Maize मका
मक्का भारतीय शेतकऱ्यांचे सर्वाधिक पसंतीचे पीक आहे. याचा उपयोग दैनंदिन आहारामध्ये स्वादिष्ट पकवान बनवण्यापासून ते पशू खाद्य पदार्थ बनवण्या पर्यंत उपयोग केला जातो.
भारतीय बाजारपेठेत मक्का या बिजाची आयात १६ व्यां शतकात पोर्तुगीजांच्या मार्फत दाखल झाली असे सांगण्यात येते. तर काही जणांचे मत आफ्रिका व अमेरिकेतील व्यापारी वर्गाकडून आयात करण्यात आले असे सांगण्यात आलं आहे.
जागतिक तृणधान्य उत्पादना पैकी भात, गहू नंतर मक्याचा सर्वाधिक उत्पादनात तिसरा क्रमांक लागतो.हे पीक ऊष्ण व समशीतोष्ण कटिबंधात येणारे पीक अगदी सहज रित्या घेतले जाते.
जमीन
मक्का या पिकाची लागवड करण्यासाठी जमीन मध्यम, चिकणी, भारी पाण्याचा योग्य निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत अगदी सहज उत्पादन मिळते त्यासाठी चांगली मशागत करने गरजेचे आहे.
जमीनीची PH मात्रा ७ असली पाहिजे ज्यामुळे पिकाची मोठ्या प्रमाणात वाढ होऊन कणीस दाणेदार तयार होते.
पेरणी पूर्व मशागत
या पिकासाठी उन्हाळयात २० ते २२ सेमी खोल नांगरट करने आवश्यक आहे. नांगरणी केल्याने जमीनीचा खालचा भाग वर तर वरचा भाग खाली जातो ज्यामुळे जमीनीचा PH मात्रा व कस सुधारण्यास मदत होते. कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या घालून जमीन स्वच्छ करून घ्यावी.
पेरणी वेळ
- पेरणी व लागवड मक्का या पिकाची खरीप हंगामातील जून महिन्याच्या २ ऱ्या आठवड्यात करावी.
- जमिनीत ओलावा असेल तर पेरणी करून घ्यावी
- लागवड करत असाल तर ७५ ते ८० से.मी.अंतर दोन ओळीतले असावे.
- बोधावर लागवड करण्यासाठी दोरीचा साह्याने १५ ते २० सेमी अंतर ठेवावे.
- प्रति एकरी बियानाचा वापर २० ते २२ किलो करण्यात यावे.
खत व्यवस्थापन
- पेरणीच्या वेळी ;- ४० किलो नत्र ६० किलो स्फुरद ४० पालाश द्यावे.
- पेरणी च्या ३० नंतर :- ४० किलो नत्र ०० किलो स्फुरद ०० पालाश द्यावे.
- पेरणी नंतर ४५ दिवसांनी :- ३० किलो नत्र ०० किलो स्फुरद ०० पालाश द्यावे.
मका सुधरीत वान
१) पुसा हायब्रीड १
२) डी ९४१
३) प्रकाश JH ३१८९
४) शक्तीमान १
५) पार्वती
६) गंगा
७) शक्ती
पाणी व्यवस्थापन
- पहिले पाणी मकाची उगवण झाली असता १० ते १२ दिवसांनी पहिले पाणी द्यावे.
- पेरणी नंतर २५ ते ३० दिवसांनी पिकाची वाढ जोमदार होण्यासाठी.
- मका हे पीक फुलोऱ्यात आले असता ४० ते ५० दिवसांनी द्यावे.
- चौथे पाणी कणीस या दाने भरून येण्याचा दिवसात ६५ ते ७० दिवसात द्यावे.
मका एकरी उत्पादन
१) पुसा हायब्रीड (१२ ते १४ क्विंटल प्रति एकर)
२) डी ९४१ (१३ ते १४ क्विंटल प्रति एकर)
३) प्रकाश JH ३१८९ (११ ते १३ क्विंटल प्रति एकर)
४) शक्तीमान १ (१३ ते १४ क्विंटल प्रति एकर)
५) पार्वती (१४ क्विंटल प्रति एकर)
६) गंगा (१६ ते १८ क्विंटल प्रति एकर)
मका कणीस खाण्याचे फायदे
मका खाण्याचे अनेक नैसर्गिक फायदे आहेत.
- मक्का दैनंदिन आहारात समावेश केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
- रक्त वाहिण्यामधील कॉलेस्ट्रॉल साफ होण्यास मदत होते
- मधुमेह असणाऱ्या व्यक्तीस मका चे सेवन दररोज केल्याने मधुमेह कमी होतो.
- साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
- मक्याचे कणीस खात रहिले तर दात स्वच्छ व मजबूत राहतात.
- मका कणीस खाण्याने आम्ल पित्त कमी होते व शरीर निरोगी राहते.