Sesame Plant तीळ पिक.
तीळ लागवड खरीप,रब्बी, उन्हाळी हंगामातील शेतकऱ्यांचे मुख्य व मध्यम लागवडी योग्य तेल गळीत वनस्पती पीक आहे.भारतात सर्वच राज्यात या पिकाला धार्मिक कार्यात महत्व प्राप्त झाले असल्याने सनासुधीत वापर केला जातो आहे.
सनातन सुंस्कृती मध्ये पोंगल, गुढीपाडवा, छटपूजा, दीपावली या शुभ मुहूर्ताच्या सणांमध्ये तीळ वनस्पतीस अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.
लागवड.
तिळाची लागवड राज्यातील सर्वच प्रकारच्या पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करण्यात येतो.
Improved varieties of sesame तीळाच्या सुधारित जाती.
पेरणी अगोदर जमिनीची मशागत करणे आवश्यक आहे. १) नांगरणी २) जमिनीतून नीघालेल्या ढेकळांना सपाट करून घेणे.(३) ज्यामुळे पेरणीस कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही व सुधारित वाणाची उगविण्याची क्षमता ९५ टकक्यांपर्यंत असू शकते.
जात कालावधी. हे.उत्पादन
१) फुले तीळ नं १ ८५ ते ९२ दिवस. ४ ते ५ क्विंटल
२) तापी जे.ल.टी.७. ८२ते ८७ दिवस. ५ ते ६ क्विंटल
३) जे.ल.टी.४०८ ८० ते ८५ दिवस. ७ ते ८ क्विंटल
४) पडमा २६ ७२ ते ७५ दिवस ६ ते ७ क्विंटल.
बीजप्रक्रिया
जमिनीपासून व हवामान बदलाच्या परिनामां मुळे बियाण्यास बुरशी व किडे लागू नये म्हणून करावयाचे उपाय. १) पॅरोलॉजी आणि ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळून घ्यावे ज्यामुळे कोणत्याही बुरशी व कीटकांची लागण होणार नाही.
पेरणी
मान्सूनचा योग्य प्रमाणात पाऊस झाल्यावर तीळ बियाणांची पेरणी करून टाकावी व बियांनाचे हेक्टरी प्रमाण हे २ किलो ते २.५ किलो ठेवावे.
खत व्यवस्थापन.
तीळ वनस्पतीला कोणत्या रासायनिक खतांची पोषक मात्रा न देता मुक्त जनावरांपासून मिळालेल्या शेणखत तसेच कुजलेल्या खताचा वापर करून पेरणी अगोदर हेक्टरी ४ टन ते ५ टन केले असता पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर मिळू शकते.
हेक्टरी उत्पन्न.
महाराष्ट्रात खरीप,रब्बी व उन्हाळी हंगामात तिळाचे उत्पादन चार क्विंटल पर्यंत पोहचलं आहे. पण इतर राज्याच्या तुलनेने महाराष्ट्रातील तसेच मराठवाड्यातील उत्पादन अधिक आहे.
मराठवाड्यातील तिळाचे प्रमाण अधिक व उच्च क्वालिटीचे असल्याने पांढरा दर्जेदार दांना, तेलाचे प्रमाण जास्त किडीचा प्रादुर्भाव कमी ज्यामुळे येथील तिळाला मागणी वाढत आहे.
Benefits of Sesame Oil
तीळ खाण्याचे फायदे.
गोडपदार्थ तसेच जेवणाची चव वाढवण्यासाठी तिळाचा उपयोग केला जातो.
- तीळामध्ये पॉलिसॅच्युरेटेड फॅटी एसिड, कॅल्शियम, आयरन, ओमेगा ६ तसेच फायबर, मॅग्नेशियम, व फॉस्फरस सारखे घटक शरीराला पोषक बनवतात
- दैनंदिन आहरामध्ये तिळाचे सेवन करत असाल तर तुमचे हाड, सांधेदुखीचा त्रास जाणवणार नाही.
- कॅल्शियम,मॅग्नेशियम,फॉस्फरस हे तीन घटक हाडांसाठी महत्वपूर्ण ठरतात.
- तीळामध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढ होते.
नियमित तीळ खाल्याने ज्या मध्ये सेसमिन व अँटीऑक्सिडंट्स प्रमाण मोठ्या संख्येत असते ज्यामुळे कर्क रोगाच्या पेशीची वाढ होण्यास रोखते.
Benefits of Sesame Oil तिळाच्या तेलाचे फायदे.
- तिळ तेलात अँटीऑक्सिडंट्स तसेच सेसमिन व सेसमिनाल चे घटक असतात.
- दाताचे हिरडे व तोंडचे आरोग्य सुधारते.
- हृदय दीर्घकाळ निरोगी राहते.
- कोरड्या त्वचेपासून शोषण करते.
- शरीरातील रक्तदाबाचे नियंत्रण ठेवण्यास मदत करते.
- केमिकल युक्त आहारामुळे तणाव वाढल्यास तीळ तेलाचे सेवन केले पाहिजे.
या धावपळीच्या जीवनात इवल्याश्या तिळाचे महत्व शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करत हे आपण पाहिले आहे
तीळ तेलाने मालिश करण्याचे फायदे.
तीळ वनस्पती प्रत्येक घरी असल्याने आपणाला बियाचा व तेलाचा वापर कसा करावा माहीत नसते ते आपण पाहणार आहोत.
तीळाच्या तेलाने मसाज केल्याने तुमच्या शरीराची चरबी व पोटाची चरबी कमी होण्यास सुरवात होते. तसेच आहारात वापर केल्यास वजन वात कफ कमी होण्यास मदत होते.