जागतिक हवामान बदलामुळे (संयुक्त राष्ट्र खाद्य व कृषी संस्था) (FAO) २०२२-२३ च्या अहवाल नुसार मनुष्य प्रजातीच्या अन्न सुरक्षा व वाढी साठी २०२२ ते २०३१ पर्यंत महत्वकांक्षी धोरणाच्या अंमलबजावणीस समर्थन देणे आणि जागतिक हवामान बदलामुळे उद्भवलेल्या समस्यांना तोंड देण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल पुढे टाकले जात आहे.

स्ट्रॅटेजीक कृषी खाद्य प्रणालीची कल्पना राबवणे.

जून महिन्यात (FAO) च्या कार्यकारी मंडळाने दिलेली मान्यता कृषी खाद्य प्रणालीची कल्पना आणि हवामान बदलाच्या प्रभावांना स्थिरता आणण्यासाठी एग्री फूड सिस्टम मद्ये उत्पादन प्रक्रिया व साठवणूक ते वाहतूक, प्रक्रिया, विवरण, यासर्व बाबींचा दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानी पासून बचत करणे. देशातील मान्सूनच्या हालचाली नुसार प्रत्येक राज्यात वेगळ्या पिकांची संकल्पना मांडून उत्पादन घेऊन देशातील खाद्य व कृषी उत्पादनात वाढ करणे.

शेतीस उत्सर्जन चा धोका जीजलवायु प्रणाली मध्ये बदल.

जागतिक पातळीवर उत्सर्जनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतीस नुकसानदायक ठरत चालले आहे. या प्रणाली मध्ये हवामान बदलाचा मुकाबला करण्यासाठी आशादायक उपाय देखील केले पाहिजेत जसे कमी उत्सर्जन असलेल्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणे आणि येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी निरोगी जीवन व सुरक्षित या पौष्टिक अन्न मिळावे हे सुनिश्चित केले पाहिजे. ज्यामुळे देशातील तसेच जागतिक पातळीवर दुर्लभ जीवन जगणाऱ्यांना जीवनाचा आनंद घेता येईल.

हवामान बदलाचे परिणाम जगभरात दिसत आहेत.

जागतिक हवामान बदलाचे परिणाम सर्वात गंभीर पैलू पैकी एक आहे. हवामान बदलामुळे कृषी,जीवन,पशू, पक्षी यावर मोठ्या प्रमाणात बदल होत चालला असल्याने हवामान बदलाचे परिणाम जगभरात अगोदरच जाणवत आहेत. त्यामुळे जैव विविधता नष्ट होणे, वाळवंटी करण, जमीन आणि पर्यावरणाचा ह्रास आणि मान्सून मंध्ये होणारे बदल या सर्व बाबी येणाऱ्या भविष्यात मानवी जीवनास नुकसानदायक ठरू शकतील. ज्यामुळे अन्नसाठा कमी होऊन गरीब देशातील शेतकऱ्यांना व जनतेला आर्थिक भुकमरीचा सामना करावा लागेल असे FAO चे संचालक यांनी सांगितले.

भारतीय महद्विप हवामान बदलामुळे कृषी उत्पन्नात कमी.

देशाचा कृषी आराखडा तीन प्रमुख स्तंभावर आधारित असून पहिला कृषी खाद्य प्रणाली मध्ये सार्वजनिक रित्या हवामान बदलाविषयी संबोधित करणे दुसरा कृषी क्षेत्रात प्रभावी कृती करण्यास सक्षम राहणे तिसरा स्थानिक पातळीवर वृक्ष रोपण करून पोशक वातावरणास मदत मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *