Cluster Beans गवार
गवार ही शेंग वर्गीय भाजी आहे. लागवडी पासून दोन महिन्याच्या कालावधीने या पिकास हिरव्या ३ ते ४ इंच लांबीचा शेंगा येण्यास सुरुवात होते. शेंगाचा उपयोग भाजी बनविण्यासाठी तसेच वाळलेल्या बियांची उसळ बनविण्यासाठी वापर केला जातो.
भारतीय पंचपक्वाना मद्ये गवार भाजीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.ज्यामुळे देशातील सर्व राज्यात दैनंदिन आहारामध्ये गवार भाजीचा उपयोग सातत्याने केला जातो.
जमीन आणि हवामान
गवार या पिकास जमीन काळी व पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी. तिन्ही ऋतु मध्ये या पिकाची लागवड करता येते हे पीक खरीप हंगामात लागवड केली असता उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळते.
गवार उष्ण कटिबंधातील पीक असल्याने या पिकास तापमान २० अंश ते ३० अंश योग्य मानले जाते.
लागवडी योग्य हंगाम.
गवार लागवड भारतीय हवामानात साधारणतः जुलै ऑगस्ट ते नोव्हेंबर ते डिसेंबर व फेब्रुवारी व मार्च महिन्यात लागवडीस योग्य मानली जाते. हेक्टरी प्रमाण १० ते १२ किलो लागवडीस पुरेसे असते.
पेरणी पूर्व मशागत.
जमिनीच्या प्रति नुसार गवार वाणाची लागवड करण्यात यावे.
१) लागवड करण्या पूर्वी शेत जमीन कुळवाच्या साह्याने कोळपणी करून जमीन सपाट करून घ्यावी.
२) सपाट केल्यानंतर नांगराच्या साह्याने ऊस लागवडी सारख्या सरी सोडून घेण्यात यावे.
३) ज्यामुळे जमिनीत झाडाच्या बुंध्याला ओलावा टिकून राहील
४) दोन्ही साऱ्यांच्या बुंध्यावर लागवड केली असता दोन्ही झाडातील अंतर हे १५ ते २५ इंच असेल पाहिजे.
५) दोन्ही सरी मधील अंतर ४५ ते ६५ इंच असेल पाहिजे ज्यामुळे अंतर मशागत व किपाची व्यवस्थीत करता येईल.
खत व पाणी
- जमिनीच्या प्रति नुसार खत व पाणी व्यवस्थापन करण्यात यावे.
- गवार शेंगवर्गीय पीक असल्याने पाणी व्यवस्थापन करने अत्यंत अवशत असते.
- ठिबक च्या साह्याने व जमिनीच्या पृष्ठभागावर सोडले जाते.
- खत व्यवस्थापनात शेन खत प्रति हेक्टरी २० ते २२ टन दिले असता इतर कोणत्याही रासायनिक खतांचा वापर करणे आवश्यक नाही.
- आधुनिक तंत्रज्ञानाचा सहाय्याने गवार उत्पादन घेण्यासाठी माफक प्रमाणात पाणी दिल्याने फुलांची वाढ हेते व खतांची मात्रा ही हेक्टरी ३० किलो नत्र ४५ किलो पालाश देण्यात यावे.
गवार वान व सुधारित जाती.
- पुसा सदाबहार
- फुले गवार
- पुसा नवबहार
- एच जी ३६५
- दुर्गा बहार
चाऱ्यासाठी (राजस्थान सर्वाधिक लागवड)
- एच इ जी १५६
- ३०-३२५
- ३५०-३२५
तन नियंत्रण
गवार लागवड केल्यापासून पहिली खुरपणी ही २० दिवसांनी करण्यात यावी ज्यामुळे लहान तन उगवण क्षमता कमी होईल दुसरी खुरपणी ४५ दिवसांनी करून घ्यावी
हेक्टरी उत्पादन
शेंगाची तोडणी ३ ते ४ दिवसांनी करण्यात यावी ज्यामुळे हेक्टरी उत्पादन ९० ते १२० क्विंटल मिळते.
गवार खण्याच्ये फायदे
१) भारतीय लोकसंख्या मध्ये वजन वाढीची या चरबी वाढीची समस्या वाढतच जात असल्याने आहारामध्ये गवार शेंगाची भाजीचे नियमित सेवन केल्याने लठ्ठ पंना वाढू शकत नाही.
२) पाचान तंत्र व्यवस्थिरीत्या राहील. गवारीच्या शेंगाची नियमित आहारात समावेश केल्याने पोट स्वच्छ व निरोगी राहते.
३) शरीरातील अपचन ची समस्या तसेच गॅस ची समस्या होणार
Cluster Beans गवार शेंगा पासून मिळणारे जीवनसत्व.
Cluster Beans म्हणजे गवारीच्या शेवगा मानवी आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरल्या आहेत. त्यामध्ये अनेक प्रकरचे महत्वाचे घटक आहेत. ज्यामुळे शरीराला असंख्य फायदा होतो.
फायबर व प्रथिने सम प्रमाणात उपलब्ध असतात. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, आयरन,व पोटेशियंम हे शरीरास लाभदायक घटक गवारी मार्फत मिळतात.ज्यामुळे वाढत्या वजनास अळ बसून हृदय विकार दूर रहातो