जागतिक पातळीवर शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक देश विविध प्रकारच्या रसायनाचा उपयोग करून रासायनिक खत निर्मिती केली जाते आहे.तसेच मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढवण्यासाठी पिकाला खत देत आहेत, यात काही शंका येणारच नाही. रासायनिक खताच्या अती वापराने जमीनीची सुपीकता टिकवणे अत्यंत अवघड होऊ लागले आहे. ज्यात जमीनीची पोत, मातीचा श्वास जागीच गुदमरत जाऊ लागले आहे. शेतीचे मोठे नुकसान होऊ नये म्हणून शेणखत, पालापाचोळा, जैविक खत त्याच बरोबर गांडूळ खताची मात्रा दिल्याने जमीन भुसभुशीत राहून उत्पादन वाढण्यास मदत होईल.पद्धतीने वातावरणातील बदलामुळे नैसर्गिक या अपदामुळे बहुतांश ठिकाणी प्रज्यण्यमान प्रति वर्ष ४ ते ५ टक्के पाऊस कमी पडत आहे तर काही ठिकाणी पावसाने हाहाकार घातला घातल्याने अश्या परिस्थितीस नैसर्गिकदृष्ट्या शेती करणे फायद्याचे ठरते.
देशातील लोकसंख्या वाढ येणाऱ्या काळात समस्या चे ढग बनू शकते. पर्यावरणातील बदलामुळे अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत ज्यात पाणी प्रश्न, विजेचा तुटवडा, अपुऱ्या सुखसुविधा, एल निनो, पावसाचा अनियमितपणा, जंगल तोड ,मॉन्सून उशिरा दाखल होणे या सर्वांचा होणारा परिणाम पीक व धान्य उत्पादनात कमी आणू शकतो.शेतकरी बांधवांना अन्नधान्य उत्पादन करण्यासाठी जास्तीत जास्त पीक उत्पादन घेणे किंवा त्याच जमिनीच्या तुकड्यावर रासायनिक खताचा भडिमार करून उत्पादनात वाढ करणे हे धोरण परवडणारे नाही. शेती अधिक खर्चिक होऊ नये म्हणून सर्वसाधारण सोयीचा अवलंब करून शेती करण्यात यावी शेती जेवढी रासायनिक पद्धतीने विकसित होईल तेवढ्याच पद्धतीने खर्च वाढ होऊन उत्पादन कमी होऊ शकते.
भारतीय जैविक शेती (Indian Organic Farming)
दिवसेंदिवस जमिनीची उबजाऊ क्षमता कमी होत चालली आहे. याला सरकार व सरकारी योजना मार्फत खतावर शेतकऱ्यांना दिल्या जाणारी सवलती मुख्य कारणीभूत ठरत आहेत. अश्याच प्रकारे शासनाने नैसर्गिक, किंवा जैविक खात निर्माण करणाऱ्या व वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना सवलती देऊन अधिकाधिक वापर करण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
ज्यामुळे शेतीचे उत्पादनात वाढ ते होईल, नापीक जमीन पण सुपीक दीर्घकाळ जीवंत ठेवण्यास मदत होऊ शकते.जर अश्याच पद्धतीने जमीन नापीक होऊ लागली तर अन्नधान्य बाहेरील देशाकडून आयात करावे लागेल.मागील काही वर्षंपासून शेती उत्पादन खर्च मोठ्या संख्येने वाढला आहे. ज्यात खत,बी बियाणे, मजूर, मळणी, काढणी या सर्वांचा खर्च वाढल्याने शेतकरी कर्ज बाजारी होत आहेत.
जैविक शेती करण्याचे फायदे.(Advantages of Organic Farming.)
जैविक शेती करण्याचे अनेक फायदे आहेत.
- हे पर्यावरणास व मातीच्या आरोग्यास प्रोत्साहन देते, प्रदूषण कमी करते आणि जलस्रोतांचे संरक्षण करते
- आरोग्यदायी अन्न व सेंद्रिय उत्पादनांमध्ये उच्च पोषक पातळी आणि कमी कीटकनाशक मृत पावतात.
- जैवविविधता टिकवून ठेऊन विविध प्रस्थितीला समर्थन देते, जे दीर्घकालीन कृषी टिकविण्यास महत्त्वपूर्ण आहेत.
- सुधारित प्राणी कल्याण व सेंद्रिय मानके प्राण्यांवर मानवी उपचारांना प्राधान्य देतात.
- लहान शेतकऱ्यांना जैविक शेती संधी देऊन महागड्या रासायनिक शेतीला मुक्त करू शकते.
- सेंद्रिय शेती शुद्ध आहार देऊन उत्पादनांसाठी खास बाजारपेठ निर्माण करू शकते.
सेंद्रिय शेती कशी सुरू करावी (How to start organic farming)
सेंद्रिय शेती सुरू करण्यासाठी अनेक पायऱ्यांचा समावेश होतो, परंतु तुम्हाला प्रारंभ करण्यासाठी येथे एक सरळ मार्गदर्शक आहे.
१) संशोधन आणि नियोजन (Research and Planning)
सेंद्रिय शेती पद्धती, स्थानिक नियम, बाजारातील मागणी आणि तुमच्या क्षेत्रासाठी योग्य पिके कोणते याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. ज्यात तुमची उद्दिष्टे, बजेट हे मुख्य ठरते.
२) जमिनीची निवड (Selection of land)
पाणी, सूर्यप्रकाश आणि सुपीक मातीच्या प्रत योग्य स्थान, हवामान, स्थलांतर आणि जमिनीची उपलब्धता यासारख्या घटकांचा विचार करायला हवा.
३) माती निवड करने (Soil selection)
जमिनीची निवड करणे पोषक आणि pH पातळीसाठी तुमच्या मातीची चाचणी करा. जमिनीची सुपीकता आणि रचना सुधारण्यासाठी सेंद्रिय पद्धती जसे की कंपोस्टिंग, कव्हर क्रॉपिंग आणि पीक रोटेशन वापर करा.
४) पीक निवड (Crop selection)
बाजारातील मागणी, हवामान अनुकूलता आणि तुमच्या वैयक्तिक आवडी निवडींवर आधारित तुम्हाला कोणती पिके घ्यायची आहेत ते ठरवा. सुरुवातीला काही पिकांपासून सुरुवात करा आणि हळूहळू विस्तार करा.
५)सेंद्रिय बाजारपेठ निवड (organic market selection)
शेतातील उत्पादनांची विक्री करणे अनिवार्य असले पाहिजे.तरी ते तुमच्या शेतात विश्वासार्हता वाढवू शकते जसे की हॉटेल व्यवसायिक, व्यापारी वर्ग,आणि विशिष्ट बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यास मदत करू शकते.
६)लागवड आणि देखभाल (Planting and maintenance)
तुमची पिके त्यांच्या विशिष्ट गरजेनुसार, अंतर, खोली आणि वेळेसह लावा. पीक रोटेशन, नैसर्गिक शिकारी आणि यांत्रिक मशागत यासारख्या सेंद्रिय कीटक आणि तण नियंत्रण पद्धती ला
लक्षात ठेवा, सेंद्रिय शेतीसाठी समर्पण, संयम आणि शाश्वत पद्धतींबद्दल वचनबद्धता आवश्यक आहे. हा एक प्रवास आहे जो पर्यावरण आणि आपल्या ग्राहकांना ठेवा जपून ठेवतो.