.
सुरवातीच्या तीन वर्षात सीताफळ लागवड झाल्यानंतर फळ बागेत कडधान्य व कांदा,मुग,चवळी,सोयाबीन,गवार,काकडी,बीट या अल्प मुदतीच्या पिकाची लागवड करून सीताफळ लागवडी सोबत या पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो.
४)सीताफळ लागवड पोखरा योजने अंतर्गत
- महाराष्ट्रातील हवामानाचा विचार कराल तर सीताफळ लागवड करण्यास भरपूर वाव आहे.
- उष्ण व कोरड्या हवामानातील सीताफळ हे अतिशय गोड व उत्कृष्ट दर्जाचे असते.
- कोकणासारख्या दमट वातावरणात सीताफळ येतात पण आकाराने गोल व कमी आकारमान तयार होतात.
- या फळांना दर हा नेहमीच चांगला मिळत जात आहे.
- सीताफळ लागवड पोखरा योजने अंतर्गत अर्ज करून मीळवू शकता.
५)सीताफळ बागेची निगा कशी करावी
१) सीताफळाची रोपे लावल्यानंतर रोपे मरण पावतात जी रोपे मरण पावली आहेत ती पुन्हा रोपे भरून लावावी
२)खुरपणी करून बागेतील टन काढावेत
३)रोपे लहान असतांना पावसाचा तान कमी पडल्यास ड्रिपने पानी देण्यास सुरवात करावी.
४)झाडाची वाढ जोरदार होण्यासाठी व फळांचे चांगले उत्पादन मिळवण्यासाठी बागेची छाटणी करून टाकावी.