शेवगा लागवड.Cultivation of fenugreek
महाराष्ट्रात ७५ टक्के पेक्षा जास्त क्षेत्र हे कोरडवाहू आहे. बऱ्याचश्या जमिनीची प्रत ही हलकी किंवा मुरमाड पद्धतीची असल्याने त्या जमिनी मद्ये कोणत्याही मोठ्या प्रमाणात कडधान्याची लागवड केली जात नाही. शेवगा पीक हे पीक पावसाच्या पाण्यावर येणार असल्याने अश्या जमिनीमध्ये लागवड केल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यानं याचा फायदा होऊ शकतो.
(Shevga) लागवड जाती.
शेवगा लागवड जाती मद्ये प्रामुख्याने काही बदल झाला नाही व संशोधन ही झाले नसल्याने या पिकाच्या मुबलक प्रमाणात वाणाच्या जाती उपलब्ध नाहीत.
- कोकण रुचिरा
- भाग्य
- कोईमतुर १
- कोइमतुर २
- आणि पी. के.एम.
या जातीची लागवड देशात मोठ्या प्रमाणात शेतकरी लागवड करून भरगोच उत्पादन मिळवत आहेत.
१) शेवगा पिकास अत्यंत हलकी व साधारण जमिनी मद्ये लागवड करता येऊ शकते.
२) या पिकाची लागवड करण्यासाठी २ x २ फूट खड्डा खोल खोदून तसेच दोन झाडातील अंतर हे १० फूट ठेवावे व दोन ओळीतील अंतर ही तेवढ्याच प्रमाणात ठेवावे.
गुणकारी औषधांनी भरपूर असलेली प्रजाती
शेवगा दैनंदिन आहारामध्ये वापर केल्याने अधिक रोगांवर औषधी मानली जाते. या झाडाची फळे आणि पाने दोन्ही भाज्या बनवण्यासाठी वापरले जातात. या फळात प्रथिने भरपूर प्रमाणात जसे की कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन ए, मॅग्नेशियम या प्रथिने चे प्रमाण मोठ्या प्रमाणात अढळतात.
शेवग्याच्या पानात व्हिटॅमिन सी असल्याने मानवाच्या शरीरातील रक्तदाब कमी करण्यास मदत करते.
शेवगा खाण्याचा योग्य फायदे.
- पोटाच्या विकारावर गुणकारी असते
- रोग प्रतिकारशक्ती वाढते
- रोज सेवन केल्याने यकृत निरोगी राहते
- लघवीचा त्रास कमी होऊन स्टोन बाहेर पडतो
- पोटातील जंतू मरतात आणि पोट साफ राहते
- सांधेदुखी साठी फायदेशीर राहते
- नियमित सेवन केल्याने कमी कोलेस्ट्रॉल कमी होते
- पचन क्रिया सुधार होतो.
- केस गळती कमी होते
- हिमोग्लोबिनची पातळी कमी होते.
- यकृत आणि मूत्रपिंड डीटॉक्स करते.
शेवगा ३ महिने खा जा शरीर पोलाद सारखे बनवा.
शेवग्याच्या शेंगा मध्ये पालक व पनीर पेक्षा २० पट अधिक लोह आढळते दुधापेक्ष्या ८ पट जास्त कॅल्शियम असते. व व्हिटॅमिन सी,व्हिटॅमिन ए प्रोटीन्स चे भांडार आढळते यात अँटिबायोटिक, अँटी एक्सीडेंट, अँटी डायबेटिक, अँटि व्हायरल, अँटी फांगल गुणधर्म आढळत असल्याने याचे नियमित सेवन केले पाहिजे.
निरोगी राहण्यासाठी आहारात शेवगा खात जा.
निरोगी राहण्यासाठी हप्त्यातून ३वेळेस तरी शेवगा शेंगाची भाजी बनवली पाहिजे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना अनेक फळ भाज्या, मसाले, आणि औषधी वनस्पती रोज जेवणात वापरणे आवश्यक आहे. जेणे करून आरोग्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ज्यात शेवग्याच्या सेगाचा समावेश केला पाहिजे भारतातील दक्षिण भागात शेवग्याच्या शेंगांची सांबार म्हणून नियमित सेवन केले जाते.
शेवग्याच्या शेंगा मध्ये अनेक पैष्टिक घटक असल्याने या पिकास मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढ होेत असल्याने शेतकऱ्यांना या झाडाची किंमत ही दिसून येऊ लागल्याने काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागवड शेतकरी करत आहेत.