जीरा

भारत देश मसला उत्पादन करण्यात जागतिक क्रमवारीत इतर देशाच्या तुलनेत अवल क्रमांकावर पोहचला आहे. होय इतर देशाच्या तुलनेत देशातील मसाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.आज याच मसाल्याच्या पदार्थांपैकी जीरा मसल्याचे उत्पादन मागील काही वर्षात राजस्थान ,महाराष्ट्र ,मध्य प्रदेश ,कर्नाटक , तामिळनाडू व उत्तर प्रदेश, गुजरात ,या राज्यामध्ये बागायती जिऱ्याची लागवड व  व्यवसायिक शेती म्हणून सदन शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत.

जमीन

लागवड करण्यासाठी जमिन हलक्या ते मध्यम प्रतीची असणे आवश्यक आहे व पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी जमीनीचा पी एच मात्रा ६ ते ६.५ असावी

 लागवड

भारतात रब्बी हंगामात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणीस सुरूवात केली जाते.हे पीक पूर्ण ९० दिवसाचे असल्याने अतिरिक्त उत्पादन मिळवण्यासाठी जमीनीची कुशल पद्धतीने मेहनत घ्यावी लागते.

प्रति एकरी शेणखत ४० ते ४५ गाड्या विखरून टाकावे ज्यामुळे जमीनीची पोत कस वाढ होईल व पीक दर्जेदार येऊन पीक उत्पादन वाढू शकते.

जीरा  मुख्य जाती

देशात जीरा लागवड करण्यासाठी विकसित केलेल्या जाती व प्रति हेक्टर मिळणारे उत्पन्न.

प्रजाती                        उत्पादन प्रति हेक्टर

  1. आर झेड १९.                ७ ते ८ क्विंटल.
  2. जी सी ४.                    ५ ते ६ क्विंटल.
  3. आर झेड २२३.              ५ ते ६ क्विंटल.
  4. आर झेड २०९.              ७ ते ७.५ क्विंटल.

पाणी व्यवस्थापन

  1. पहिले पाणी:- पेरणी केल्यानंतर स्प्रिंकलर च्या सहायाने हलक्या स्वरूपात पाणी द्यावे ज्यामुळे जमिनीतील उष्णतेमुळे जीरा बियाणे खराब होणार नाही.
  2. दुसरे पाणी :- ६ ते ७ दिवसाच्या द्यावे ज्यामुळे जीरा पीक उगवण क्षमता वाढ होऊन सुकलेली जमीन खपली पकडते व पीक भरभराटीस येते.
  3. तिसरे पाणी :- पेरणी नंतर २० ते २२ दिवसांनी स्प्रिंकलर च्या सहायानी हलक्या स्वरूपात सोडून द्यावे

जीरा शेतीस पाणी देण्याची अवशकता नसते पण जमिनीमधील ओलावा नसेल  किंवा हलक्या प्रतीच्या जमिनीत उगवण क्षमता कमी होत असेल तर पाणी द्यावे.

जीरा खाण्याचे फायदे

भारतीयांच्या प्रत्येक घरामध्ये जीरा मसला अगदी सहज उपलब्ध असतो. रोज सकाळी पाणी पिण्याच्या अगोदर जिरे सेवन केले असता ज्यापासून तुम्हाला अनेक फायदे मिळतील.

१) फायबर ,मॅग्नेशियम ,लोह तांबा ,कॅल्शियम ,पोटॅशियम असे अनेक पदार्थ मिळतात.

२) शरीरातील सूज, पोटातील उष्णता, स्नायुची दुखणे, त्वचा संबंधी आजार कमी होतात

३) जीरा नियमित सेवन केल्याने अपचन, कोलेस्ट्रॉल यासारख्या समस्या निर्माण होणार नाहीत.

जीरा पाणी पिण्याचे फायदे

मानवी आरोग्यासाठी आयुर्वेदात जीरा पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. दैनंदिन आहारात अनेक बदल झाले असल्याने याचे परिणाम शरीरावर दिसून येत आहेत.

१) जिर्याच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्स गुण असल्याने या पाण्याचे नियमित सेवन केल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.

२) रोगप्रतिकारक शक्ती वाढते

३) श्वसन नलिका सुधारित राहते.

४) ग्लुकोज, शरीरातील मळमळ उलटी त्रास कमी होतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *