कोकण ( Kokan)
मध्य भारतातील महाराष्ट्र राज्यास लाभलेला कोकण हा प्रदेश निसर्ग, समुद्र, उंच उंच दऱ्या, डोंगराळ प्रदेश, सह्याद्रीच्या पर्वत रांगा या परवतांना धडकणार निळसर पाणी त्याचबरोबर पश्चिम समुद्रकिनारा सर्वांना आनंदित मोहित करना कोकण कडा, येकदा पाऊल पडल की तुम्हाला अस जाणवेल नैनीताल, पिथोरागड सारखे रोड वळण दार रस्ते, उंच उंच घाट रस्ते, कोकण म्हटल की क्षितिजाला समुद्र मिळाला असे जाणवते. किनारपट्टी जवळपास ७२० कि मी. लांबीची लाभली असल्यामुळे पर्यटकांचे आकर्षणाचं केंद्र ठरते.
कोकणातील समुद्र किनारा पर्यटकांना उन्हाळयात सर्वाधिक लक्ष वेधून घेत असतो कोकण भूमी ही अनेक नैसर्गिक साधन संपतीने नटलेली आहे. येथील हापूस अंबा, गावरान केली,सुपारी, फणस, काजूच्या बागा, नारळ, कोकम, जांभळं, करवंद अश्या अनेक प्रकारच्या फळांची चव पर्यटकांची उत्कंठा वाढवत राहतात. नविण्याने भुरळ पाडणारा,ऐतिहासिक वारसा असलेला हा प्रदेश आज आपली अस्मिता परकियांच्या हातात देऊन टाकला जात आहे.
महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत.(How many administrative divisions are there in Maharashtra)
महाराष्ट्रात सहा प्रशासकीय विभाग असून याच प्रशासकीय विभागांमधील कोकण हा एक विभाग आहे. ज्यात ज्यात ७ जिल्ह्याचा समावेश होतो. कोकण विभागाला दोन महानगर लाभले आहे. तर बहुतांश लोकसंख्या ही शहरी भागामध्ये वास्तव्यास राहते.
कोकण लाल माती (Konkan red soil)
भौगोलिक परिस्थितीनुसार निसर्गाने नटलेला कोकण महाराष्ट्राचा (स्विझर्लंड) म्हणून ओळखला जातो. बहुतांश जमीनीचा स्तर इतर विभागाच्या तुलनेत कडक व लाल गेरू रंगाचा आहे. कोकनातील माती लाल गेरु रंगाची दिसण्याचे कारण म्हणजे माती मद्ये लोहाचे असलेले प्रमाण व मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस, उन्हाचा चटका बसून लाल जांभळ्या खडकाची होणारी झीज लाल मातीला जन्म देते हीच प्रक्रिया वर्षानुवर्ष चालत राहिली आहे.
कोकण शेती (Konkan agriculture Farm)
लाल मातीचा उपयोग कृषी उत्पादनासाठी योग्य समजली जाते. ज्यात काजूच्या बागा, सुपारी, आंबा, अश्या अनेक फळबाग व खाच राच्या जमिनी मद्ये भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागली आहे.तर डोंगराळ उथळसर जमिनीमध्ये नाचणी शकते. अश्या जमिनीत लोहाचे व कुजलेल्या पानापासून अनेक मूलद्रव्य आढळतात तर डोंगराळ पट्ट्यातील माती नाचणीच्या बुडाला चिकटून राहत असल्याने मातीचे पावसा सोबत वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते.
कोकणातील प्रमुख मुख्य नद्या.(main rivers of Konkan)
महाराष्ट्राला सर्वाधिक नद्यांचे उगमस्थान कोकण विभागाला लाभले आहे. पौराणिक कथांमध्ये संत कालिदास यांच्या मेघदूत या काव्यात यक्ष देवतास दक्षिणेकडून उत्तरे कडे जात असताना पृथ्वीचे सौंदर्य कसे आहे हे विचारना करण्यात आली आहे. त्यावेळी दक्षिने कडील जमिनीवरचे सौंदर्य अचूक डोंगर दर्याचे वर्णन ही मेघदूत ग्रंथात या कथा मार्फत ही मिळते.
कोकणातील निसर्ग सौंदर्यात सह्याद्री पर्वतामधून उगम पावणाऱ्या नद्यांनी पर्यटन वाढवण्यासाठी अनमोल योगदान दिले आहे. सह्याद्रीच्या डोंगरा मधून उगम पावणाऱ्या नद्या जश्या लहान बाळाच्या जन्म देतात तशा पद्धतीने दिसतात. या नद्यांना आकाशातून समुद्राला मिळताना पहिले त्यावेळी एखादी पोर सासरला जाऊन माहेरी आल्यावर आईला मिठी मारते अगदी त्याच प्रमाणे समुद्राला मिळतात.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख नद्या.(Main rivers of Ratnagiri district)
सह्याद्रीच्या कुशीतून बहुतांश नद्यांचा उगम होऊन पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. प्रमुख नदी जगबुडी नदी, बाव, रत्नागिरी, जैतापूर, मचकुंदी नदी, विशिष्ट नदी, जैतापूर नदी, सावित्री नदी उप नदी शास्त्री नदी, भरजा ,केव, काजळी नदी, नदी,शिव नदी,रत्नागिरी जिल्ह्यातून या प्रमुख नद्या वाहतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख नद्या. (Main rivers of Sindhudurg district.)
सिंधुदुर्ग जिल्हा कोकणातील सर्वात जास्त नद्याचा उगम असलेला प्रसिद्ध जिल्हा आहे. प्रमुख नदी देवगड, गड नदी, तेरे खोल, वाघोटन, कर्ली, तिलारी उपनद्या आचरा नदी, नदी,जाणवली, खांडरा,बंडा,बेल, पियाळी, शकू,भामसाळ, सुखशांती, सरंबळ या प्रमुख व उप नद्या उगम पावतात.
रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्या.(Main rivers of raigad district)
रायगड जिल्ह्यास ऐतिहासिक व भौगोलिदृष्ट्या महत्वाचे स्थान प्राप्त झाले असून राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराची राजधानी म्हणून ओळखले जाते. रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्या उल्हास नदी, घोड नदी, गांधार, सावित्री, काळ, पाताळगंगा, अंबा, कुंडलिका
पालघर जिल्ह्यातील प्रमुख नद्या (Major rivers of Palghar district
पालघर हा जिल्हा कोकणच्या उत्तर दिशेच्या टोकावर पहावयास मिळतो. सह्याद्रीच्या पर्वत रांगा, वैतरणा खोरे तसेच उल्हास खोरे या जिल्ह्यास नद्यांच्या खोऱ्यामुळे अधिक महत्व प्राप्त होत. पालघर जिल्ह्यातून वाहत जाणाऱ्या प्रमुख नद्या.वैतरणा नदी,उल्हास नदी उप नदी बारवी, भातसा, पिंजाल, सूर्य, दहेरजा, तानसा.
कोकणातील नद्यांचे निसर्गसौंदर्य वाढवण्यास मोठे योगदान लाभले आहे.