Amla आवळा हे एक प्रकारचे फळ देणारे झाड आहे.झाडाच्या फांदीला पालवी येते त्यास आवळ्याचे गोल स्वरूपात फळ लागण्यास सुरुवात होते तर फळाचा आकार ५० ग्रॅम ते १०० ग्रॅम पर्यंत तयार होतो. आवळा आयुर्वेदातील महत्वाचे फळ मानले जाते ज्यात रसायनाचे प्रमाण भरपूर असल्याने त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात केला असता आरोग्यास अनेक फायदे व विविध विकारांपासून मुक्तता मिळू शकते.म्हणून आवळ्याचे आयुर्वेदिक महत्व वाढले आहे.

आवळा भारतातील सर्वच राज्यात उत्पादन केले जाणारे पीक आहे.या फळापासून मोठ मोठ्या कंपन्या शाम्पू, आवळा सुपारी, आवळा तेल, आवळा चवणप्राश, आवळा सी व्हिटॅमिन रस अश्या विविध प्रकारचे प्रोडक्ट बनवून विकले जाते.

चवीला थोडा गोड,आंबट,तुरट असणारा आवळा सर्वच वयोगटातील तरुण तरुणींना आवडत असतो. आवळा प्रत्येकानी सेवन केलं  पाहिजे.प्रत्येक व्यक्तीला निरोगी, दीर्घ आयुष जगण्यासाठी आवळा सेवन करणे उपयोगाचे ठरते.

Diabetes रुग्णांसाठी आवळ्याचे फायदे.

आहारातील बदलती जीवनशैली,कामाचा वाढता ताण याचे गंभीर स्वरूप मधुमेह अजारा वरून दिसत आहे. भारतात ग्रामीण भागासह शहरी भागातील मधुमेह टाळण्यासाठी आहारावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे.

  1. Diabetes चा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आवळा सेवन केल्याने या आजारावर नियंत्रण मिळवता येते.
  2. आवळ्यात अँटी एक्सीडेंट्स चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते नियमित सेवन करत राहिल्याने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.
आवळा खाण्याने शरीरास होणारे फायदे.

Amla juice : वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे आरोग्य बिघडत जात आहे. वेगवेगळ्या आजारावर मात करण्यासाठी आवळ्याचा रस कारगार ठरतो. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास कोणत्याही प्रकारचे बाजारात मिळणारे रसायन युक्त गोळ्या –  औषधे खाण्याची गरज भासणार नाही.

  1. अवळ्यामध्ये अँटी-ऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर राहते.
  2. नियमित आवळा खात राहिल्याने डोके शांत थंड राहते.
  3. केस गळती थांबते व डोक्यातील केस मजबुत होतात.
  4. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  5. ज्या व्यक्तींना अ्सिडिटी गॅस त्रास आहे. त्यांना आवळा चूर्ण खाणे लाभदायक ठरते.
  6. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.
  7. आवळा हे फायबर युक्त असल्याने नियमित सेवन केल्यास पोट साफ होते.
आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असतात.
  • व्हिटॅमिन सी (Vitamin C)

अवळा हा त्वचा , सौंदर्य, डोळ्यांसाठी एक गुणकारी शरीरास लाभदायक फळ आहे. ज्यापासून व्हिटॅमिन सी मिळते. इम्युनिटी वाढवण्यास आवळा ज्यूस उपयोगी ठरतो.

व्हिटॅमिन सी शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढ करण्यासाठी ओळखले जाते. दररोज आहारात समावेश केल्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होते रोगप्रतिकारक शक्ती ही पांढऱ्या पेशिवर अवलंबून असते.

  • अँटी – ऑक्सिडेंट (Anti Oxidants)

अँटी – ऑक्सिडेंटचा शरीरास खूप मोठा फायदा मिळतो आपण दैनंदिन आहारामध्ये अनेक पदार्थ खातो त्यात अँटी – ऑक्सिडेंट असणे आवश्यक असते. शरीरातील आजाराशी फाईट करण्यास अँटी – ऑक्सिडेंटचा उपयोगी मानले जाते.

  1. मेंदूला चांगले प्रकारचे काम करण्यास मदत करते.
  2. ऑक्सिडेंट मुळे केसांची नियमित वाढ होते.
  3. डोळ्याची दृष्टी वाढवण्यास मदत मिळते.
  4. लिंबू, आवळा, संत्री यात हा पदार्थ मिळतो.
  • पाचान क्रिया सुधार (Improves digestive function)

आवळा नियमित सेवन केल्याने पाचांन क्रिया मद्ये सुधार होतो व पोटाच्या गॅसेस पासून मुक्तता मिळते. तसेच सुगर लेवल कमी होण्यास मदत मिळते.

 

सूचना :-

वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून या विविध माध्यमाच्या माध्यमातून प्राप्त करून प्रदर्शित करण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी त्या विषयाच्या क्षेत्रातील जाणकार तज्ञांचा सल्ला घ्यावा ही माहिती सामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित केली जात आहे. इतर कोणत्याही नुकसानीस लेख अथवा लेखक या वेबसाईट जबाबदार राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *