Amla आवळा शेती

अल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नात वाढ करून देणारी शेती ठरतं आहे. राज्यातील शेतकऱ्यांना समृद्ध होण्यासाठी पारंपरिक शेती पद्धती सोबत फळबाग लागवड करून आर्थिक समृद्धीकडे वाटचाल सुरू केली पाहिजे.

जमिन

मध्यम ते हलकी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन असली पाहिजे.

आवळा लागवड

  1. आवळा लागवड करण्यासाठी ४ x ४ चे खड्डे खोदून घ्यावे ८ ते १० दिवस उन्हात खड्ड्यांनी तापू द्यावे.खालच्या भूभागात शेणखत किंवा कंपोष्ट खताची मात्रा तसेच काळी माती मिसळून लागवड करून घ्यावी.
  2. दोन्ही झाडातील अंतर १० ते १५ फूट असावे व दोन्ही ओळीतील अंतर १२ ते १५ फूट असावे. लागवड मुख्यतः पावसाळ्यात केली पाहिजे.
  3. जून जुलै महिन्यात लागवड केली असतां रोपांची वाढ मोठ्या प्रमाणात होते व रोपे दगावण्याची भीती नसते.

पाणी नियोजन

लागवड झाल्यानंतर आवळा झाडाचे संगोपन करणे महत्वाचे ठरते. आवळा ठिबक सिंचन पधदतीने पाणी दिल्यास झाडांची वाढ होऊन उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढते.

आवळ्याचे सुधारित वान

आवळा लागवड करण्यासाठी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने महाराष्ट्रासाठी उत्पादना योग्य प्रमुख जाती निवड केली आहे.

  • बलवंत
  • बी एस आर
  • बनारसी
  • कृष्णा
  • कांचन
  • आनंद १
  • न-ए – ९
  • न-ए – ७

हेक्टरी उत्पादन 

आवळ्याचे झाड साधारणतः लागवडी पासून ८ ते १० वर्षाचे झाले असता उत्पादन देण्यास तयार होते.

हेक्टरी उत्पादन ८ ते १० टन मिळते जसे १५ ते २० वर्षाचे झाड होईल तसे उत्पादनात वाढ होईल.

Amla आवळा आयुर्वेदिक फायदे 

भारतीय आयुर्वेदामध्ये आवळा वनस्पतीस अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. वैदिक गुरुकुल पद्धतीमध्ये आवळा या फळास मानवी शरीराला लाभलेला अमृताचे फळ असे मानले जाते.

ज्यामुळे सर्दी, खोकला, त्वचाविकार, केस गळती, रक्तातील साखरेचे प्रमाण, स्मरण शक्ती वाढवण्यासाठी भारतीय वैदिक जाणकारांनी आवळ्याचे महत्व सांगितले आहे.

आवळा खाण्याचे फायदे.

आरोग्यासाठी आयुर्वेदात आवळा खाण्याचे अनेक महत्वाचे घटक सांगण्यात आले आहेत.

  1. आवळ्यामध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, फॉस्फरस शरीरासाठी तसेच केस गळती, पांढरे केस होण्यास कमी करते.
  2. आवळा सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढ होऊन शरीर सुदृढ बनते.
  3. अवळ्या मध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असल्याने त्वचा आणि केस सदा चमकत राहतात.
  4. आवळ्याचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते.
  5. आवळ्याचा रस डोक्यात लावला असता कोंडा व केस गळतीचे प्रमाण कमीत होते.
  6. नियमित सेवनाने डोळ्याचे आजार व त्रास कमी होतो.
  7. दैनंदन आहारात जंक व फास्ट फूड खाण्याचे प्रमाण वाढल्याने पुरुष गटात शुक्राणू संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. शुक्राणू वाढ करण्यासाठी नियमित आवळा सेवन केले पाहिजे.

आवळ्यापासून तयार होणारे पदार्थ 

नैसर्गिक औषधी पदार्थ तयार करण्यासाठी आवळा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.जसे की केसांची समस्या असो की केसाची गळती थांबवण्यासाठी आवळा मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरतो.

  • आवळा सुपारी
  • आवळा लोणचं
  • आवळापाक
  • आवळा मुरंबा

आसे अनेक घरगुती पारंपरिक साठवणुकीच्या पदार्थ तयार करू शकता. आवळा आयुर्वेदामध्ये मनिवी शरिरीसाठी आवळा संजीवनी स्वरूपात अवलंब केला पाहिजे.

अवफडळ्यात तुरट, आम्ल, कडू, मधुर असल्याने शरीरातील कफ पित्त कमी होण्यास मदत मिळते

आवळ्यापासून मिळणारे रसायन गुणधर्म

आवळ्याच्या १०० ग्रॅम द्रावणात ७४० मी ली व्हिटॅमिन सी , प्रोटीन्स ०.६ , खनिज द्रव्ये ०.६  कर्बोहायड्रेट्स १४ टक्के,कॅल्शियम०.०५ फॉस्फरस ०.०२ , लोह १.२ हे गुणधर्म पदार्थ आढळतात. या व्यतिरिक्त टॉनिक असिड, गॅलीक असिड ग्लुकोज इत्यादी आवळ्याच्या रसायन मध्ये गुणधर्म आढळतात.

आवळा रस (ज्यूस) पिण्याचे फायदे.

ज्या व्यक्तीचे पाचनतंत्र समस्या होत असतील तर आवळा ज्युस पिल्याने पचान तंत्र सुधारण्यास मदत होते.

ऍसिडिटी व बुधकोष्ट सारख्या आजारावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. व्हिटॅमिन सी ने भरपूर असलेला आवळा अँटीओक्सीडेंट गुणांनी संपन्न असल्याचे ओळखला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *