Agriculture Recruitment maharashtra State कृषी विभागात २१०९ कृषी सेवक पदांची भरती होणार.

राज्यातील कृषी विभागात शासनाने तब्बल २१०९ पदाची भरती करण्याचे ठरविले आहे. तीन वर्षा नंतर कृषी सेवक पदाची भरती करण्याचा निर्णय राज्यातील शिंदे सरकारने घेतला आहे. राज्यातील ८  विभागामधील जिल्ह्यामध्ये या रिक्त पदाची भरती होणार आहे. असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामधे तब्बल दोन हजार एकशे नऊ जागांची भरती होणार असल्याने येणाऱ्या पंधरा दिवसात या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू होऊ शकते. या सर्व रिक्त पदासाठी थेट संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.

राज्य शासनाच्या कृषी व पदुम दुयम गट क पदाच्या रिक्त जागा भरती 

गट क संवर्गातील कृषी सहायक पदाच्या मोठ्या संख्येनं रिक्त कृषी सहाय्यक व सेवक पदाची भरती होणार आहे.

१) उमेदवारांना कृषी सेवक पदाच्या भरती साठी https://krishi.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर जाऊन उपलब्ध लिंक व्दारे अर्ज करायचा आहे.

२) तसेच वरील दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा आवडीचा अर्ज ऑनलाइन भरू शकता.

३) ऑनलाइन नोंदणी करुन संकेत स्थळाच्या पृष्ठावर अर्जदार करणाऱ्या तो किंवा तिचा फोटो स्वाक्षरी केलेला अपलोड करावा लागेल तरच ऑनलाईन नोंदणी होऊ शकते.

४) उमेदवारांना सर्व आवश्यक कागदपत्र जोडणे व अपलोड करणे अनिवार्य आहे.

शेतकऱ्यांच्या मुलांचे मोठे स्वप्ने 

राज्यात शेतकऱ्यांच्या मुलांचे सप्न बरेच असतात पण मागील काही वर्षापासून सरकारी जागा निघत नसल्याने पोरांची सप्ने ही लयास मावळत होती पण राज्य सरकारने २०२३ मध्ये कृषी अधिकारी बनण्याचे स्वप्न दाखवत शेतकऱ्यांच्या मुलाना एक संधी दिली आहे.

  • या जिल्ह्यात होणार पद भरती 
  • ठाणे.           २९४
  • कोल्हापूर.     २५०
  • पुणे.            १८८
  • नाशिक.        ३३६
  • अमरावती.     २२७
  • लातूर.           १७०
  • संभाजी नगर   १९६
  • नागपूर           ४४८

कृषी आयुक्तालयाच्या अधिपत्याखाील गट – क मधील विविध संवर्गातील सरळ सेवा पद भरती बाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.त्या रिक्त पदाची जागा भरण्यासाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच पदे निश्चित करण्याचेही कार्यवाही देखील अंतिम टप्यात आली आहे.२५८८ रिक्त पदे लक्षात घेता यातील ८० टक्के म्हणजे दोन हजार एकशे नऊ कृषी सेवक पदासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *