बंगळुरू भारतातील सर्वात मोठे आय.टी. हब म्हणून ओळखले जाते. आज त्याच Bengluru मध्ये अंगणवाडी,शाळा, उच्च माध्यमिक शाळा, व्यवसायिक कार्यालये, चित्रपट स्थानक, औद्योगिक क्षेत्रातील मंडळे, कार ,मोटार सायकल धूने हे बंद करण्याची वेळ आली आहे. याचा प्रश्न तुम्हाला पडला असेल. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात बंगळुरू शहराने जगविख्यात नाव कमावले आहे. याच अपेक्षेने देशातील बहुतांश युवा शिक्षण घेऊन उद्योग धंदा नोकरीसाठी या शहराकडे स्थलांतर करतात. इतर राज्यातील तरुणाचे स्थलांतर करण्याचे प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली की त्यांना विस्थापन करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेवर ताण वाढू शकतो.तसेच रहदारी, पाणी व्यवस्थापन करणे शहरास अवघड होऊन बसले आहे.गेल्या वीस वर्षांमध्ये शहराची लोकसंख्या दीड पटीने अधिक वाढ झाली आहे.
बेंगळुरू पाणी प्रश्न
हे शहर देशातील सेवानिवृत्ती घेणाऱ्या लोकांचं सर्वात जास्त पसंत केलं जाणार शहर आहे. या शहराला हिरवे, सुंदर, थंड, सर्वाधिक स्वच्छ हवा म्हणून अलौकिक नाव प्राप्त झालं आहे. ज्या नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेले पूर्ण शहर पाणी कमरता तर जलाशयाच्या पाण्यात होणारी कमी,पहिलेच नाही.शहराला पाणी पाजनारी एकमेव नदी ही कावेरी वातावरणाच्या बदलामुळे पर्जन्यमान कमी झाल्याने पाणी साठा हा संपूर्ण बंगळुरू शहरला पुरवेल का हा प्रश्न पडला आहे.
बंगळुरू भारतातील लोकसंख्येत तिसरे सर्वात मोठे शहर.
देशातील वाढती लोकसंख्या येणाऱ्या काळात मोठी डोकी दुःखी होऊ शकते. उत्तर भारतातील लोकसंख्येचा ज्या पद्धतीने विस्फोट होत आहे. येवढ्या मोठ्या प्रमाणत रोजगार निर्मिती न होणे याचा तान औद्योगिक शहरावर होताना दिसत आहे.
- मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयामध्ये येणाऱ्या काळात वाढ नाही झाली तर घनदाट लोकसंख्या असलेल्या ढाका नंतर मुंबई शहराला असाच सामना करावा लागेल.
- बंगळुरू शहराची लोकसंख्या १ कोटी २५ लाख आहे. यातील ३५ टक्के लोकसंख्येला पाणी कमी पडणारे आहे.
- जेवढी मोठे शहर होत आहेत तेवढ्याच मोठ्या प्रमाणात समस्या ही वाढ होताना दिसत आहेत.
- ज्या पद्धतीने पाणी समस्या गंभीर झाली आहे. त्याच पद्धतीने पाण्याचा टँकर चा भाव २५०० वरून ५००० पर्यंत पोहचला आहे.
लातूर पाणी संकट २०१६
जसा बंगळूर पाणी प्रश्न पेटला आहे. लातूरमध्ये २०१६ साली पद्धतीने पाण्याची भीषण टंचाई जाणवली होती. त्यावेळी सांगली येथून रेल्वेगाडीच्या मदतीने लातूरकरांना पाणी पुरवण्यात आले होत.