Atal babmu लागवड योजना.

राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक समृध्द करण्यासाठी राज्य सरकार विविध योजना मार्फत बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

बांबू हे एक राज्यातील शेती कामापासून ते बांधकाम करण्यापर्यंत मोठ्या प्रमाणात बांबूचा उपयोग केला जातो. मनुष्याला सहज उपलब्ध होणारे आणि सर्वसामान्य जनतेला परवडणारे असल्याने बांबूला गरिबांचे सागवान म्हणून संबोधले जाते.

देशात बांबू बाजारपेठ ३० हजार कोटींची.

देशात सुमारे बांबू पासून तयार होणाऱ्या विवध प्रकारच्या वस्तू बांबू फर्निचर, बांबू मॅट बोर्ड, बांबू प्लाय इत्यादी उपयोगात येणाऱ्या लाकडाची उलाढाल ३० हजार कोटींच्या घरात आहे.

Global Warming मध्ये सुधार.

बांबू मध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन शोषण करणारे गुणधर्म असल्याने याचा वापर केल्याने ग्लोबल वार्मिंग चा धोका कमी करण्यास मदत होऊ शकतो. या झाडाची वृक्ष तोड ही इतर वृक्षा सारखी नसल्याने याचा कोणताही दुष्परिणाम दिसत नाहीत. बांबूच्या क्षमतेचा भरपूर उपयोग या देशातील गरीब जनता करत आहे.

बांबू लागवडीचे व्यवस्थापन व फायदे.

१)बाबू लागवडीची जीवन मान हे ४० ते ७० वर्ष असल्याने दर वर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता लागत नाही.

२) बांबू लागवड करून झाल्यावर कमी किंवा साधारण पाऊस झाला तरीही या पिकाची शेत पिकासारखी नुकसान होत नाही. बांबूच्या झुंडात दर वर्षी १० ते १५ नवीन बांबूची रोपे तयार होतात.

३) बांबू लागवडीमुळे शेत जमिनीची धूप व पर्यावरण सुधारण्यासाठी उपयोगी ठरते.

४) बांबूची लागवड राज्यातील कोणत्याही जमिनीत लागवड होऊ शकते मुरमाड असो की पाणलोट क्षेत्र या पिकास फरक पडत नाही

५) वरील करण्यात आलेल्या सर्व बाबी शेतकऱ्यांना शास्वत आधार व शेतीस आर्थिक आधार मिळवुन देऊ शकतो.

महाराष्ट्रातील बांबू  प्रमुख जाती

  • Bambusa Tulda
  • Bambusa Natun
  • Bambusa balcooa
  • Dendrocolamus brandisii
  • Dendrocolamus asper

राज्यात बांबू लागवडीच्या अभियानात व्यापारिक दृष्टीकोनातून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार बांबू लागवडीसाठी विविध योजनांच्या माध्यमातून अमलबजावणी करत आहे.

बांबू लागवड योजना व कागद पत्र

अटल बांबू योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता खालील प्रमाणे निकष निश्चित करण्यात आले आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सवलतीत रोपे मिळवण्यासाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने विहित नमुन्यातील खालील दस्तावेजासह  अर्ज करवयचा आहे.

  1. शेतीचा ७/१२
  2. गाव नमुना ८ अ अर्ज
  3. गाव नकाशा प्रत
  4. ग्राम पंचायत चां रहिवाशी असल्याचा दाखला
  5. बांबू लागवड करण्याच्या क्षेत्रात ठिबक सिंचन असणे व बांबू ची लहान रोपे  टिकवण्यासाठी व इतर पशू या जंगली प्राण्या पासून स्वरक्षण व्हावे याच्यासाठी तार कुंपण असल्याची खात्री.
  6. आधारकार्ड ची प्रत
  7. बँक खात्याचा तपशील व पासबुक प्रत व कोऱ्या धनादेशाच फोटो ल.

या योजने मुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पडीक जमिनी पासून तसेच खडकाळ जमिनीत एक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होऊन आर्थिक समृध्दी साकार होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *