Sunflower सूर्यफूल
सूर्यफुल(Sunflower) हे नाव मूळ लॅटिन अमेरिका पेरू,ग्रीक यांच्या शब्दकोश वाणीतून प्रकट झाला आहे. भारत खाद्य तेल आयात करणारा जगात सर्वात मोठा देश आहे. युक्रेन,रशिया,मलेशिया, या देशाकडून ७० टक्के पूर्ती केली जाते जर खाद्य तेल उत्पादनात आत्मनिर्भर बणण्या साठी सूर्यफुल प्रजातीचा विकास करणे आवश्यक आहे.भारतात या शब्दाला अंनाण्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.
हे फुल जसे की सूर्यप्रकाशाच्या किरणातून उत्पन्न झाले आहे.असे जाणवते ज्या दिशेने सूर्य किरण पडत असतील त्याच दिशेनं या फुलाची नजर फिरत असते.देशात सूर्यफुल उत्पादन घेण्यात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. देशातील ऐकून खाद्य तेलाच्या उत्पादनापैकी १२ टक्के उत्पादन हे सूर्यफुल तेल बियांपासून घेण्यात येत आहे.
Planting sunflowers सूर्यफुल लागवड
महाराष्ट्रात सूर्यफूल पिकाची लागवड प्रामुख्याने खरीप,रब्बी, उन्हाळी हंगामात करण्यात येते.भुईमुगाच्या नंतर सर्वाधिक लागवड सूर्यफूल वाणाची करण्यात आली आहे.
१२ जून ते १६ जुलै महिन्यात पावसाने साथ दिली असता पेरणी केली जाते. २) सप्टेंबर ते ऑक्टोंबर कालावधीत पेरणी करन्यात येते. पिक लागवड क्षेत्राचे दिवसेंन दिवस कमी होणारे प्रमाण येणाऱ्या भविष्यात चिंता जनक ठरत आहे.
Sunflowers improved caste.लागवडी योग्य सुधारित जाती.
- फुले रविराज : बियाणे परिपक्व होण्यास ९५ ते १०० दिवसाचा कालावधी लागतो तसेच तेलाचे प्रमाण अधिक मिळत आहे.
- के.बी.एस.एच-४४: बियाणांची पेरणी सप्टेंबर ते ऑक्टोंबर,उत्पादनात वाढ,पीक हापूस न होणे बियाची दाणेदार पना दिसून येतो.
- एस.एस.एफ.एच -१७ : १०० ते १०५ दिवस पिकाचा कालावधी हेक्टरी उत्पादन १० ते १२ क्विंटल तेलाचे प्रमाण अधिक आहे.
- एल.डी.एम.आर.एस.एच -१७ : पीक परीपक्व होण्यास ९० ते ९५ दिवस तेलाचे प्रमाण सर्वाधिक आहे.
सूर्यफुल उत्पादनात मराठवाड्यात वाढ.
सूर्य फुल पिकाची पेरणी मराठवाड्यात वाढतच जात आहे. येथील कोरडे हवामान असल्याने किडीचा प्रादुर्भाव पण कमी जाणवत आहे.जमिनीची सुपीकता असल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे.
लातूर, धाराशिव, संभाजीनगर, नांदेड, बीड जिल्ह्यातील सूर्य फुलाचे उत्पादन प्रति हेक्टर ९ क्विंटल पर्यंत वाढ झाली आहे.
बीज प्रक्रिया
सूर्य फुल बियाणांची लागवड करण्याअगोदर हानिकारक बुरशी किटका पासून पिकाला सुरक्षित ठेवण्यापर्यंत बीज प्रक्रिया करणे महत्वाचे आहे.
पेरणी होण्याच्या अगोदर बियाण्यास प्रति किलो ३.६ ग्रॅम ट्रायकोड्रमा,व थायरम प्रति किलो ४ ग्रॅम चोळून लागवड करावी लागेल. ज्यामुळे पेरणी केलेल्या झाडाची मृत्यू होणार नाही.
खतांचे प्रमाण
पिक लागवड करते वेळी खतांचे नियोजन योग्य पद्धतीने करने आवश्यक आहे.
खरीप हंगामातील पेरणी करते वेळी २५ किलो पालाश,२५ किलो स्पुरद,५० किलो स्फुरद योग्य प्रमाणात द्यावे.
सूर्य फुल प्रति किलो तेलाचे प्रमाण.
सूर्यफुल तेलबियापासून प्रति किलो मागे ३०० ग्रॅम तेलाचे उत्पादन मिळते. या तेलात प्रथिनेचे प्रमाण हे १८ ते १९ टक्के आहे.
अनसॅच्युरेटेड आणि फॅटी ऍसिड हे पदार्थ आढळल्याने तेल जास्त काळ टिकून राहते. लीनोलिक ऍसिड, ओलिक एसिड हेही मोठ्या प्रमाणात आढळते.
सूर्यफूल तेलाचे फायदे.
- सूर्य फुल तेल नियमित दररोजच्या वापरात आणले असता हृदयरोगाचा कोणताही त्रास जाणवणार नाही.
- हृदय दीर्घकाळ टिकून राहते.
- सूर्य फुल तेलाचा नियमित वापर केल्याने कॉलेस्ट्रॉलची पातळी शरीरात संतुलित राहते.
- ॲलिक एसिड असल्याने हृदय व नसांची चालना मजबूत करते.
- रोग प्रतिकारक शक्ती वाढ होउन शरीर निरोगी राहते.
- सूर्य फुल तेलाचे अनेक नैसर्गिक फायदे असल्याने या तेलाची किंमत वाढ झाली आहे.
सूर्य फुल बाजार भावात वाढ.
मागील चार वर्षा पासून सातत्याने खाद्य तेलाच्या किंमती मद्ये वाढ होत आहे. याच अनुषंगाने राज्यातील तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या पिकापासून अमुलाग्र पैसा कमवण्याची संधी मिळत आहे.
१) स्वतःच्या जमिनीत सूर्य फुल लागवड करून तेल उत्पादन करून घाऊक बाजार पेठेत विक्री करणे.
२) स्वतःचा व्यवसाय उभारून आर्थिक तसेच रोजगार निर्मिती करणे.
३) तेल उत्पादना सोबत पशू खाद्य तयार करून आर्थिक लाभ मिळवणे.
४) सूर्य फुल हमी भाव हा साधारणतः ३८०० रुपया पर्यंत मिळतो पण हेच तेल गाळप करून विकले तर तीन पट चलन मिळू शकते.
मागील काही वर्षांपासून राज्यात ऊस कडधान्य पिकवण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा पिकामध्ये अंतर पीक म्हणून सूर्य फुल या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी घेऊ लागले आहेत.