रासायनिक खतांचा अती वापर शेतीस नुकसान दायक.

राज्यात सरकार विविध योजनाद्वारे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती वापरा विषयक माहिती देत आहे.पन मागील काही सेंद्रिय खताचा अवलंब कोणी करत नसल्याने येणाऱ्या भविष्यात रासायनिक खतामुळे शेतीचे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही.

संतुलित प्रमाणात रासायनिक खताचा वापर केला असतां नत्र:स्फुरद:पालाश शेतीत वापर करणे गरजेचे आहे. ज्या पिकाची रोपे लावणी पासून ते काढणी पर्यन्त असे दीर्घ पिकांना युरिया खताची मात्रा विभागून द्यावी लागते. पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी खताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जागतिक आकडेवारी नुसार भारत देश युरिया खताचा वापर करणार जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

युरिया खताचे फायदे.

  • युरिया खताचा वापर योग्य वेळी अल्प प्रमाणात वापर करून पीक व झाडे व्यवस्थापन करू शकता.
  • एकसारखे खत पिकास दिल्याने पीक उत्पादन वाढण्यास मदत होते.
  • खताची मात्रा दिल्याने पीक उच्च दर्जाचे व पोशक घटकांची कमकरता पूर्ण होते.
  • पिकांच्या मुळाशी खत दिल्याने पिकांची वाढ होऊन फळांची वाढ होते.

रासायनिक खताचे तोटे.

१)रासायनिक खते जमिनीच्या वरच्या भागावर टिकून राहत नाहीत. 

२)पिकांना पानी दिल्या नंतर युरिया खत व रासायनिक खाते जमीनी मध्ये मिसळून जाऊन नंतर पिकास पोषक तत्वे मिळत नाहीत.

३)केमिकल युक्त खतामुळे जमिनीस पोषक असणारे घटक,जिवाणू व सूक्ष्मजीवांना हानिकारक ठरतात.

४)खतांचा मुबलक प्रमाणात वापर केल्याने शेत जमिनीची मात्रा खराब होते.

५)शेत जमिनीस रासायनिक खताचा जास्त वापर केल्याने गांडूळ,माती भूस भूसीत करणारे किडे मरण पावतात.

६)युरिया खताचा अटी प्रमाणात वापर केल्याने जमिनी खालील पाण्यात परिणाम होतो. व जलचर प्राण्यांची हानी होऊन केमिकल युक्त रसायनामुळे शेवाळ आणि दूषित पाण्यात वाढ होते.

७)युरिया खताचा मोठया प्रमाणात वापर केल्याने पिकास कीड लागणे व विविध रोगाच्या संखेत वाढ होते.

८)पालाश,बोरॉन,व तांबे अश्या अन्न अन्नद्रव्याची पिकास कमी भासते.

रासायनिक खताचे मुख्य घटक 

  • नायट्रोजन,पोटॅशियम आणि फॉस्फरस हे मुख्य तीन घटक रासायनिक खत बनवण्यासाठी वापरले जातात.
  • आधुनिक शेती करणाऱ्या पिकास या घटकाचा प्रामुख्याने वापर केला जातो.

सर्वात जास्त प्रमुख रासायनिक खताचा वापर . 

देशात सर्वात जास्त खताचा वापर पंजाब या राज्यात केला जातो

  • युरिया
  • पोटॅश खते
  • झिंक खते
  • अमोनिया फॉस्फेट
  • सुपर फॉस्फेट

या खताचा मोठ्या प्रमाणात  वापर शेतीस केला जात आहे .

(Chemical )रासायनिक खतासांठी पर्याय कोणता आहे. 

रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केल्याने जमिनीची नासाडी होऊन पीक उत्पादन घटत जाते. केमिकल युक्त खत टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त गुरांचा सांभाळ करने शेती साठी तसेच आर्थिक उत्पन्नासाठी  योग्य ठरणार आहे. गुरांमुळे शेणखत तसेच गोमूत्र शेतात सिंपडल्याने  जमिनीची प्रत सुधारून अधिक गुणवत्ता वाण होऊन पीक उत्पादनात वाढ होते.

पाला पाचोळा खत तयार करणे 

जमिनीची प्रत सुधारण्यासाठी मागील काही वर्षा पूर्वी जमिनीत पालापाचोळा शेतातील कचरा वापर  कुजवून शेतात पावसाळ्यात अगोदर शिंपडत जात आहे परंतु आधुनिक युगात या पाला पाचोल्याची जागा रासायनिक खतानी घेतली  असल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *