black-eyed bean चवळी
चवळी म्हटल की हिरव्या लांब शेंगा. कोवळ्या शेंगाचा उपयोग चविष्ट व्यंजन बनविण्यासाठी तर वाळलेल्या शेंगाचे बीया पासून अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्रात चवळी लागवडी खालील क्षेत्र जरी कमी असेल तरी उत्पादन मात्र भरघोस मिळत आहे.चवलीचे अंतर पीक म्हणून चवळी लागवडीचा विस्तार दिवसेंदिवस वाढतच जात आहे.
चवळी लागवडीस जमीन
मध्यम ते भारी जमिनीमध्ये चवळी लागवड करण्यात यावी ज्यामुळे पिकाची वाढ तसेच चवळी शेंगाची लागण मोठ्या प्रमाणात होते
लागवडी अगोदर गावरान शेणखताची मात्रा ५ टन प्रति हेक्टरी सम प्रमाणात झाडाच्या बुंध्याला दिली असता पीकाची वाढ होऊन उत्पादनात भर पडते.
बीज प्रक्रिया व लागवड हंगाम
१) प्रति किलो चवळी बियाण्यास २ ते ३ ग्रॅम थायरम ची प्रक्रिया करून ठेवावे.
२) कोणतेही बियाण्यास कीटक व रोगाचा पेरणी नंतर प्रादुर्भाव होऊन नये म्हणून प्रति १० किलो बियाण्यास रायझेबियम जिवाणू ची २५० ग्रॅम मात्रा देऊन प्रक्रिया करून सुखवून ठेवावे.
३) चवळी लागवड करण्याअगोदर सरी सोडून घ्यावे व दोन्ही झाडातील अंतर हे ४० ते ४५ इंच असले पाहिजे.
तन नियंत्रण.
लागवड केल्यापासून १३ ते १५ दिवसांनी तनाचा नायनाट केला पाहिजे जेणे करून कोणताही बुरशी, मावा व किडीचा प्रादुर्भाव जाणवणार नाही.
सुधारित जाती.
चवळी लागवडी साठी महाराष्ट्रात कृषी विद्यापीठाने काही सुधारित वाणाची निवड केली आहे.
जात. कालावधी दिवस. उत्पादन प्रति क्विं.हे
सी १५२. – ९० ते १०० दिवस. ६ ते ९ क्विं. हे
कोकण सफेद. – ९२ ते ९५ दिवस. ७ ते ८ क्विं. हे
कोकण सदाबहार – ६० ते ७० दिवस. ८ ते १० क्विं. हे
चवळी खाण्याच्ये फायदे.
या वनस्पतीच्या हिरव्या कवळ्या शेंगाची भाजी नियमित आहारामध्ये सेवन केल्याने मानवी शरीरातील अनेक आजार दूर होतात.
- वजन कमी करण्यासाठी दैनंदिन आहारामध्ये चवळी शेंगाची भाजी नियमित वापरात आणली पाहिजे.
- चवळीत मोठ्या प्रमाणात सोल्यबुल फायबर असल्याने पाचन समस्या तसेच पोट साफ होण्यास मदत करते.
- सध्या बऱ्याच व्यक्तींना मधुमेहाचा त्रास वाढला असल्याने आटोक्यात आणण्यासाठी चवळीचा आहारात उपयोग केल्यास मधुमेहाचा त्रास कमी जाणवतो.
- शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल चवळीने नियंत्रित करण्यात येते.
- या कडधान्याचे नियमित सेवन केल्यास गरोदर स्त्रियांसाठी लाभदायक ठरते.
- चवळी कडधान्य गरोदर स्त्रियां खात राहिल्यास कॅल्शियम व लोह ची कमकरता दूर होते.
केनिया देशात चवळीच्या पांनाना अती महत्व
केनिया या देशात वर्षभर हिरवी उपलब्ध असलेली चवळीचे पाने यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि प्रथिनेचा मोठा स्त्रोत असल्याने अत्यंत गुणकारी ठरत आहे.