पावसाचे गणित बिगडल्याने शेतकरी चिंतेत.

२०२३ हे वर्ष शेतकऱ्यांना साठी आर्थिक जोखमीचे दिसत आहे. कारण जून महिन्यात येलनिनोचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने पावसाचे गणित बिगडले होते. पेरणी होऊन 1ते सव्वा महिना झाला असून शेतकरी बळीराजा चिंतेत आहे. जुलै महिन्याच्या सुरवातीस राज्यात पेरणीला सुरूवात होऊन आता राज्यात पावसाचा जोर कमी असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सोयाबीन हे पीक खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे.

सोयाबीन वर केसाळ अळीचा प्रादुर्भाव 

शेतकऱ्यांनी अफाट जीवाचे रान करून खरीप हंगामासाठी पैसे जमवून सोयाबीन पीक राज्यातील शेतकऱ्यांचे सर्वात जास्त पेरणी होणारे पीक म्हणजे सोयाबीन आहे. सध्या पावसाने विश्रांती दिल्यामुळे सर्व जण पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
सोयाबीन पीक हे येणं फुलात आले आहे. पण काही शेतकऱ्यांचे पीक हे पिवळ पडतय तर काही ठिकाणी किडींचा आती उद्रेक झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या वर्षी शेतकऱ्यांनी तारेवरची कसरत करून सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. दर वर्षी प्रमाणे या वर्षी असेच राहील तर शेतकरी हतबल होऊन जाऊ शकतो.
पिवळ्या व केसाळ आळी पासून मुक्तता
या अळ्यांची उत्पन्न होण्याचे कारण म्हणजे पावसाचा अनियमित पणा व पेरणी ही त्या वेळेत झाली नसल्याने बऱ्याच किडीचा विकास होऊन ते मोठ्या बनत जातात. आणि सोयाबीन असो की दुसरे कोणते पीक त्याच्यावर  झुंड च्या झुंड पानास खाऊन टाकत आहे हे नवीन कीड नसून याच्या अगोदर पण मागील काही वर्षांत अशाच किडीचा प्रादुर्भाव ही अळी मुख्यात: सूर्यफुल तसेच गवतावर ही दिसून येते. गेल्या वर्षी मराठवाडा व विदर्भातील या किडीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.क्विनॉलफॉस २५ इसी ३० मिली १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आणि या किडीचा प्रादुर्भाव कमी होऊन पीक उत्पादनात वाढ होऊ शकते.

कीड नियंत्रण कसे करावे

बरेच शेतकरी खरीप हंगामात सूर्यफुल पिकाची लागवड करून त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात व दुसऱ्या वर्षी त्याच क्षेत्रात सोयाबीन पिकाची पेरणी घेतल्याने केसाळ अळीची निर्मिती होते. त्या क्षेत्रात सोयाबीन पिक घेणे टाळले पाहिजे.

  • शेती बांध स्वच्छ ठेऊन अंडी अळी असलेली सोयाबीन ची पाने तोडून टाकून द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *