Black gram उडीद
महाराष्ट्रात खरीप हंगामातील तीन नंबरचे सर्वाधिक लागवड केले जाणारे महत्वाचे पीक आहे. ७० ते ७५ दिवसात पीक तयार होत पावसाचे कमी पर्जन्यमान सुधा या पिकास लाभदायक व मोठ्या प्रमाणात उत्पादनात वाढ ठरत आहे.
दुहेरी तिहेरी उत्पादन घेण्यासही पिकाची लागवड केली जाते.
जमिन
उडीद लागवडीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडावी पाणी साठून राहिले तर पिकाची नासाडी होऊन मरून जाऊ शकते.
पूर्वमशागत
उन्हाळयात नांगरणी करून जमीन उन्हात तापून राहिली असता बुरशी जन्य किटाणू मरण पावतील. नंतर कुळवाच्या साह्याने पाळी घालून घ्यावे.
सुधारित जाती
१) टी ए यु – १ :
या वाणाची पेरणी केली असता. कालावधी ७० ते ७५ दिवस दाणेदार उत्पादन प्रती हेक्टरी १० ते १२ क्विंटल भुरी व मावा रोगास प्रतिकारक आहे.
२) टी ए यु – २ :
या वाणाची पेरणी केली असता. कालावधी ७० ते ७५ दिवस दाणेदार उत्पादन प्रती हेक्टरी १० ते ११ क्विंटल भुरी रोगास प्रतिकारक आहे.
३) टी ए यु – ४ :
या वाणाची पेरणी केली असता. कालावधी ६५ ते ७५ दिवस दाणेदार उत्पादन प्रती हेक्टरी १० ते १३ क्विंटल भुरी रोगास प्रतिकारक आहे.
४) पी के व्हि – १५ :
या वाणाची पेरणी केली असता. कालावधी ६५ ते ७० दिवस उत्पादन प्रती हेक्टरी १० ते १२ क्विंटल भुरी रोगास प्रतिकारक मराठवाडा व विदर्भात सर्वाधिक पेरणी केली जाते.
बीज प्रक्रिया
पेरणी करण्याच्या अगोदर प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम रायझोबियम औषध पावडर गुळाच्या द्रावणात मिसळून लावावे.
प्रती किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा लावावे. ज्यामुळे बुरशी कीड या या रोगाचे प्रमाण कमी होते.
- हेक्टरी बियाणे १५ ते २० किलो पेरणी करण्यात यावी.
खत व्यवस्थापन
खरिप हंगामातील उडीद मुख्य पिका पैकी एक पीक आहे.२५ किलो नत्र व ३५ किलो स्पुरद पेरणी सोबत देण्यात यावे.
शेणखत व कंपोष्ट खताची मात्रा प्रति हेक्टरी ३ ते ४ टन देण्यात यावी.
कीड व रोग व्यवस्थापन
- उडीद पिकावर भुरी रोगाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील उत्पादनात घट झाली आहे.
- पीक फुलोऱ्यात आल्यावर भुरी रोगाचा प्रसार होतो.
- २० ते ३० ग्रॅम गंधक १० लिटर पाण्यात विरघळवून फवारणी करावी.
- शेंगा पोखरणारी अळी उडीद पिकावर मोठे नुकसान करत असतें
- किडीचा बंदोबस्त करण्यासाठी किनालफोस ३६ इसी २० मिली १० लिटर पाण्यात द्रावण व्यवस्थीत विरघळवून फवारणी करावी.
उडीद खाण्याचे फायदे.
- उडीद डाळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वाधिक पोष्टिकं आहार भरपूर प्रमाणात व फायबर असल्याने उडीद डाळीचे सेवन नियमित केले पाहिजे.
- हृदय निरोगी राहते
- त्वचा निरोगी राहते
- मधुमेह आजारास फायदेशीर
- अन्न पचन सुधारते
- वजन कमी करण्यास उपयोगी ठरते
- उडीद डाळीपासून मिळणारे जीवनसत्व
या डाळी पासून बनवलेले सर्व पदार्थ पचनास जड व पौष्टीक असल्याने या दाळीस भारतीय आहारात महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
- पोटॅशियम
- सी व बी जीनसत्त्व मिळते
- कॅल्शियम
- तांबे हे गुणधर्म अधळून येतात
उडीद डाळी मध्ये औषधी गुणधर्म असल्याने बऱ्याच आजाराला नियंत्रणात ठेवत जसे की कावीळ, मलेरिया, डेंग्यू, या आजारात डाळीचे सेवन करावे.