Cottonking बोंड अळी
विदर्भातील अकोला,अमरावती,यवतमाळ,वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने शेतकऱ्यांचे white dimond या नावाने जगभरात प्रसिद्ध असणारा कापूस आज आर्थिक नुकसानीची उंबरठ्यावर येऊन बसला आहे.
कपाशी पिकावर येणाऱ्या प्रमुख बोंड अळी यापैकी हिरव्या व शेंद्री बोंड आळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना कपाशी पिकाचे उत्पादनात घट होणार असल्याचे भीती वाटत आहे.
बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाचे उत्पादन घटणार.
एल निनो मुळे देशातील पावसाचे समीकरण बिघडल्याने याचे परिणाम राज्यातील खरीप हांगामतील पिकावर दिसून येत आहेत.अकोला,अमरावती,यवतमाळ,वाशिम जिल्ह्यात कापूस लागवडी खालील क्षेत्र मागील लागवडीच्या तुलनेत या वर्षी कापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पण बहुतांश क्षेत्र हे कोरडवाहू असल्याने कापसाच्या कीड नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना विविध कंपन्यांचे औषधे खरेदी करावी लागत आहेत. रासायनीक औषधाचा वापर करूनही किडीचा बंदोबस्त झाला नाही तर शेतकऱ्यांना त्यांच्या पिकास मोठा फटका बसू शकतो.
गुलाबी बोंड अळी नियंत्रण.
विदर्भात सर्वात जास्त प्रमाणात कापूस या पिकाची लागवड केली जात आहे. पण गेल्या काही वर्षापासून गुलाबी, शेंद्री तसेच हिरव्या कलर च्या बोंड अळी प्रादुर्भावामुळे कपाशी बोंडाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून ठेवले असल्याने विदर्भातील शेतकरयांना वारंवार रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. या किडीने मुख्यतः फुलांच्या वरती अंडी घालते व अंडी काही कालांतराने फुटून मोठ्या संख्येनं पिलांची उत्पती होते. त्या पीलांची उपजीविका भागवण्यासाठी फुलांच्या मद्ये जाऊन कुर्तडण्यास सुरुवात करतात. ज्यामुळे कापसाचे बोंड हे पिवळ व झाडापासून गळून पडतात.
अळी नियंत्रण. फुल किंवा बोंडावर अळी आढळल्यास पुढील प्रमाणे कीटक नशकाचा वापर योग्य प्रमाणात करावा लागेल.मोनोक्रोटोफॉस आणि असिफेट यासारख्या कीटकनाशकांची वारंवार फवारणी करावे लागेल.अळीच्या नियंत्रणासाठी १)क्लोरँट्रनिलिप्रोल ९.४% (२)लॅम्डा सायहॅलोथ्रीन ४४%मिली व ३)सायपरमेथ्रीन १० ईसी १० मिली ४) डेल्टा मेथ्रीन २.८ ईसी १० मिली ५) लॅम्डा सायहॅलोथ्रीन २.५ ईसी १० मिली ६)इंडो क्झाकार्ब १५.८ ईसी ५ मिली ७)इमामेक्टिन बेन्झोएट ५ एससी ५ ग्रॅम वापर करून तज्ञांच्या सल्यानुसारच फवारणी करून घ्यावी.
नोट : आम्ही कृषी अड्डा कोणत्याही औषधाचा प्रचार किंवा प्रसार करत नाही याची नोंद घ्यावी.