राज्यात शेती करण्याचा कल दिवसेंदिवस बदलत जात आहे. याचे मुख्य कारण पारंपरिक शेती पद्धती मद्ये उत्पादन पूर्वीसारखे होत नसल्याने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऑरगॅनिक पद्धत व पोली हाऊस चा योग्य वापर करून पीक उत्पादन घेतले जात आहे.
महाराष्ट्रात शिमला मिरचीस पोषक वातावरण काही जील्ह्यापूर्तेच मर्यादित आहे. ज्यामध्ये नाशिक,पुणे, सातारा व सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या शहरात शिमला (ढोबळी) मिरचीचे उत्पादन घेतले जात आहे. पण या शहरा व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यात पॉली हाऊस तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला जात आहे.
जमीन
ढोबळी मिरची लागवड करण्यासाठी काळ्या मातीची सुपीक भुसभुशीत जमीन आवश्यक असते. पाण्याचा योग्य निचरा होणारी व जमीनीचा सामू ६ ते ७ पर्यंत असला पाहिजे. ज्यामुळे पिकाची उगवण क्षमता वाढ जोमदार होते. फळ आकाराने मोठे होण्यास फायदा होतो.
लागवड
शिमला मिरची लागवड रब्बी हंगामात मुख्यतः सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात सुरुवात केली जाते कारण या पिकास थंड हवामान पोषक मानले जाते जेवढे हवामान थंड राहील तेवढे उत्पादन वाढ होऊ शकते.
या पिकाची वाढ होण्यासाठी तापमान किमान २० सेल्सियस व कमाल तापमान २६ सेल्सियस पर्यंत योग्य मानले जाते.लागवड सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली तर पीक काढणीचा कालावधी जानेवारी महिन्याच्या अखेरीस सुरुवात केली जाते.
मशागत
१) ढोबळी मिरची लागवड करण्यासाठी जमिन नांगरून घ्यावी आडवे व उभे नांगरन केल्याने जमिनीच्या खालचा थर वर येतो ज्यामुळे जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते.
२) नगरणी करून झाल्यावर कुळवाच्या सहाय्याने दोन ते तीन पाळी मारून घ्यावी.
३) जमीनीवर आलेला कचरा गोळा करून व्यवस्थित विल्हेवाट लावावी.
४) २ ते ३ कुळवाच्या पाळी घालून घेतल्या नंतर सर्वात महत्वाचा शेद्रिय खात किंवा उपलब्ध असेल तर शेणखताचा वापर केला पाहिजे.
५) प्रति हेक्टरी १८ ते २० टन शेणखत देण्यात आले पाहिजे कारण जमीनीचा पोत सुधारण्यावर पिकाची इतर कोणत्याही रासायनिक खत देण्याची गरज भासणार नाही.
६) ज्या क्षेत्रात लागवड करणार असाल त्या अगोदर रोपे तयार करणे आवश्यक असते.
शिमला मिरची सुधारित वान
हे झाड हिरवे दाट पल्यांनी भरून नाजूक फांद्या या प्रजातिला बहुतांश देशात बेल मिरची या नावाने प्रसिद्ध आहे. पण भारतात मात्र ढोबळी या शिमला मिरची नावाने ओळखला जाते. मिरची उत्पादन देणाऱ्या बहुतांश प्रजाती आहेत.
हिरवी राणी
भारत
ग्रीन गोल्ड
कॅलिफोर्निया वंडर
मोहिनी
सोलन हायब्रीड
इंद्र
ओरोबेल
भारतात सर्वाधिक उत्पादन घेण्यात येणाऱ्या ढोबळी मिरची लागवड केल्या जाणाऱ्या प्रमुख प्रजाती आहेत.
खत व्यवस्थापन
लागवड करण्या अगोदर १८ ते २० टन शेणखत सर्यांमध्ये पसरून टाकावे.
लागवडी नंतर १० ते १५ दिवसांनी पहिल्या टप्प्यात ५० किलो नत्र ५० स्पुरद व ६० किलो पालाश द्यावे
लागवडी नंतर दुसरी मात्रा ३० ते ३२ दिवसांनी ४० किलो नत्र ४० किलो स्पुरद आणि ५० किलो पालाश देण्यात यावे.
तिसरी मात्रा लागवडी नंतर ५० ते ५५ दिवसांनी ४० किलो नत्र ४० किलो स्पुरद ५० किलो पालाश द्यावे.
अंतर मशागत
ढोबळी मिरची लागवडी नंतर अंतर मशागत करने आवश्यक असते.
मिरचीचा मळा नेहमी स्वच्छ तन नाशक असला पाहिजे.
तनाचे प्रमाण जेवढे कमी राहील तेवढे ढोबळी मिरचीवर कोणतही रोगाचा प्रादुर्भाव दिसून येणार नाही.
जमीन स्वच्छ असेल तर पीक चुर्डा मुर्डा या रोगाचा प्रादुर्भाव दिसणार नाही.