शेतकऱ्यांस सोलरपंप व पॅनल वाटप 

नमस्कार मित्रांनो आज आपण शेतीस लागणारी ऊर्जा विषयी चर्चा करणार आहोत. राज्यातील ऊर्जेची मागणी लक्षात घेता राज्य सरकार व केंद्र सरकार नवीन ऊर्जा स्त्रोतांची निर्मिती व विकास कार्य करत आहे.यापैकी मुबलक प्रमानात उपलब्ध असणाऱ्या सौर उर्जेचा राज्यात जास्तीत जास्त प्रकल्पाची निर्मिती करणे गरजेचे आहे.शेतीस बारा माह पुरेल एवढी वीज निर्मिती तयार होत नसल्याने राज्य व केंद्र शासन नैसर्गिक व पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांची निर्मिती करून ते सर्वसामान्य शेतकऱ्यास वितरण करण्याचे सरकारने ठरविले आहे.या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने  आपले नवीन धोरना नुसार योजना मार्फत राबवण्याचे ठरविले आहे.

योजनेचे उधीष्टे  

  • राज्यात विविध प्रकल्पा द्वारे १० हजार मेगा वॅट सौर उर्जेपासून वीजनिर्मिती तयार करणे.
  • ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर उर्जेवर स्थापन करणे.
  • ३० मेगा वॅट बोरवेल व लघु जल पानी पुरवठा उपसा करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प गावो गावी स्थापन करणे
  • अल्प भूधारक शेतकरी तसेच संस्था व गट स्थापन करून २५० मेगा वॅट चे सौरऊर्जा प्रकल्प स्थापन करणे.
  • सलग्न प्रकल्पांतर्गत सौरऊर्जा आधारित विद्युत निर्मिती करणे
  • शहरी छतावर सौर ऊर्जेचे पॅनल बसवणे त्या मार्फत घरगुती वीज निर्मिती करणे
  • शहरी घन कचऱ्यावर आधारित वीज निर्मिती प्रकल्पातून वीजनिर्मिती चालना देणे

 राज्यातील ऊर्जेचे धोरण 

राज्यात ऊर्जेचे संवर्धन धोरणा नुसार ऊर्जा बचत आणि ऊर्जा संवर्धन या क्षेत्रातील कायमच तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील तसेच राज्यातील वीज निर्मितीत वाढ करणे व शेतीस व औद्ध्योगीक क्षेत्राला  वीजनिर्मिती कायमच उपलबद्ध करून देणे या मागील मुख्य उद्धेश राहील राज्य सरकार वीज निर्मिती करण्यासाठी विविध योजना राबवून खेड्या पाड्यातील गावोगावी सौरऊर्जा पासून मिळणारे फायदे व दैनंदिन घरगुती वापरात लागणारी वीज हे सौरऊर्जा मुळे तयार करता येऊ शकते.  

कुसुम योजनेतून वीज निर्मिती उधीष्ट .

कुसुम योजना ही राज्यातील प्रत्येक जिल्हयातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजने चे मुख्यउधीष्ट राज्यातील लोड शेडिंग मुळे शेतकऱ्यांना होणार अपुरा विजेचा प्रवाह जर कोरडवाहू शेतकऱ्यांना पीक उत्पादन करण्यासाठी पिकाला पानी देने महत्वाचे असते जर पानी दिले नाही तर पीक पाण्या वाचू मरून जाऊ शकते यासाठी राज्य सरकारने कुसुम योजनेचा राबवण्याचे ठरविले आहे. सौर पंप बसवून राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेत मध्ये मदत करने या योजनेचे मुख्य उधीष्ट आहे.

सौर ऊर्जेचे फायदे . 

१ )सोलर पॅनल पासून वीज निर्मिती करणे  व सर्वप्रथम तयार झालेल्या विजेचा वापर सर्व सिंचन क्षेत्रात वापरला जाणार आहे.

२)वीज आणि डिझेल चा वापर शेतीस कमी होईल व वायु प्रदूषण तसेच ध्वनि प्रदूषण आटोक्यात राहील.

३)ISO कंपनी चे पॅनल जर तुम्ही सौर उर्जेसाठी वापर केलात तर सतत २५ वर्ष तुम्हाला विजेचा तुटवडा भासणार नाही.

४)शेतकऱ्यांना कुसुम योजने अंतर्गत ६० टक्के पासून ते ९० टक्के पर्यन्त सबसिडी दिली जाणार आहे.

५)सोलर पॅनल मधून निर्माण होणारी वीज शेतकरी त्यांच्या गर्जे नुसार सिंचन शेती साठी उपयोगात अनू शकतो.

६)शेती वापरातून शिल्लक राहिलेली वीज सरकारला परत विकू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *