बैलपोळा उत्सव
महाराष्ट्रात बैल पोळा सण मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येतो.पण या वर्षी राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाचे समीकरण बिघडल्याने मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना या उत्सवात आनंद साजरा करता येणार नसल्याचे दिसत आहे.
(Bail pola) बैल पोळा निमित्त तालुक्याच्या ठिकाणचा आठवडी बाजार बैलपोळ्याच्या सणामुळे रंगी बेरंगी कापडाने दुकाने सजली आहेत. तसेच घाटी, पितळेचे घागर मळे, बैलाच्या सिंगावरील बाशिंग ही दुकानात जगो जागी दिसत आहे. मात्र यावर्षी च्या सनावर दुष्काळाचे सावट असल्याने बळीराजा चिंतेत आहे.तर दुसरीकडे पोळा सणवार लम्पी स्किन आजाराने मराठवाडा,विदर्भात थैमान घातले असून ज्यामुळे या रोगाची वाढ होऊ नये म्हणून बैल पोळा शेतातच साजरा करण्यात यावा.
बैल पोळा मिरवणुक काढू नये?
बैल पोळा म्हटल की शेतकऱ्यांचा दोन दिवसाचा चालणारा उत्सव आहे. यात गाय गायींचे वासरे बैल यांना दोन दिवांपूर्वीच गरम थंड पाण्याने अंघोळ, रंगी बेरंगी कलाकुसर,३६५ दिवसातून फक्त दोन दिवस बैलांच्या खांद्यावर कोणत्याही शेती कामाचे अवजारांचे ओझे दिले जात नाही.हाच तो क्षण असतो शेतकऱ्यांना बैल विषयी गर्वाने भारावून जाण्याचा.गावातील हनुमान मंदिरापर्यंत बैलांना व गायींना सजवून देवाच्या नावाने घोषणा देत मंदिराला प्रदक्षिणा घालून परत घरी पूजा करून बैल पोळा समाप्त करण्यात येतो. याच अनुषंगाने लम्पि आजार पसरू नये म्हणून विशेष करून काळजी प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे.
सरकारच्या विविध योजना मुळे बैलाचे प्रमाण घटले.
देशात शेतीची मशागत करण्यासाठी पूर्वीपासूनच बैलाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असे. पण मागील दहा वर्षांपासून शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगतीच्या नावाखाली चालत आलेला बैल जोडी जोपासण्याचा वारसा येणाऱ्या या पिढीने पुरता मोडून काढण्याचे ठरविले आहे.
पूर्वी १९७० च्या दशकात ज्या शेतकऱ्यांकडे सर्वात जास्त बैलाचे जोड्या असतील त्या शेतकऱ्यांना गावचा सदन शेतकरी समजले जात असे.
शेतीची भांडवली करण जसे करण्यात आले आहे. तेंव्हा पासून केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना विविध योजांद्वारे सबसिडी मार्फत ट्रॅक्टर,अवजारे याचे प्रमाण वाढल्याने बैलाचे जोड्या चे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले व आज गावात शंभर शेतकरी असतील तिथे फक्त दहा बैल जोडी दिसत आहेत.
सर्व शेतकऱ्याना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा