कॅल्शियम कार्बाइड
देशातील वाढती लोकसंख्या ही या देशाला आजारी, कमकुवत पाडत राहील कारण शेतीतून मिळणारे उत्पादन हे सरासरी पेक्षा कमी असून उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी व नफा खोरिसाठी व्यापारी अत्याधिक प्रमाणात विविध प्रकारच्या रसायन फवारण्या करून फळ उत्पादनात घेतले जात आहे.नैसर्गिक आंबा पिकवणे हे आता बंद होत चालले आहे की अस वाटू लागले आहे.असच चालत राहील तर असंख्य रोगाला आमंत्रण देण्याचं कार्य सुरू राहील. व्यापारी खुलेआम प्रत्येक मोसमात येणाऱ्या फळावर कार्बाइड चे प्रमाण अधिक मात्रा वापरून फळ पिकवले जात आहे. आपण ते कोणत्याही प्रकारचे साफ या व्यवस्थित धुवून खात नाहीत त्यामुळे त्याचे परिणाम शरीराला भोगावे लागते. सर्दी, खोकला, ताप, उलटी संडास लागणे अश्या अनेक आजारांना आपण आमंत्रण देत असतो. मार्च महिन्याच्या नंतर आंब्याचा मोसम सुरू होतो. याच दरम्यान बागायत दार आंब्याला कीड लागू नये, आंबा लवकर पिकून तयार व्हावा यासाठी व्यापारी ज्यास्त नफा कमावण्याच्या उद्देशाने कार्बाइड पावडरची फवारणी चिडकाव टाकत असतो.
पावडर टाकून पिकवलेल्या फळांना लाल रंग व दिसण्यास आकर्षक दिसू लागतात. मार्च नंतर हापूस आंबा जवळील बाजार पेठेत उपलब्ध होतो.पण तोपर्यंत या फळाची गोडी चव बदलून गेली असते. तर काही फळाला अती कार्बाईड चे प्रमाण जास्त झाले असता फळ आतून खराब होऊ लागते.हे पावडर आरोग्यासाठी खूपच धोकादायक असल्याने सरकारनी या पावडर ल बंदी घालण्यात आली आहे.
कार्बाइड मुळे होणारे नुकसान
१) कार्बाइड च्या वापराने फळाच्या चवी बरोबर गुणवत्तेमध्ये बदल होतो.
२) पावडर टाकून पिकवले फळ धुवून खाण्याचा प्रयत्न केला ते पावडर धुतले जाणार नाही.
३) विविध प्रकारच्या फळावर जास्त काळ ठीकवण्यासाठी बुरशीनाशक व फवारणी केले जाते.
४) फळांच्या आत मधील प्रणाली (गर) मद्ये असलेले रसायन बाहेरून धुतल्याने जात नाही.
कार्बाईड पासून पिकवण्यात येणारे फळ
ज्या पद्धतीने शहर वसली जात आहेत त्या शहरांची येणाऱ्या काळात गरजा ही वाढत राहतील.भाजीपला, कडधान्य, फळ, वाढलेल्या शहराला अनेक प्रकारे व्यापाऱ्यामार्फत फळ व इतर जीवनावश्यक वस्तू रसायन प्रक्रिया करूनच विकल्या जातो आहे.
- केळी
- सीताफळ
- जांब
- पपई
- आंबा
- टोमॅटो
Calcium carbide गोडाऊन मद्ये एक पुडी पावडरची ठेऊन दिली असता त्या पुडीचा गॅस तयार होतो गॅस चे रूपांतर मोठ्या प्रमाणात गर्मी मद्ये होते त्यामुळे त्या रूम मधील वातावरण गरम होऊन फळे पिकन्याच्या प्रक्रियेस प्रारंभ होतो.
त्यामुळे काही फळांना काही दिवस तर काहींना पीकवण्यासाठी काही तासच लागत असतात. या प्रक्रियेला गती असल्याने व्यापारी वर्ग अती प्रमाणात वापर केला जातो.