मानवी समुद्राच्या देशात यंत्राचा वापर
देशातील यांत्रिकीकरणाचा झपाट्याने वाढता कल लक्षात घेता पशू च्या साहाय्याने शेती आता पूर्णतः संपुष्टात येईल का असे वाटू लागले आहे. उत्तर भारतातील काही राज्याच्या जसे की पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेश यांत्रिकीकरणाचा आवलंबनातून लक्षात येते अधिकाधिक शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जाऊ लागला आहे.यांत्रिकीकरण योग्य पण समजले जाईल पण कितपत पशूंच्या सहायाने केली जाणारी पारंपरिक शेती कमी उत्पादकता या खर्चिक शेती समजली जाते. म्हणून मनुष्य बळाचा वापर व संगोपन खर्च कमी होऊ लागला आहे.कामगारांची कमी, जैविक विविधतेचा कमी, वातानुकूलनाचे परिणाम, आणि वातावरणातील बदलामुळे कृषी प्रणालीवर होणारे परिणाम व अपघात यांत्रिकीकरणाचा वापरामुळे जमीनीची पोत दिवसेंदिवस खालावत चालली आसून जमीनीची पोत राखण्यासाठी सेंद्रिय खताची मात्रा मुबलक प्रमाणात तयार करण्यासाठी शेणखताची गरज भासत असते. जमीनीची पोत सुधारण्यास गांडूळ खत निर्मिती करणे प्रत्येक शेतकऱ्यांचे स्वप्न असेल पाहिजे.जमिनीचे आरोग्य सजीव ठेवण्यासाठी सेंद्रिय खतास उत्तम पर्याय मानले जाते. खताचा निर्मितीसाठी मोठ्या संख्येने पशुधन असणे आवश्यक असणे काळाची गरज बनत आहे.
जागतिक रासायनिक खत आयात करण्यात भारत १ एक क्रमांकाचा देश असून युरोप व अमेरिका या देशाकडून सर्वात जास्त आयात केला जातो. तसे आपण पशुसंवरधन लक्ष दिले नाही तर परदेशातून सेंद्रिय खत आयात करावे लागेल.पशुसंवरधन जोपासले तर इतर कोणत्याही देशाकडे सेंद्रिय खतासाठी हात पसरावे लागणार नाही. कोणत्याही देशाच्या विकसासाठी आयाती पेक्षा निर्यात होणे हे त्या देशाची अर्थव्यवस्था व प्रगती साठी महत्वपूर्ण मानले जाते. म्हणून आपणाला इतरत्र देशाबरोबर पर्गती प्रवाहात येण्यासाठी आयात करण्याची वेळ आली नाही पाहिजे.
लोकसंख्या वाढ समस्या
१) देशात दर दिवसाला ६७,४०० बाळांचा जन्म होतो तर मृत्य पावणाऱ्याची संख्या २८२०० पर्यंत आहे.
२) जन्म दर वाढीचा असाच राहिला तर सध्याचे उत्पादन लक्षात घेता २०५० पर्यंत दोन पट वाढवावे लागेल.
३) हवामानाच्या बदला मुळे आशिया व आफ्रिका खंडात दुष्काळी परिस्थिती पहाता अन्न धान्य पिकवण्यात कमी येऊ शकते.
४) याचे परिणाम भुखमरी, कुपोषण, भुकबळीची संख्या वाढू लागेल.
५) भेसळ युक्त दुधा पासून ते अन्नधान्य पर्यंत रोखणार कसे ज्यामुळे अनेक लोकांच्या भेसळयुक्त पदार्थापासून आजारी पडण्यापर्यंत अनेक समस्या आहेत.
६) प्रत्येक भारतीय अन्न हे पूर्णब्रह्म या अमृत समजतो ज्यामुळे शेतकऱ्यांना निश्चित करावे लागेल उत्पादन विषाचे करायचे का या अमृता चे करायचे.
७) लोकसंख्या लक्षात ठेऊनच भारतीयांसाठी कोणत्याही फळ असो की पीक प्रक्रिया करून उत्पादनावर भर दिला जात आहे.
8) या भेसळयुक्त फळाची विक्री भारतातच केली जाते
रासायनिक फवारणी
पाश्चिमात्य कंपन्या भारतीय बाजारपेठेत रासायनिक कीटक नशकाचा वापर करून पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध करू लागल्या आहेत. कीटक नाशकाचा वापर कसा केला पाहिजे एजंट मार्फत सांगितले जात आहे. म्हणून गावचे गाव या शेतकरी बळी पडत आहे. शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे विष पिकवून विकणार नाही या स्वतः खाणार हि नाही.
तुम्हाला सांगायचं झालं तर उदाहरण घ्या हापूस आंब्या ची गोडी संपूर्ण विश्वात साद घालत होती. पण आपल्या हव्यासा पोटी रसायनाचा भडिमार केला आणि याचे परिणाम असे झाले की हापूस आंब्याला बहुतांश देशांनी नाकारले आहे. यामागचे मुख्य कारण असे की अती प्रमाणात कार्बाइड चे प्रमाण व रासायनिक अंश मिळाल्यामुळे पश्चिम व अमेरिकी देशांनी साप नकार देऊन हे फळ भारत परत पाठहून दिले आज तेच फळ कोणत्याही तपासणी शिवाय आपण सहज खाऊ शकतो.
रासायनिक खताचा वाढता आलेख.
कीटक नाशक वापरासाठी भारत जगातील सर्वांत मोठी फ्री बाजार पेठे असल्याने कीटक नाशक कंपन्या त्यांनी बनवलेले रसायन औषध उत्पादने विकली जावेत यासाठी नवनविन पद्धती वापरून येथील शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करत आहे.
- मागील दशका पासून कीटक नाशक, तन नाशक, फळांची वाढ होण्यासाठी वापरले जाणारी जैविक औषधे यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
- तन नाशकाच्या फवारणी जमीनीचा स्तर खालावत जात असून याचे परिणाम शेतीला पोष्टीक समजले जाणाऱ्या जिवाणूंची आपण हत्या करत आहोत.
- उत्पादन वाढीसाठी वेगवेगळ्या फवारण्या केल्याने उत्पादन वाढले परंतु औषधाच्या अती वापराने मनुष्याचे वयोमान घटण्यास सुरुवात झाली आहे.
- बाहेरील कंपन्या दर वर्षी भरघोस नफा कमहून जात आहेत भारतीय मात्र उत्पादन वाढल्याचे सांगून जहरीले भाजी पाला खाहून अनेक समस्यांना सामोरे जात अहेत.
- दर वर्षी आर्थिक पाहणीचा अहवाल निघतो. त्यात भारतात प्रति वर्षी २० टक्क्यांनी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वाढता आलेख उंचावत दिसत आहे.
शेती टिकवणे म्हणजे शेती नाही
प्रत्येक शेतकरी गर्वाने सांगत असतो माझ्या पूर्जांची शेती मी टिकवून ठेवली आहे.पण रासायनिक खतांचा व कीटक नाशकाच्या अती वापराने मृत होत चालली आहे.त्यांना माहीतच नसेल शेती कुपोषित झाली की तुमचे उत्पादन निम्मं होइल जर भविष्यात जमीनीची मृदा टिकवून ठेवायचे असेल तर रासायनिक खतांचा त्याग करून सेंद्रिय शेतीचा अवलंब केला पाहिजे.