दुधाचे दर कोसळले
देशातील दुधाचे उत्पादन १५ टक्के पर्यंत वाढ झाली आहे.कोरोना नंतर निर्यात पुरवठा कमी झाला व दूध पावडर आणि बटर साठे, अन्य दुग्ध जन्य पदार्थ गोदामात साठून राहिल्याने २०२० च्या नंतर देशातील डेअरी प्रकल्पा मधून मागणी नसल्यामुळे व देशातील दूध उत्पादन जास्त व मागणी कमी झाल्याने दूध व्यवसायिकांना जास्त उत्पादन झाल्याने आर्थिक नुकसान होण्याची सतावत आहे.
अतिरिक्त दूध उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
राज्यात अतिरिक्त दूध उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांना डायरेक्ट नुकसान होणार. होय हिरवा चाऱ्याचा वाढता भाव, पेंड, गुरांसाठी लागणारा भुसा पशुला देण्यात येणाऱ्या कोणत्याही चाऱ्या मद्ये कमी किंमत होणार नाही.
ज्यामुळे शेतकऱ्यांना दर कमी होण्याने आर्थिक नुकसानीचे ठरणार आहे
सहकार दूध व्यवसायाची स्थापना.
भारतीय सहकार दूध व्यवसायाची स्थापना करण्याचा हेतू असा होता की १९७० ते ७१ साली भारतामध्ये १० लाख च्या पुढे लोकसंख्या असलेली फक्त ९ शहरे होती त्यातील मुंबई, मद्रास, दिल्ली, कलकत्ता या चार प्रमुख शहराची लोकसंख्या ही २ कोटी पर्यंत होती.
ज्यामुळे १९६५ ते १९७१ या वर्षांत शहरातील लोकांची दुध मागणीत झपाट्याने वाढ झाल्याने खाजगी क्षेत्रातील दूध पुरवठा कमी पडू लागला म्हणून सरकारच्या मध्यस्थीने भारतातील पहिली संस्था स्थापन करण्यात आली.
दुधाचे भाव कोण ठरवतो
१) खेडा जिल्हा दुग्ध उत्पादक संघ स्थापन १९४७
२) राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळ स्थापन १९६५
३) ऑपरेशन फ्लड स्थापन १९६८ ते १९६९
४) दुग्ध उत्पादकांचे १४३ संघ १९६९ नंतर स्थापन
५) राज्य सहकारी दूध संघ स्थापन ९ जून १९६७ (महानंद)
गुजरात दूध डेअरी संघ देशात विकास
- गुजरात सहकारी दूध संघ एकत्रित येऊन अमुल दूध डेअरी स्थापना
- देशातील दूध उत्पादन करणारी सर्वात मोठी अमुल डेअरी आहे.
- इतर राज्यात दूध विकण्यास कोणतेही निर्बंध नसल्याने अमुल डेअरी मार्केट काबीज केले आहे.
- कर्नाटकचे (नंदिनी) तर तमिळनाडू चे (कावेरी) आजही राज्यात सर्वोत्तम दूध विक्री करणारे संघ आहेत.
- देशात गुजरात मधील दुधाची विक्री कमी केली तर इतर राज्यात दुधाला उकळी येईल.
महानंदा दूध डेअरी
देशात सर्वात प्रथम दूध क्रांती ही महाराष्ट्राने घडवून आणली होती पण त्याच क्रांतीचां मागील दशका पासून र्हास झालेला दिसतो आहे.
महाराष्ट्रात प्रथम आरे दूध संघाची स्थापना करण्यात आली होती पण नंतर दूध वितरण बंद करण्यात आले.
राज्यात १९६७ साली महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघाची (महानंदा) स्थापना करण्यात आली २५ जिल्ह्यात तर ६० तालुक्यात सभासद पद तसेच प्रत्यके खेडे गावात दूध सोसायटी बहाल करण्यात आले होते.
दूध नियंत्रण समितीचे कार्य काय आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यातून दूध गोळा करणे व दुधाचा भाव ठरविणे हे या समितीचे मुख्य कार्य आहे.
मागील तीन महिन्या पूर्वीच गाईच्या दुधाचे दर ३७ रुपये होते तर ते आज २७ ते २८ पर्यंत खाली झेपावले आहेत. मनमानी खासगी संस्थांनी दुधाचे भाव कमी केली आहे. तरी पण दूध नियंत्रण समितीने या खासगी संस्थांना कोणतेही जाब विचारता आले नाही.
या खासगी दूध संस्थानाने फक्त शेतकऱ्यांना पिळवण्याचा डाव आखला आहे.