आगरवूड हे एक प्रकारचे वृक्ष असून जगतील सर्वात महागड्या लाकडा पैकी एक आहे.या लाकडाचा उपयोग विविध प्रकारचे परफ्यूम बनविण्यासाठी तसेच अगरबत्ती,व इतर सुगंधी वस्तू तयार करण्यास उपयोग केला जातो. आगरवुड हे झाड वन कायदा १९२७ या कायद्यानुसार भारतातील वृक्षाची एक अत्यंत दुर्मिळ प्रजाती आहे. आधुनिक युगात विविध प्रकारचे कृत्रिम सुगंध देणारे उत्पादने बनवली जात आहेत. परंतू कृत्रिम साहित्याचा वापर करून बनवण्यात येणाऱ्या उत्पादनाचा सुगंधी दर्जा क्षणिक असून मानवी शरीरास धोकादायक ठरतो आहे. त्याच बरोबर पर्यावरणास नुकसान ठरत असल्याने आगरवूड या झाडास अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
Agarwood या झाडापासून अनेक सुगंधी वस्तू बनविण्यासाठी सर्वाधिक वापर केला जातो ज्यात अगरबत्ती, धूप गोळ्या, तेल ,संधिवात तेल, परफ्यूम बनवणाऱ्या कंपन्या agarwood चां वापर करत आहे. या झाडाचा उपयोग चायना लोकांनी भरपूर प्रमाणात केला आहे. चीन मधील पुरुषांनी याचा उपयोग शामक,आणि कामोत्तेजक म्हणून केला जातो.

आगरवूड लागवड करणारे राज्य

आगरवूड या झाडाचे उगमस्थान ईशान्येकडील राज्यात किंवा हिमालयीन प्रदेशात मानले जाते. तर त्रिपुरा राज्यात या झाडास राज्य वृक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. या वृक्षाला अनेक नावाने ओळखले जाते १) कृष्णागरू २) दहागरू ३) काष्टागरू ४) स्वादगरू असे अनेक उप नाव आहेत.

  1. त्रिपुरा
  2. आसाम
  3. मेघालय
  4. मणिपूर
  5. हिमालयीन प्रदेश

या पाच ठिकाणी मुख्य आगरवूड झाडाची लागवड केली जाते. उत्पादन कमी व मागणी वाढल्याने झाडाच्या किमतीत ही मोठी वाढ झाली असून याचे उत्पादन बऱ्याच राज्यात समुद्र किनार पट्टी लगत चांगले उत्पादन मिळू लागले आहे. ज्यात महाराष्ट्र, गुजरात,केरळ, कर्नाटक, अशा अनेक राज्यात उत्पादन वाढविण्यात भर देण्यात येऊ लागला आहे .

अगरवुडचा उपयोग 

आरोग्यसंबंधित उपयोग: अगरवुडच्या तेलाचा उपयोग धूप, स्नानक्रीम, आणि मालिश तैयार करण्यात केला जातो, ज्यामुळे त्वचा केवळ साफ असते, तरी ती काही रोगांवर परिणामीपणे फायद्याची असू शकते.

आर्थिक उपयोग: अगरवुड एकमेव लाकडी मूळ आहे ज्यामुळे त्याचा उत्पादन आणि विपणन करण्यामागे उत्तम मार्ग असू शकतो. त्यामुळे त्याचा व्यापारिक उपयोग अत्यंत महत्त्वाचा आहे.

आध्यात्मिक उपयोग: काही संस्कृतीत अगरवुडला आध्यात्मिक महत्त्व दिला जातो. त्यामध्ये मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी, चिंतांच्या परिहारासाठी, आणि मेधांच्या वृद्धीसाठी तो वापरला जातो.

सौंदर्यशास्त्रिक उपयोग: अगरवुड त्याच्या गंधी स्वभावामुळे सौंदर्य उत्पादनात वापरला जातो, जसे की इत्र, धूप, आणि स्नान उत्पादन.

चिकित्साशास्त्रीय उपयोग: अगरवुडच्या गंधाची चिकित्साशास्त्रीय गुणधर्म काही आज्ञांकित करतात, जसे की स्त्रीरोग, माइग्रेन, व्यसनमुक्ती, करण्यास उपयोगी ठरते 

आगरवूड लाकडाची किंमत 

अगरवुडच्या विविध सुगंधी झाडाचे जागतिक पातळीवर वेगळे स्थान निर्माण झाले आहे.तिची शाखा, खोड आणि मुळांची उत्पत्ती, कालावधी आणि कापणी आणि प्रक्रिया करण्याच्या पद्धतींवर प्रभाव पडतो.

चंदन, गुलाबी हस्तिदंत आणि आगरवूड जगातील सर्वात महागड्या लाकडांपैकी एक मानले जाते . दर्जेदार सुगंध वर्धक असलेले हे झाड जगातील सर्वात महाग नैसर्गिक कच्च्या मालांपैकी एक आहे . आगरवूड झाडाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत ७० ते ७५ लाख रुपया पर्यंत सांगण्यात येते एवढ्या मोठ्या किमतीत असूनही लाकडाचे उत्पादन कमी आहे. गुणवत्तेची आणि उत्पादनांची विस्तृत श्रेणी बाजारपेठेत भाव वाढवण्यास कारणीभूत ठरते.भौगोलिक स्थान, वनस्पतिजन्य प्रजाती, विशिष्ट झाडाचे वय, सांस्कृतिक निक्षेप आणि आगरवुडचा तुकडा ज्या झाडापासून निघतो त्या झाडाची किंमत ठरवते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *