स्वातंत्र्य पूर्व दुष्काळ
भारत हा शेती प्रधान देश असल्याने येथील ५५ टक्के जनसंख्या शेतीवर उदरनिर्वाह भागवत आहे.भारतीय शेती ही परंपरागत चालत आलेली शेती असून येथील शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य पूर्व काळापासून ते स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष होई पर्यन्त शेतकऱ्यांनी त्यांच्या जीवनात आमाफ कष्ट करून भारतीय परंपरेत राहणाऱ्या लोकांच्या पोटाची खळगी भरवले आहे.
दुष्काळी परिस्थिति व जीवनमान भारतीय इतिहासात सर्व प्रथम १८७६-१८७८ चा दोजी बारा दुष्काळ सर्वात मोठा व भीषण दुष्काळ मानला जातो. भारतातील उत्तरे कडील
राज्यात तसेच पश्चिम कडील राज्यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली होती. सुमारे या दुष्काळात वळेवर अन्न न मिळाल्यामुळे ब्रिटिश
जाणकारांनी त्यावेळी मरणाऱ्यांची आकडेवारी ५० लाख मृत्यूमुखी पडल्याची सांगण्यात येते.
२) भारत एकीकडे स्वातंत्र्य होण्याच्या मार्गावर असताना २० शतकाच्या मध्यंतरी १९४३-४४ ला बंगालचा दुष्काळ म्हणून ओळखले जातो
. या वर्षात विश्व युद्धाचे परिणाम संपूर्ण आशिया खंडात दिसून येत होते याच वर्षात एकीकडे भारतीय क्रांतिकारक इंग्रजी राजवटी विरुद्ध लढा
देत होते तर दुसऱ्या बाजूला भारतातील सर्वात मोठ्या दुष्काळाला समोर जाण्याचे आवाहन होते.बंगाल मधील जनतेला अन्न न मिळाल्यामुळे
प्राण गमवावा लागला होता. विन्स्टन चर्चिल मुळे बंगालच्या नागरिकांचा बळी असे ब्रिटन मधील जाणकार व इतिहासकार यांनी लिहून ठेविले
आहे. जर चर्चिल यांनी त्या वेळी अन्न पुरवठा केला असत्ता तर बंगालच्या ३० लाख नागरिकांचा अन्न न मिळाल्यामुळे मृत्यू झाला नसता.
७५ वर्षे स्वातंत्र्या नंतर शेती मध्ये बदल
भारत इंग्रजी राजवटीपासून मुक्त होऊन ७५ वे वर्ष अमृत मोहत्सव साजरा करत आहे. पण भारतातील भारतीय शेतीला चालना देण्यासाठी
अजून ७५ वर्षे लागतील हे चित्र सध्याची परिस्थिती पाहून लक्षात येत आहे.
भारतीय शेती ही विविधतेने नटलेली आहे. भारतातील बहुतांश राज्यात वेगवेगळ्या पिकाची लागवड केली जात असल्यामुळे भारतीय शेतीला
खास महत्व प्राप्त आहे. मागील काही वर्षी पासून शेतीला दूषित करण्याचे काम देश बाहेरील ताकत करत आहे.
रासायनिक फवारणी मुळे ब्रिटिश हुकूमत पेक्षा जास्त मरण पावतील भारतीय नागरिक
भारत हा रासायनिक औषधांचा सर्वात मोठा आयातदार आहे.कृषि प्रधान देशात शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या
रासायनीक फवारणी केली जाते.फवारणी केलेल्या पिकाला त्या फवारणीचे काही गुण राहत असल्याने त्याचा परिणाम फळ-
फळ भाज्यांवर दिसून येतो जर हा क्रम असाच चालत राहिला तर येणाऱ्या भविष्यात युद्ध लडवायची गरज भासणार नाही. कारण भारतीय युवा
रासायनिक फळ-फळभाज्या व शेतीती पिकवली जाणारी हर एक वस्तु ही रासायनिक औषधा शिवाय बनवता येत नसल्याने आज आपण अवघ्या १५ वर्षीय मुलांना हृदय विकाराचे झटके येऊ लागले आहेत. जर असेच होत राहील तर या रासायनिक फवारणीच्या औषधे तयार झालेली पीक व फळ भाज्या खाऊन भारतीय नागरिक हे इंग्रजाच्या जुलम व अत्याचारामुळे मरण पडलेल्या नगरिकांपेक्षा जास्त मरण
पावतील.