Organic Jaggary

देशातील शेती करण्याचा वाढता कल तरुणाईला भुरळ पाडत चालला आहे.असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही बहुतांश तरुण मंडळी शेतीतून उदरनिर्वाह व्हावा यासाठी शेती कसत नाहीत. किंवा पारंपरिक पद्धतींची शेतीही करत नाहीत.ज्या पद्धतीने नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक पद्धतीने शेती केली जाते आहे.त्याचे उत्पादन पारंपरिक शेती पेक्षा अधिक असून इतर कोणत्याही रासायनिक औषधांचा वापर केला जात नाही.आपण ऊस sugarcane या पिका पासून अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय गूळ निर्मिती सुरू करून स्वतःचा ब्रँड विकसित केला आहे. राज्यातील अनेक तरुणांनी शेतीत नवनविन सातत्याने प्रयत्न करून सेंद्रिय गुळा पासून भरघोस उत्पन्न ही मिळवले आहे. सेंद्रिय गुळाला बाजारात मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने दर ही कमी होत नाहीत. सेंद्रिय पद्धतीने बनविला असल्याने निसर्गाचा कोणताही फरक या गुळावर पडत नाही. जस जसा जुना होत जातो तसा त्या गुळाची चव अधिक वाढत जाते. अनेक रोगांवर औषधी उपाय म्हणून ही वापर केला जातो.

सेंद्रिय गुळा खाण्याचे फायदे.
  1. सेंद्रिय गूळ जिभेला चिटकतो ज्यामुळे स्वाद दीर्घकाळ ठीकुन राहतो.
  2. दर दिवशी ५० ग्रॅम खात राहिले तर शरीरातील ऊर्जा , खनिज टिकून राहते.
  3. जेवण झाल्यानंतर गूळ खाल्याने जेवण पचन होण्यास मदत मिळते.
  4. थंडीचा खोकला असो या घशातील खवखव कमी करण्यासाठी गुळाचा वापर केला जातो.
  5. गुळाच्या नियमित सेवन केल्याने शारीरिक थकवा कमी होतो.
गुळ खाण्यापासून मिळणारे जीवनसत्व.

पचन इंद्रिय व्यवस्थित राहावे म्हणून अनेक जण सेंद्रिय गूळ खाण्याचा सल्ला देत असताना आपण पाहिले आहे. गुळा पासून शरीरास अनेक प्रकारचे जीवनसत्व मिळतात ज्यामुळे जेवणानंतर अल्प प्रमाणांत सेवन केले पाहिजे.

  • सेंद्रिय गुळामध्ये व्हिटॅमिन ई
  • फॉस्फरस
  • मॅग्नेशियम
  • पोटॅशियम
  • लोह
  • मॅग्नीज
  • जस्त

अश्या प्रकारे गुळाचे सेवन केल्याने शरीरास अत्यावश्यक असणारे गुणधर्म अगदी सहज रित्या उपलब्ध होतात. सेंद्रिय गुळाचे सेवन करत राहिल्याने गुळामद्ये मोठ्या प्रमाणत असणारे लोह खनिज असल्याने शरीराला आवश्यक रक्तातील हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढते.

सेंद्रिय गूळ खर्च कमी उत्पादन जास्त.

मागील काही वर्षा पासून अनेक जिल्ह्यांमध्ये गुळ बनवण्याचे केंद्र म्हणजेच गुऱ्हाळ बंद झाले होते याचे मुख्य कारण मजुराची होणारी कमी, वाढती रोजंदारी व तयार होणाऱ्या मालास मिळणारा कमी हमीभाव याचा फटका गुऱ्हाळावर झालेला दिसतो.

पण जस जशी सेंद्रिय गुळाची संकल्पना मांडण्यात आली आहे तेंव्हा पासून गुळ बनवण्याचा व्यवसाय गुऱ्हाळ प्रगती पथावर आहे. अनेक नवीन शेतकऱ्यांनी १ क्विंटल ऊसा पासून १४ किलो पर्यंत गुळाचे उत्पादन घेतले आहे. गुळ बनवण्याच्या प्रक्रियेत पुदिना, आद्रक,देसी गायीचे तूप, तुळशी, गुजबेरी, गावठी भेंडी,अश्या विविध पदार्थाचा उपयोग करून सेंद्रिय गुळाचा दर्जा आणखी वाढ करण्यात आली आहे.

सेंद्रिय गुळाचे आरोग्यास फायदे कोणते

सेंद्रिय गूळ खाण्याने आरोग्यास अनेक लाभदायक फायदे जाणून घेणार आहोत.

१) ऍसिडिटी नियंत्रणात राहते.

२) गुळामध्ये शेंगदाणा, काजू, बदाम, खजूर ,टाकून मेवा तयार केला जातो.

३) नैसर्गिक गुळामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे हाडे मजबूत ठेवण्यासाठी मदत होते.

४) अन्न पाचन होण्यास जेवणानंतर गुळ खाला पाहिजे.

५) नैसर्गिक गुळ हा रसायन मुक्त असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून या विविध माध्यमाच्या माध्यमातून प्राप्त करून प्रदर्शित करण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी त्या विषयाच्या क्षेत्रातील जाणकार तज्ञांचा सल्ला घ्यावा ही माहिती सामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित केली जात आहे. इतर कोणत्याही नुकसानीस लेख अथवा लेखक या वेबसाईट जबाबदार राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *